जाता जाता एक नजर इथेही........

Sunday, May 10, 2009

पानी रे पानी तेरा रंग कैसा.....


जीवनाच्या चार अवस्थामधले पाण्याचे बदलते रुप. टॅहां... टॅहां पासून ह्याची इमानी साथ सुरू होते ती ढँण होईपर्यंत. पहिल्यात जीवनरस पुरेपूर असतो. मग नुसतीच ओतू जाणारी फसफस. त्याचे बुडबुडे विरायच्या आतच तिसरे चोरपावलांनी शिरून पाहता पाहता काहींसाठी मजबुरी होऊन बसते. मग चौथे इमानदारीत पुन्हा एकदा जीवनरस पुरवण्याचा प्रयत्न करते खरे पण तोवर आपापली कर्म मजबुऱ्यांनी घेरलेले आपणच ह्याची साथ सोडून पसार होतो.
अन पुन्हा एकदा टॅहांतून ऐकू येते, पानी रे पानी तेरा रंग कैसा....

No comments:

Post a Comment

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !