खजूर-आक्रोड़ रोल
जिन्नस
- २५० ग्रॅम बिया काढलेला खजूर
- २०० ग्रॅम अक्रोड गर
- दोन चमचे रिकोटा चीज /खवा
- एक चमचा साजूक तूप
मार्गदर्शन
खजुराचे बारीक तुकडे करावेत. अक्रोड ठेचून घ्यावेत. ( पूड करू नये. ) कढईत खजूर व तूप टाकावे. आच मध्यम ठेवावी. खजूर मुळातच मऊ असल्याने दोन मिनिटांतच शिजतो. त्यात रिकोटा चीज/मावा घालून मिश्रण एकजीव करावे. दोन-तीन मिनिटे परतावे. मग तुकडे केलेले अक्रोड घालून सगळे जिन्नस एकमेकात व्यवस्थित एकत्र होईतो ढवळून ( चार मिनिटे ) उतरवावे. मिश्रण गरम असतानाच प्लॅस्टिक पेपर मध्ये गुंडाळावे व रोल करावे. ( प्लॅस्टिकमुळे हात भाजत नाही ) थोडे कोमट झाले की फ्रीज मध्ये ठेवावे. दोन तासाने बाहेर काढून वड्या कापाव्या.
No comments:
Post a Comment
आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.
आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !