जाता जाता एक नजर इथेही........

Wednesday, May 6, 2009

कोणाचे काय तर कोणाचे काय

जगभर सगळीकडे ' स्वाईन फ्लू ' चा धुमाकूळ चालला आहे. अनेक मते, कसा होतो, काय करा काय करू नका इत्यादी चर्चा, लिखाण वाचते आहे. काल जावेचा फोन आला. ती म्हणाली भारतात एअर पोर्ट्वर जबरदस्त चेकिंग सुरू आहे. अमेरिकेतून येणाऱ्या प्रत्येक विमानातील प्रवाशांचे थरो चेकिंग करतात. जरा जरी सर्दी, ताप आहे असे वाटले तर केवळ त्या प्रवाशालाच नाही तर विमानातील संपूर्ण प्रवाशांना दोन दिवस कुठेतरी घेऊन जातात. मग सगळ्यांच्या टेस्ट करतात. त्यापुढे काय करतात, सगळ्यांना कधी सोडतात ते तिलाही नक्की माहीत नाही. मनात आले, अरे वा! चांगले आहे, करायलाच हवे. आपल्या अफाट लोकसंख्येकडे पाहता हे मस्ट आहे.

हा विचार चालू असताना एकदम लक्षात आले, आपले पोरगं जातंय की भारतात सोमवारी. आधीच तो प्रथमच एकटा जाणार म्हणून थोडी काळजी वाटते आहेच. त्यात आता हे झेंगट. म्हणतात ना चिंतेच्या भुताने झपाटले की नाही नाही ते डोक्यात येते. आता नेमके ह्याच्या विमानातच कोणाला सर्दी, ताप असला तर? आता व्हेदर् इतकेसारखे बदलते आहे, आज ४० तर उद्या ७५. अशात बरेच जण सर्दीने त्रासलेले असतात. म्हणजे खरेच जर कुठे घेऊन गेलेच तर काय होणार? किती दिवस आणि तपासणी म्हणजे नेमके काय करणार? नेमकं हे आताच कशाला घडायला हवे होते, खरे तर कधीच घडू नये पण घडायचे होतेच तर.... आईचे मन त्याला चैन नाही.

पोराच्या फायनल एक्झाम्स सुरू आहेत त्यामुळे तो अभ्यासात डुबलाय. तरीही म्हटले त्याला थोडी कल्पना देऊन ठेवावी. म्हणून फोन करून सगळे कानावर घातले. त्याने नेहमीप्रमाणे हं हं... केले. बरं गं कळले मला, नंतर बघू. सध्या मला वेळ नाही. असे म्हणून फोन ठेवून दिला.

तीनचार तासाने त्याचा फोन आला, " आई कशी आहेस, काय चालले आहे? " नेहमीप्रमाणे बोलणे चालले होते. सगळा वेळ बॅगरॉउंडला पोराच्या मित्रांचा आवाज, खिदळणे ऐकू येत होते. " काय रे, एवढा काय गोंधळ चाललाआहे? अभ्यास करायचा सोडून काय करता आहात? " "अग तू सांगितलेस ना एअर पोर्टवर अडकवून ठेवतात, मगतसे झालेच तर तिथे टाईमपास कसा करायचा त्याची सोय करताहेत सगळे. " " म्हणजे काय करताय?" " आई , तुला माहितीये ना, माझे बरेच मित्रही ह्या वीकएन्डला जाणार भारतात. आम्ही सगळे आयफोन मध्ये म्युझिक मूव्हीज डाउनलोड करतोय गं. म्हणजे निदान मज्जा तरी करता येईल. "

हे ऐकले आणि खरेच मला पोराचा त्याच्या मित्रांचा हेवा वाटला. त्यांना स्वाईन फ्लूची ग्रॅव्हिटी व्यवस्थित कळतेय, पण ते माझ्यासारखे वेडे विचार करत नाहियेत. त्यातही जे थोडे दिवस सुटीचे आहेत ते कसे मजेत घालवावे हे शोधत आहेत. त्यांचे वयच असे आहे अन त्याचबरोबर माझे आईचे मन .... ह्म्म्म, कोणाचे काय तर कोणाचे काय.

8 comments:

  1. Nice Post !
    I believe in Life is How You SEE it !
    Everyday, eveyone is busy with something.. it may be work, tension, plans or watever it may be.. Now it depends on individual that to which thing he/she should give importance.
    so... kalaji karat wel ghalvayacha ki aayushyacha 1-1 kshan jagayacha :)
    Njoy Life to the Fullest !
    Yo ! \m/
    [Note:- With all due respect to your emotions behind writing this post, kindly dont take it personally. Thank you. :)]

    ReplyDelete
  2. Thanks Abhishek. Even I too believe in Life is How You See it, but sometimes... can't help it. :)

    ReplyDelete
  3. hmm... I knw..

    Mom's will be Mom...

    anyways..

    Hey B'lated Happy Mother's Day :)

    ReplyDelete
  4. चला! पोचलं बरं का तुमचं पोरगं मुंबईला!! आता आली का स्वस्थता जिवाला? स्वाईन फ्लू नाही तडमडला! आपल्या शांतादुर्गेचा मायेचा हात आहे ना मस्तकावर. तीच आपल्याला सांभाळते, आपले रक्षण करते. श्रीशांतादुर्गायॆनम:।
    मंदांजली

    ReplyDelete
  5. अगदी खरं, धन्यवाद आई.

    ReplyDelete
  6. अहो मी जातो २ दिवसात मुंबईला... ते पण मेक्सिकोवरुन थेट ... आता स्थिति तशी निवळली आहे तशी पण बघुया माझ काय होते ते... :D

    ReplyDelete
  7. रोहन,जाशील सहीसलामत. खरयं, आता परिस्थिती थोडी निवळली आहे. धन्यवाद आणि प्रवासाकरीता शुभेच्छा!!

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !