रवा केक ( अंडरहित )
साहित्य :
१ सपाट वाटी मध्यम रवा
१ सपाट वाटी साखर
सव्वा वाटी दही
काजू, बदामाचे काप, बेदाणे, इत्यादी आवडीनुसार ( सगळे मिळून दोन चमच्यापेक्षा जास्त घालू नये )
१ सपाट चहाचा चमचा वेलची पावडर
७/८ काड्या केशर (मिसळण्याआधी १५ मिनिटे चमचाभर दुधात भिजत घालून खलून घ्यावे.)
अर्धा चमचा खायचा सोडा
पाऊण चमचा तूप
कृती :
एका पातेल्यात रवा घ्यावा. त्यात साखर आणि दही मिसळावे. मिश्रण चांगले ढवळून ठेवावे. सुमारे अर्धा तास. तेव्हढ्या वेळात रवा चांगला उमलतो. हे मिश्रण साधारण श्रीखंडाइतपत घट्ट-सैल असायला हवे. त्याचा घट्ट-सैलपण मुख्यत: रव्यावर अवलंबून असतो. रवा जरा जास्त जाड असला तर मिश्रण घट्ट होऊ शकते. घट्ट झाले असेल तर थोडेसे पाणी घालायला हरकत नाही. मिश्रण बहुधा सैल होतच नाही. दहीच पातळ असेल तर मिश्रण पातळ होऊ शकते. मग अशा वेळी पुन्हा थोडा रवाच घालावा लागतो. आणि उमलू द्यावा लागतो. मिश्रण तयार झाल्यावर त्यात वेलची पावडर आणि खललेले केशर घालून चांगले मिसळून घ्यावे. त्यात खायचा सोडा घालावा आणि ५ मिनिटे ठेवावे. त्या ५ मिनिटात फ्राय पॅन तयार करून घ्यावे. फ्राय पॅनला तूप लावावे. हलक्या हाताने मिश्रण ढवळून संपूर्ण मिश्रण फ्राय पॅनमध्ये ओतावे. (आवड असल्यास केकमध्ये सुकी फळे घालावी. त्यामुळे मूळ चव बदलत नाही पण दिसायला चांगले दिसते. )
गॅसवर लहान लोखंडी तवा ठेवावा. (डब्याचे झाकण किंवा तत्सम काहीही चालेल.) त्याच्यावर फ्राय पॅन ठेवावे. म्हणजे गॅसची आच फ्राय पॅनला कमी प्रमाणात आणि सगळीकडे सारखी लागेल आणि केक करपणार नाही. साधारण १५ मिनिटांत केक तयार होतो. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. गॅसच्या शेगड्या आणि त्यांचे बर्नर लहान-मोठे असतात. अर्थात त्यांची आचही कमी-अधिक असते. त्यामुळे वेळेचा अंदाज प्रत्येकाला वेगळा घ्यायला हवा. फ्राय पॅनपेक्षा मोठ्या आकाराचे ताट त्याच्यावर उपडे घालून नंतर फ्राय पॅन त्यावर उपडे करावे म्हणजे केक अलगद निघून येईल. त्याची पहिली वाफ निघून जाईपर्यंत तो तसाच राहू द्यावा.
केकच्या चौकोनी किंवा आपल्याला पाहिजे असतील त्या आकाराच्या वड्या कापाव्या. समजा आपल्याला त्यावर काही नक्षी काढायची असेल किंवा कुणाचे नाव लिहायचे असेल तर केक पूर्ण गार होऊ द्यावा आणि नंतर नक्षी काढावी/ नाव लिहावे.
आंब्याचा रस घालायचा झाल्यास दही अर्धा भाग व आंब्याचा घट्ट रस अर्धा भाग असे घालावे. केक लगेचच खाऊन संपणार असेल तर आंब्याचे तुकडेही घालावेत. अप्रतिम लागतात!
केक थोडासा खरपुसच होऊ द्यावा. मात्र आचेकडे लक्ष द्यावे, पट्कन लागू शकतो. जर चुकून करपलाच तर तळाचा भाग अलगद कापून काढावा. केक करपला तरी वरच्या भागाला करपल्याचा वास लागत नसल्याने संपूर्ण केक फुकट जात नाही.
हा केक गरमगरम खायला फार चांगला लागतो किंवा गारही चांगला लागतो. केक ५/६ दिवस टिकावा म्हणून फ्रीजमध्येच ठेवावा. पण फ्रीजमध्ये ठेवलेला थंडगार मात्र खायला चांगला लागत नाही. म्हणून फ्रीजमधला केक किंचित ( अगदी किंचितच )पाणी शिंपडून मायक्रोवेव्हमध्ये गरम करून खावा. अगदी ताज्या इतकाच चांगला लागतो.केक थोडासा खरपुसच होऊ द्यावा. मात्र आचेकडे लक्ष द्यावे, पट्कन लागू शकतो. जर चुकून करपलाच तर तळाचा भाग अलगद कापून काढावा. केक करपला तरी वरच्या भागाला करपल्याचा वास लागत नसल्याने संपूर्ण केक फुकट जात नाही.
