रताळे बटाटे वड्या
जिन्नस
- दोन मोठी रताळी
- दोन मध्यम बटाटे
- एक मोठी वाटी साखर
- एक चमचा साजूक तूप
- दोन चमचे रिकोटा चीज/खवा
- दोन चमचे बदामाचे पातळ तुकडे
मार्गदर्शन
रताळी व बटाटे उकडून घ्यावेत. नंतर साले काढून स्मॅश करावे. त्यात साखर व तूप घालून मिश्रण मध्यम आचेवर ठेवावे. सारखे ढवळत राहावे. साखर वितळली की थोडेसे पातळ होईल परंतु पाच मिनिटातच घट्ट होऊ लागेल. अजून पाच मिनिटाने रिकोटा चीज घालून एकजीव करावे. ढवळत राहावे. वड्या पडतील इतके घट्ट झाले की उतरावे. नंतर बदामाचे काप व वेलदोडा पावडर घालून मिश्रण ढवळावे. एका ताटाला थोडेसे तूप लावावे व त्यावर हे मिश्रण थापावे. किंचित कोमट झाले की वड्या पाडाव्यात, शोभेसाठी वरून प्रत्येकी एक काजूचा काप लावावा वफ्रीज मध्ये ठेवावे. पूर्ण थंड झाले की वड्या काढाव्यात.
No comments:
Post a Comment
आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.
आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !