सतत काहीतरी करत राहायचे, शिकत राहायचे या नादाने पछाडलेले असल्याने बरेचदा अनेक गोष्टी आत्मसात केल्या जातात. पण लगेच पुन्हा एखादे नवीन आकर्षण समोर येते आणि आधी शिकलेल्या कलेवर पुरेसे काम म्हणा, हात साफ करणे म्हणा होत नाही. मग आत्मसात तर केलेय पण त्यात तितकी नजाकत, सफाई न आल्याने मन खट्टू होते. गिरवणेच राहून गेले तर वळणदार अक्षर येईलच कसे? पुन्हा नुसतेच वळण नाही तर एकसंधपणा नितांत गरजेचा. अन्यथा लयच हरवायची. घाईघाईत केलेली कलाकृती मनासारखी जमणे कठीणच. त्यातून पुरेसा वेळ व पेशन्स याचेही गणित जमवणे दुरापास्त होऊन बसते. अशा अर्धवट, धेडगुजरी गोष्टी एकावर एक जमतच जातात. ' एक ना धड भाराभार चिंध्या ' सारखी गत.
छे! ये ना चालबे! असे म्हणत मनाचा हिय्या केला आणि गाठोड्याची निरगाठ उकलली. अनेक डोकी अहमिकेने, ' मी मी ' करत, एकमेकांना बाजूला सारून गलका माजवू लागली. आधीच मन दोलायमान त्यात नेमका कशाला हात घालावा हे चक्र भिरभिरत होतेच. भर्रकन गाठोडे बांधून टाकले. मात्र कोठीच्या खोलीत सारले नाही. दिसू देत समोर सारखे. ते ही बेटे आता ऐकेना. सारखी चळवळ सुरू झाली. आतला गलका वाढतच होता. त्यांनी आता एकोपा करून माझ्यावर हल्ला चढवलेला. मग सपशेल शरणागती पत्करली आणि गाठोडे थोडेसे किलकिले करून एक बाड बाहेर काढले.
जवळजवळ एक तप झालेले त्यामुळे बरीच धूळ जमली होती. जसे ड्रायव्हिंगचे, पोहण्याचे तसेच बहुतांशी इतरही कलांचे असते-असावे. पण मन साशंक होते. शोमूसाठी शेवटचा स्वेटर विणला होता तेव्हा तो प्रायमरीत होता. जमेल का? का उगाच कोठीच्या खोलीत लोकरीच्या गुंड्यांची भर होईल. नकारात्मक प्रश्नांची सरबत्ती सुरू होऊ लागलेली. सरळ उठले, गाडी काढली आणि दुकान गाठले. विलक्षण सुंदर दिसणारे निरनिराळे लोकरीचे रंग, पोत मोह घालू लागले. प्रत्येकाला गोंजारत, मऊमऊ स्पर्श अनुभवत कोणाकोणासाठी विणावे ची यादी गुंफू लागले. असेच करून ठेवू मग पाहू कोणाला होईल ते, हा प्रकार मला झेपत नाही. समोर चेहरा हवाच. म्हणजे मग रंग, वीण, पोत कसे आपसूक जुळतात. माझा मायदेशी जाण्याचा योग लगेच येणार नव्हता पण नचिकेतची धावती भेट ठरलेली. त्यामुळे त्याच्याबरोबर देऊ धाडून या होर्याने अंदाजे मापे योजली आणि धडाका लावला. इथेही ऋषांक-आरुष व आदितेय होतेच. गौराबाई ही मस्कत वरून खुणावत होत्या. दोन्ही हात कमरेवर घेऊन ठसक्यात उभी गौरा दिसत होती. " मावशे, माझी 'याद' आहे ना? " सुरवात जोरदार केली खरी पण भीती होतीच. लोकरीचे गुंडे जागोजागी दिसतील असे पेरून कोठीच्या खोलीला नो एन्ट्री चा बोर्ड लावून जय्यत तयारी केली. :) आणि चक्क आरंभशूर न ठरता बरीच मजल मारली. त्यातले काही नमुने सोबत जोडतेय.
( अजूनही आहेत काही व विणकामाचा नाद जोरावर आहे... :) दुसर्या भागात टाकते )
तुझ्या पोस्टला दिलेल्या लेबलप्रमाणेच मलाही पोस्ट (आणि पाठवलेले स्वेटर/टोप्या बघूनही) खूप खूप 'आनंद' झाला. अगदी 'मनातलं' लिहिलंयस असं वाटलं :)
ReplyDeleteमला माहित आहे तू रागावशील पण तरीही खूप खूप आभार्स, श्रीताई :)
हेरंब, का उगाच xxx देतो आहेस?
ReplyDeleteआभार्स! :)
मी तुला हेरंबसारखं लिहिलं तर रागावशील पण तुला सांगु ऋषांक झाल्यानंतर पोस्टाने किंवा प्रत्यक्ष ज्या काही गिफ़्टा आल्या त्यातली सगळ्यात स्पेशल, लाडकी आणि जी काय विशेषणं असतील ती फ़क्त तुझा स्वेटरसेट आहे कारण त्यात तुझी मेहनत आहे आणि अर्थातच खूप सारं प्रेम...एकटीने केलेल्या गोष्टींचं ओझं तुझ्यामुळे हलकं झालं गं.....
ReplyDeleteआता on a lighter note मेरा नंबर कब आएगा ताई??
अपर्णा, अगं मलाही खूप आनंद झाला आरुष व ऋषांकसाठी विणताना. मी प्रत्यक्ष येऊ शकले नाही याची थोडी कसर काढायचा प्रयत्न केला. :)
ReplyDeleteथोडा धीर धरो रे.:P
धन्यवाद गं.
हम्म्म्म. :) लांब बाह्यांचा, पुलोव्हर हवाय मला. आणि मिडीयम साईजचा वीण. उगाच 'स्मॉल'च्या नादात जाऊन घट्ट नको व्ह्यायला मला. नाही का ? कधी पर्यंत होईल गं ? :p
ReplyDeleteअनघा, पुढच्या भेटीत नक्की. माझा हात सैल आहे बरं. त्यामुळे वीण नाजूकशी घातली तरी तुला छान होईल. :)
ReplyDeleteहि पोस्ट वाचुन आणि स्वेटर्स टोप्या बघुन एक गाणे आठवले..इथे तुला आवाज ऐकु जाणार नाही..फोन वर ऐकवीन...बोल काहिसे असे आहेत...
ReplyDeleteहम भी अगर बच्चे होते नाम हमारा होता बबलु टबलु....पहननेको मिलते....श्रीमावशी के हाथके ...:P..और दुनिया कहती हॅप्पी बर्थडे टु यु...
मुझे भी मुझे भी:((
बयो मस्तच गं :) .... अगं गौराई तर तो स्वेटर आत्ताच दे म्हणे, AC Full वाढवूया आणि स्वेटर घालूया म्हणे :)
ReplyDeleteआता AC Full केला तर आम्हालाही थंडी वाजेल गो बयो :)... समजंलं का काय म्हणतेय मी :)...
फु.सल्ला.... दगदग कमी कर जरा कृपा करून :)
अमेरिकेतला शेजारधर्म पाळ्ताय... आणि गणेशवाडी मधला कोण पाळणार??? इथली ऑर्डर पण घ्या आता... :P
ReplyDeleteउमाबेन,बस देर है तो तुम्हारे मुन्नी बनने की :) क्या खयाल हैं? ;):D:D:D
ReplyDeleteतन्वे, अगं इथे हे दोघेही मला हसत होते. म्हणे आता मस्कतला फूल AC लावा म्हणाव तर स्वेटर घालवेल दोन मिनिटे तरी... नाहीतर पेटीची धन. हेहे... बाकी तुमच्या थंडीची सोय तुम्हीच करा की... ;) काय???
ReplyDeleteरोहना, मी तर कधीपासून वाट पाहतेय त्या ऑर्डरची... कळले ना? मग, काय खयाल आहे आपला??? ;)
ReplyDeleteछान विणल्या आहेस की गो! एकदम आवड्या !!!
ReplyDelete@ Anagha :D
बल्क ऑर्डर घेता का... हा हा ... :D तू फोन करणार होतीस ना...आता मीच करीन तुला उद्या - परवा फोन..
ReplyDeleteसगळ्या मुलांचे फोटो समोर आले त्यांच्या स्वेटरांसकट! :D:D
ReplyDeleteमस्तच! :)
आले ना सगळे डोळ्यासमोर... :) म्हणूनच तर बिनचेहर्या साठी इतकी मेहनत नाय बा करू शकत... :D:D
ReplyDeleteधन्यू रे विद्या.
mast:) khup chan jamalya ahet.
ReplyDeleteआभार महेंद्र. :)
ReplyDeleteअप्रतिम दिसताहेत... आदितेयचा तो फोटो आला डोळ्यासमोर.. कित्ती क्युट दिसत होता या स्वेटरमध्ये, बाकीचेही असेच सुंदर दिसत असतील... या मुळेच तुझा अल्टरनेट बिझनेस ठरवला गेला ना.. इथं बघ http://manatkayaahe.blogspot.com/2011/03/blog-post.html
ReplyDeleteहेरंबा, कमेंट खूप आवडली तुझी :)
धन्यू रे आनंदा. मला माहीतच नव्हते. बरे झाले लिंक दिलीस. लगेच पाहते. खरेच आदि कसला गोड दिसत होता ना, :)
ReplyDeleteआणि मी पुढेमागे ’ धाबा ’ काढायचा विचार करतेय... ;)
khup diwast navi post ka nahi....suti suru aahe kay?
ReplyDeleteतुझ्या पोस्टची वाट बघून थकलो बाबा.... :( सुट्टी सुरू व्हायची वेळ जवळ आली माझी... मग लिखाण वाचनात खंड पडतो... :)
ReplyDeleteएका अत्यंत महत्वाच्या विषयावर तुझ्याकडून पोस्ट लवकर येईल अशी आशा करतोय... :D
प्रसाद, ही सक्तीची सुट्टी आहे. :) अरे घरात खूप गडबड. त्यामुळेच जरा ब्लॉगची आबाळ होतेय. लवकरच लिहीते. आठवण काढलीस, खूप आनंद झाला. धन्यू.
ReplyDeleteरोहना, खरेच की. तुझी परतायची वेळही आली.लिहीते एकदोन दिवसात नक्की. :)
ReplyDeleteBhagyashree, kiti sunder viNkaam kele aahes ga tu!! khuuup aavadale. mi tuzya javal rahayla aste tar sarv kaahi shikle aste. mastach!
ReplyDeleteरोहिणी, अगं तुझी प्रतिक्रिया पाहून कोण आनंद झाला मला. धन्यू गं.
ReplyDeleteआपण जवळ राहत असतो तर किती तरी देवाणघेवाण झाली असती ना... :)
All rounder ahat pretak Gosht kiti shaj Jamte tumhala. Very Nice.
ReplyDelete