( माझा हात केशराला जरा जास्तच सैल असल्याने थोडे जास्त घातले आहे. हा जो सोनसळी रंग दिसतोय तो त्याच्यामुळेच आला. वर लिहील्याप्रमाणे घातल्यास जरासा फिकट रंग येईल इतकाच काय तो फरक. )
किती छान अगं ! मस्त ! मला ह्याची सुरुवातच खूप आवडली ! म्हणजे खरंच झटापट म्हणून तो शिरा आणि ती खीरच येते डोक्यात ! मस्त ! मी करेन हा कधीतरी ! आणि सांगेन तुला. :)
ReplyDeleteभाग्यश्री,
ReplyDeleteवा! वा!! छानच झालेला दिसतो आहे केक. केशराची रेलचेल केली आहे्स. रंग मस्त आला आहे. नचिकेतला आवडला म्हणतेस म्हणजे तुझे भाग्यच म्हणायचे. अर्थात तू भाग्यश्री आहेसच. नाव सार्थ झालं. अख्खा ठेवला आहेस त्याचा रंग फारच सुंदर दिसतो आहे. नक्षी करण्यासाठी फक्त खालची बाजू वर घ्यायला हवी ना? एकंदरीत उत्त्त्तम!!
नचिकेत-आई
ज ब र द स्त....!!
ReplyDeleteह्या आठवड्यात करून बघतो नक्की :) :)
खर तर असले पदार्थ पोस्टवर केवळ वाचण्याऐवजी थेट खायला मिळाले (आयते अर्थातच!) तर जास्त बर होईल :-)
ReplyDeleteमस्त! आणि निषेध! :)
ReplyDeleteयमयमित दिसतोय...:) सही...
ReplyDeleteफक्त मला मुदलात रवा, रवा लाडू आणि शिरा हे प्रकार आवडत नाहीत (आणि घरात सर्वांना तेच जास्त आवडतात हे वेगळं सांगायला नको..) आई लहानपणी रव्याच्या केक (मला वाटत अंड्याचा असू शकेल) करायची तो पण मी फार चाहती नव्हते...असो...
..................................................................
या पार्श्वभूमीवर मला हा केक कुणी करून खायला दिला तर मी नक्की तयार आहे....(तुला काय वाटलं मी काय लिहिणार इतका इतिहास लिहून..:D)
रव्याचा केक म्हटलं की मला माझ्या आजीची सय येतेच. तिच्या केलेल्या रव्याच्या केकची चव फारच अप्रतीम असायची. मला वाटत ती त्यात नारळाच दुध टाकत असावी. अर्थात तुझ्या पद्धतीने केलेला केक सुध्दा चांगला होतोच.
ReplyDeleteअनघा, त्या दोहोंच्या ऐवजी खरेच हा ऑप्शन छान आहे आणि होतोही झटपट! केलास की सांग गो... धन्सं!
ReplyDeleteआई, पहिला तुकडा खाल्ला आणि लगेच म्हणाला, " आई पूर्वी करायची तसाच झाला आहे अगदी. " :):)
ReplyDeleteआभार्स!
सुहास, सांगशील मला कसा झाला ते. :) आच मध्यम ठेव बर का रे. गॅस भसाभसा पेटतो एकदम. आणि निवल्याशिवाय कापू नकोस नाहीतर नीट वड्या पडायच्या नाहीत.
ReplyDeleteधन्यू रे!
हा हा... दोहोंसाठी धन्यवाद गौरी. :)
ReplyDeleteसविता, कोण जाणे अजून काही वर्षांनी असे फोटोतून उचलून खाण्याची सोय निघेलही... टेक्नॉलॉजी का कमाल ये भी दिन दिखला सकते हैं... :D:D:D
ReplyDeleteआभार्स!
हीही... मला वाटले पुढे तू म्हणते आहेस की या तीन पोरांसाठीच दे धाडून... :) ट्राय कर अपर्णा, कदाचित आता तुला आवडेल... :D:D
ReplyDeleteधन्यू गं!
देवेन, चला आजीच्या हातच्या रव्याच्या केकच्या ओढीने का होईना तुझे दर्शन तर झाले. :):)
ReplyDeleteआभार्स!
asha padhtine resipi dakhwoon chal karne gunha aahe.....ychi shiksha wel aali ki dili jael....toparyant nishedhhhhhhhh.....(photo pahun tondla pani sutle....bhannat lagat asel na test)
ReplyDelete:-9
ReplyDeleteतोंडाला पाणी सुटलं. दुपारी ही रेसिपी बायकोला नेऊन देतो :)
करून (आणि खाऊनही) बघितला आजच. छानच झाला.
ReplyDeleteमी केलेले बदल - भाजलेला रवा घरात होता, तोच वापरला. दही जरा अंबट झालेलं होतं, तसंच घातलं. कमी गोड आवडतं, त्यामुळे साखर कमी घातली. केशर जरा कमीच पडलं. बाकी खायचा सोडा आणि वेलची मात्र अगदी तुझ्या प्रमाणानुसार घातलीय ;) :D:D:D
प्रसाद, गुन्हेगाराला गुन्हा मान्य आहे आणि केक बनवून खिलवण्याची शिक्षाही मान्य आहे. :)
ReplyDeleteधन्सं!
