जाता जाता एक नजर इथेही........
Tuesday, May 5, 2009
मेरे कदम बहकने लगे हैं
लहानपणापासूनच ह्याचे मला भारी आकर्षण होते. अगदी लग्न होऊन पोर झाल्यावर त्याला काखोटीला मारून मी तिथे उभी राही. आमच्या घरात सगळेच त्यावरून माझी फार थट्टा करीत. बराच वेळ मी दिसले नाही तर आई किंवा बाबा म्हणत, " कारटी गेली वाटते वास घ्यायला. " आणि हसत. गोंधळलात ना? सांगते, सांगते.
कारटी, संधी मिळाली की पेट्रोलपंपावर जाऊन उभी राही. गाड्यांमध्ये पेट्रोल भरताना खाली सांडेच. डांबर, धूळ-माती आणिक कायकाय ह्या सगळ्यांशी त्याचे खेळून झाले की आसमंतात एक वेगळाच वास रेंगाळत राही. ही क्रिया अव्याहत चालू राहत असल्याने दिवसातून कुठल्याही वेळेला गेले तरी तोच मस्त वास. शाळेत जाता- येताना जितके पेट्रोल पंप लागत तितक्या ठिकाणी पाच मिनिटे माझा पुतळा. मोठे मोठे श्वास घेऊन मनसोक्त तो वास मी भरून घेत असे. आत्मा शुद्ध होऊन संतुष्ट झाला की मगच पुढे जायचे की लागलीच दहा मिनिटात पुन्हा आत्म्याला मोका मिळे.
पावसाळ्यात तर आणिकच मजा असे. रस्यावरही गाड्यांमधून पेट्रोल सांडलेले असेच. पावसाचे मोठे मोठे थेंब ह्या मिश्रणावर पडत आणि सुंदर इंद्रधनुष्यी ओघळ वाहत असत. जागोजागी डबक्यात साचलेल्या पाण्यावरचा हा तवंग मंत्रमुग्ध करीत असे. "अग, डासांची कॉलनी असते त्या डबक्यात नको ना जाऊ तडमडायला. मलेरिया होईल गं. " आई सारखी ओरडे. शेवटी एक दिवस तर तिने बाबांना सांगितले एका कॅन मध्ये थोडे पेट्रोल घेऊन या, म्हणजे निदान ही घरात तरी राहील.
अजूनही जेव्हा जेव्हा मायदेशात येते तेव्हा तेव्हा कमीत कमी दोन चार वेळेला तरी पेट्रोलपंपावर फेरी मारतेच. मेलं इथे अनेक गॅस स्टेशनवर अगदी हुंगून हुंगून पाहिले पण छे, त्या वासाचा पत्ता नाही. नवरा खोखो हसतो. म्हणतो, " एक दिवस कोणीतरी हडहड करेल गं, किती वेडेपणा करतेस. " मी नाक उडवते आणि पुन्हा शोध चालू.
कुठेतरी ऐकलेले वाचलेले आठवतेय, काही लोक म्हणे नशा चढायला पेट्रोल पितात आणि मरतात. खरेखोटे कोण जाणे, पण हे असे भरभरून श्वास घेतले ना की एकदम तरतरी येई. अरे हे मन म्हणजे, लागलीच लागले धावायला. पोचले सुद्धा दादरच्या चित्रा सिनेमाजवळच्या पेट्रोलपंपावर. मस्त, मस्त. लागली तंद्री...
मुझे छू रही हैं पेट्रोल तेरी गर्म साँसें
मेरे रात और दिन महकने लगे हैं
तुझे सुंघके मेरे कदम बहकने लगे हैं....
लेबले:
अनुभव-प्रकटन-गंमत
7 comments:
आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.
आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !
Subscribe to:
Post Comments (Atom)
बाई ग हाच नाद माझ्या मुलाला सुद्धा आहे..त्यामुळे आम्ही वरचेवर गाडीत पेट्रोल भरत असतो...पंपावर आमचा असाच मुक्काम असतो ५-१० मिनिट....
ReplyDeleteTanvi
माझ्याच जातकुळीतला दिसतोय.:) धन्यवाद तन्वी.
ReplyDeleteएकदा असाच एका पेट्रोल भरणा-या माणसाशी गप्प मारत होतो...तर तो मला म्हणे की पेट्रोलचा वास गुंगी आणणारा आणि addictive असतो...:D
ReplyDeleteहा हा हा..वाचुन् खरच मज्जा आली..असे ऐकीले होते की ब~याच लोकान्ना पेट्रोल चा वास आवडतो.पण त्यात माझी ही मैत्रीण ही असेल असे कदापी वाटले नव्हते...Good !!!!!
ReplyDeleteनक्की नक्की. प्रतिक्रियेकरीता आभार Krishnakath.
ReplyDeleteहाहाहा....धन्यवाद उमा.
मलाही पेट्रोलचा वास खूपच आवडत असे पण दमा लागायला लागला आणि मग ..................
ReplyDeleteआई
आई,अरे हे तर मला माहीतच नव्हत. :)
ReplyDeleteधन्यवाद.