
जिन्नस
- चार मध्यम आकाराचे बटाटे उकडून घ्यावेत.
- चार वाट्या कणीक
- सात-आठ लसूण पाकळ्या, सात-आठ हिरव्या मिरच्या, पेरभर आले व मूठभर कोथिंबीर
- एक चमचा जिरे व चवीनुसार मीठ
- दोन चमचे तेल व दोन् चमचे तूप
मार्गदर्शन
बटाटे उकडून साले काढून किसून तरी घ्यावेत किंवा हातानेच कुस्करून लगदा करावा. ( स्मॅश करावेत ) आले, लसूण, हिरव्या मिरच्या व जिरे मिस्करमधून वाटून घेऊन बटाट्याच्या लगद्यात टाकावेत. कोथिंबीर चिरून घेऊन तीही त्यावर टाकावी. त्यावर चार वाट्या कणीक, चवीनुसार मीठ व एक चमचा तेल घालून सगळे मिश्रण नीट मळावे. गरज लागल्यास थोडे थोडे पाणी घालावे. सगळे मिश्रण व्यवस्थित एकजीव झाले की चव घेऊन पाहावी म्हणजे मीठ कमी झाले असल्यास घालता येते. एक चमचा तेल या मळलेल्या गोळ्यावर टाकून पुन्हा दोन मिनिटे मळून मध्यम आकाराचे गोळे करावेत. तवा तापत ठेवावा. प्रथमच तवा चांगला तापू देऊन एक एक परोठा लाटून दोन्ही बाजूने तूप सोडून व्यवस्थित भाजून घ्यावा. हिरवी चटणी, लोणचे, दही किंवा कुठल्याही आवडणाऱ्या भाजीबरोबर गरम गरम आलू परोठा वाढावा.
टीपा
हिरवी मिरची घालताना जरा एखाद-दोन जास्तीच पडू द्याव्यात. हिरवी मिरची नको असल्यास लाल तिखट घालावे. मात्र मिरचीची चव खासच असते. तुपावरही हात जरासा सैलच हवा.
कणकेतच बटाटे घालून मळायचे असल्याने प्रथम प्रथम जरा चिकटपणा जाणवतो. मिश्रण जास्त चिकट वाटल्यास थोडीशी कणीक घालावी. कणीक घातल्यास मीठ व किंचित लाल तिखट जरूर घालावे. मळताना पाणी अंदाज घेऊन थोडे थोडे घालावे. फारशी गरज पडतच नाही. हाताशी वेळ कमी असेल किंवा आयत्यावेळी ठरवूनही अशा पद्धतीने आलू पराठे झटपट होतात व मस्तच लागतात.

अशाने तू आमचं किचनपण अंगावर ओढवून घेतेस....हम्म्म्म्म..झाले वाटतं आलु पराठे तयार....खा खा..आणि हो आठवणीने फ़ोटोपण काढून दाखवा....
ReplyDeleteनिषेध करून थकलो .. आता एक मेमोच काढायला हवा ... हेहे ... इकडे कामावर येउन ब्लॉग बघावे तर ही असे काही बघायला मिळेल असे वाटले नव्हते... खरच लोक फिरून आल्यावर दमत नाहीत का??? मला खुप भूक लागली आहे .... मला पण हवे आहेत ... :D
ReplyDeleteखुप भुक लागली आहे थोडा इकडे ही पाठवून द्या की...
ReplyDelete-अजय
खास शोमूसाठी पराठे बनवलेस ना? म्हणूनच जास्त चांगले झालेले दिसताहेत! मग त्याने ताव मारला असेल ना? मे महिन्यत आला होता तेव्हाही ही फर्माईश होतीच. खाणारा खूश आणि करणार्या पोळीवाल्याही खूश! "तुमचे पराठे मला फार आवडतात. छान करता तुम्ही." असे शोमूने म्हटल्यावर का नाही बरे वाटणार? आणखी काय काय खाऊ घातलंस त्याला? सगळे फोटो टाक ब्लॉगवर. आणि त्यांच्या कृतीही.
ReplyDeleteभुंगा आणि तू यांचं ’पोटोबा’ आत्ताच डाउनलोड केलंय. आता बघीन. पण न बघताच अभिनंदन करायला हरकत नाही. तुझ्या कृती चांगल्या असतातच आणि त्या निवडणार्याच्या अधिक उत्तम असणारच.