श्रीराज, पाहीलात का करून? आवडला का?
ReplyDeleteअरे वा! लगे हात करूनही पाहिलास का गौरी. अगं, थोडेफार इकडेतिकडे झाले तरी मोठ्ठा फरक पडत नाहीच. शेवटी सगळे गाडे चवीशीच असते... :)
ReplyDeleteरेसिपी छानच आहे आणि सोप्पीपण...
ReplyDeleteआत्ताच करून आणि खाऊन पाहिला....
:P
मस्तच झालेला...!!
Thanks for sharing..
:)
मी कामावर आलो की अंगात येते ना तुझ्या. तयारच असतात तुझे पोस्ट. मी पोचलो कामाला की दे टाका. हल्लाबोल... कुठे फेडणार हे तू. अर्थात गणेशवाडीमध्ये. अजून कुठे!!!
ReplyDeleteआलीस की मला सर्व बनवून हवंय. आण हो कधी येते आहेस? पास रिन्यू केलास का? हे हे हे ... :D
किती सोपी,न चुकणारी व झटपट होणारी रेसिपी आहे नं ही. गायत्री तुला आवडला केक हे ऐकून छान वाटले. :)
ReplyDeleteधन्यवाद!
रोहना, अरे कधीपासून वाट पाहत होते तुझ्या टिपणीची. :D तुला माहीतीये आतून नुसते क्रेविंग्ज येत आहेत पास रिन्यू करण्याचे... त्यात तू मला भरीस घाल म्हणजे मग सिरियसली विचार करायला हवा. ( अपर्णा मारेल मला :D:D )
ReplyDeleteचला पाप फेडायच्या तयारीला लागते.मग खिलवणे आलेच की ओघाने... :)
भानस, रेसिपी नेऊन दिलेय पण तो पदार्थ केव्हा बनेल काय माहीत? :(
ReplyDeleteBhagyashri tai,
ReplyDeletechaan recipe aahe.Mi karun pahila.mi tyat tup kadhavun urleli beri vaparli.khamang cake tayar jhala.patkan sampalahi.nehmichya shirya peksha vegle kaahi tari.
pushpa
धाडणेबल असेल तर धाड की...आम्ही धाड पडू लगेच...:D
ReplyDeleteहे वाचताना मलाच धडाम धाड होतंय...
पुष्पा, अगं माझी आईही बेरीचा उपयोग करते असा. फक्त तूप कढवताना थोडे लक्ष ठेवायला हवे, बेरी करपू देता नये. किती चटकन संपतो पाहीलेस नं... पदार्थ लोळत पडला की कंटाळा येतो.
ReplyDeleteआभार्स !!
चार दिवस प्रवास केकला झेपणार नाही गं बयो... नाहीतर लगेच धाडून दिला असता. अपर्णा, अगं चुकणारच नाही तू कर ट्राय. :)
ReplyDeleteसॉरी श्रीताई.. या पोस्टवर कमेंट राहूनच गेली. माझ्या ब्लॉगरमधे दिसलीच नव्हती ही पोस्ट.
ReplyDeleteआमच्याकडे माझ्या लहानपणी खुपदा व्हायचा रव्याचा केक.. हल्ली बऱ्याच वर्षात खाल्ला नाहीये :(
सॉरी काय रे त्यात... ब्लॉगर गंडवते मधून मधून... :D:D
ReplyDeleteआता खूप वर्षांचा उपास सोडून टाक... :)
केक हा माझा वीक पॉईंट..
ReplyDeleteआणि बेस्ट दिसतोय फोटो! :)))
धन्यू विद्याधर! अख्ख्या वर्षभराने पोच देतेय म्हणजे आता किमान तुला केक खिलवावाच लागेल. :)
DeleteI tried your recipe and it turned out to be really awesome! khupach chaan hoto ha cake. Thanks :)
ReplyDeleteधन्सं! केक छान जमला हे ऐकून आनंद झाला. चला आता त्यानिमित्ते मीही पुन्हा करतेच आज. :)
DeleteAfter I tried your recipe (with keshar), I tried to make it without keshar. I used 1/2 teaspoon vanilla essence instead of keshar and added walnuts and roasted almonds to give it a different flavor. That too turned out to be very yummy :)
ReplyDeleteAta chocolate flavor karun baghnar aahe!
अरे वा! आक्रोडाबरोबर खजूर टाक म्हणजे अजूनच एक वेगळा फ्लेवर येईल. खमंग लागेल. चॉकलेट्सचा ही छान होतो. वरती किसून टाक आणि आतमधे जरा जाड तुकडे. मुले उड्या मारुन खातील. :)
ReplyDeleteमला वाटते की तुला http://sardesaies.blogspot.com/2010/02/blog-post_16.html हे ही आवडेल. :)
धन्यवाद!
mastach.... pan fry pan war zakan thevaych ki nahi?
ReplyDelete