


प्रदूषणाने निसर्गाचा समतोल ढळला आहे, अव्याहत ढळतो आहेच. ह्यावर कशी मात करता येईल ही चर्चा गेली अनेक वर्षे सतत होते आहेच. ह्या प्रयत्नांनी खूप प्रमाणात जनजागृतीही झालीय. सगळ्या लोकांना किमान थियरी म्हणून तरी हे नक्की पटलेले आहे. आचरणात आणताना अजूनही आपण अनेकदा कमी पडतो परंतु जाणीव आहे. प्रदूषण सगळ्या थरात होत आहेच, हवा, जमीन, पाणी आणिही बऱ्याच गोष्टीत.
काही दिवसांपूर्वी एक सुंदर चित्रफीत पाहावयास मिळाली. पाण्यात, खास करून समुद्रात सापडणारे कोरल्स आपण बरेचदा पाहतो. प्रत्यक्षात, कधी डिस्कवरीवर. अप्रतिम रंग, आकार. एक वेगळीच मोहक नगरी आहे ही. अत्यंत आकर्षक असे हे समुद्री जीव माणसाच्या स्वार्थापायी, हलगर्जीपणामुळे दुखावले जात आहेत. काही ठिकाणी तर नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. मासे, अनेक प्रकारचे वेगवेगळे जलचर व कोरल्स हे परस्परांसाठी पूरक असल्याने ह्या सगळ्यांवर प्रदूषणाचा एकत्रित परिणाम ठळक दिसू लागला आहे. नष्ट होत चाललेल्या कोरल्सना क्रोशेच्या माध्यमातून वाचविण्याचा एक आगळाच उपक्रम Margaret Wertheim राबवीत असून जगभरातून तिला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. विणलेले काही नमुने व चित्रफीत सोबत दिली आहेच. जरूर पाहा. धन्यवाद.
चित्रफीत येथे पहा:
हे नेमकं आहे कुठे ??? एखादी link आहे का ???
ReplyDelete:) sunder ahet.
ReplyDeleteरोहन,Utube link दिली आहेच खाली. पाहिलीस का? Chicagot जवळ जवळ 5000sqft जागेत हे प्रदर्शन भरविलेले आहे.
ReplyDeleteमहेंद्र, रोहन धन्यवाद.
mastach aahet....
ReplyDelete