आई
हाहा... अपर्णा अग तुझ्याकडे आले की काय करायचे हे ठरवायला तुला सोपे जावे म्हणून गं... :)
ReplyDeleteरोहन तू कामावर आलास ना की तुला सारखी घराची-आईची-शमिकाची आठवण यायला हवी ना... काय? हेहे....
ReplyDeleteअजय पाठवलेत रे....मिळाले ना?:)
ReplyDeleteआई, शोमू खूश झाला. पाहिलेत का ’पोटोबा’? आठवणीने कळवा कसे वाटले ते. :) आभार.
ReplyDeleteनविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
ReplyDeleteपोटोबा मी पण download केले आहे,खुपच छान आहे. आलु पराठे झकासच. बरेच दिवसांनी लेखन केलेत. Miss करत होते तुमचे लेखन.
सोनाली
सोनाली तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा नव वर्षाच्या शुभेच्छा! अग जरा फिरती, लेक आलेला त्यामुळे ब्लॊगवर खूपच कमी लिहिले ग. पण आता पुन्हा सुरू होईलच. अनेक आभार.
ReplyDeleteमकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा.
ReplyDeleteतीळ गुळ घ्या गोड़ गोड़ बोला
देवेंद्र तुम्हालाही संक्रांतीच्या शुभेच्छा! तिळगुळ घ्या अन गोड गोड बोला....:)
ReplyDeleteआपल्याला व आपल्या कुटुंबियांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
ReplyDeleteरविंद्र आपणासही अनेक शुभेच्छा! तिळगुळ घ्या अन गोड बोला!:)
ReplyDeleteमला तर बघूनच शुगर वाढू लागली आहे.
ReplyDeleteमाझ्यासाठी काही पदार्थ सुचाव ना.भूक तर भागली पाहिजे पण पोट रिकामे राहायला हवे !!
आज संध्याकाळी काहीतरी वेगळं मस्त खायचा मूड होता. बरोब्बर तुझे हे पराठे आठवले, तेच केले. मस्त झाले होते. दोघांनीही चट्टामट्टा करून टाकलाय. जेवण झाल्यावर पहिलं काम म्हणजे ही प्रतिक्रिया टायपते आहे :)
ReplyDeleteकुठे हरवली आहेस? बर्याच दिवसात काही लिहिलं नाहीस?
पेठेकाका, खूपच विलंबाने उत्तर देतेय... माफी! तुम्हाला चालतील अश्या पदार्थांची लवकरच पोस्ट टाकते. धन्यवाद!
ReplyDeleteगौरी, चट्टामट्टा करून लगेच पोच दिलीस... धन्यू गं!:)
ReplyDeleteहो ना गं... खूप दिवस झाले ब्लॉग उदास झालायं. :( अगं, इतकी कामं मागे लागलेली की हाताला उसंत नाही पण डोक्यात नुसता दंगा झालायं... आता हळूहळू वाट करून देईन. :)
श्रीताई, पुन्हा एकदा इथे प्रतिक्रिया लिहायला आले आहे. दोन तक्रारी करण्यासाठी! एक तर हे पराठे मी इतक्या वेळा केलेत - एकदाही मला पोटभर मिळाले नाहीत ... कितीही केले तरी कमीच पडतात. तेंव्हा मला हे तुझ्या हातचे आयते खायचेत आता! ;) आणि दुसरी, जास्त गंभीर तक्रार म्हणजे कुठे गायबली आहेस तू? वर्ष होऊन गेलं इकडे फिरकली नाहीयेस!
ReplyDeleteगौरी, अगं आत्ता पाहतेय तुझा अभिप्राय... खूप खूप धन्सं गं! :)
ReplyDeleteहाहा.. !! अगदी अगदी! मी खिलवते तुला. :) एकदा खाशा बेत करुयात की. मी पुण्याला आले की तुला सांगते. :) अगं, हो नं. खरेच फार मोठ्ठा ब्रेक झालाय माझा. खरे तर मनात खूप काय काय असते पण... :( :( ब्लॊगचा उपवास आता सोडायलाच हवाय.. :)
पुन्हा एकदा धन्सं गं! :)