- पालकाची मध्यम जुडी
- एक मध्यम कांदा व एक टोमॅटो बारीक चिरून
- एक वाटी मक्याचे कोवळे दाणे
- चार लसूण पाकळ्या व अर्धा इंच आले बारीक चिरून
- छोटा दालचिनीचा तुकडा, तीन लवंगा, पाच/सहा मिरे.
- अर्धा चमचा शहाजिरे, चार तेजपत्ता, एक चमचा तिखट व चवीनुसार मीठ
- एक वाटी तांदूळ
- तीन चमचे तेल, तूप ( वाढताना )
मार्गदर्शन
भात मोकळा शिजवून ( कुकरला लावू नये ) घ्यावा. पालकाची पाने व कोवळ्या काड्या धुऊन गरम पाण्यात तिनचार मिनिटे बुडवून मिक्सरवर वाटून घ्यावे. कढईत तेल घालावे. तापले की त्यावर खडा मसाला ( लवंगा, मिरे, दालचिनी, शहाजिरे, मसाला वेलची व तेजपत्ता ) परतावा. त्यावर आले-लसूण, कांदा, टोमॅटो व मक्याचे दाणे घालून मध्यम आचेवर परतावे. अर्धे भांडे पाणी घालून झाकण ठेवावे. पाच मिनिटांनी वाटलेला पालक, लाल तिखट, चवी नुसार मीठ व अर्धे भांडे पाणी घालून सगळे मिश्रण एकत्र करून लागलीच झाकण ठेवावे. सात/आठ मिनिटाने आच बंद करावी. वाढताना गरम भात त्यावर गरम भाजी व एक चमचा साजूक तूप घालून कालवून वाढावे.
मी मागे एकदा केला होता हा राईस...मस्त होतो...आता पुन्हा एकदा....आठवण करुन दिल्याबद्दल आभार...
ReplyDelete:), आभार तन्वी.
ReplyDelete