जाता जाता एक नजर इथेही........

Friday, November 5, 2010

मधुबनी

मधुबनी

वर्षभर घोकत होते, मायदेशी जायला मिळाले तर, " मधुबनी, वारली, पेपर क्विलिंग, कॅलिग्राफी " सारख्या छोट्यामोठ्या गोष्टी शिकेन. " चाह हैं तो राह मिलती ही हैं ", च्या उक्ती सारखे गेल्या आठवड्यात किराणामालाच्या दुकानात अचानक आईबरोबर गेले. दुकानाच्या भिंतीवर चिकटवलेली क्लासची जाहिरात दिसली. लगेच मी त्या नंबरवर फोन केला आणि दुस‍र्य़ा दिवसापासून एकंदरीत चारदिवसाचा ( रोजचे तीन तास ) क्लास सुरू झाला.

माझे सहअध्यायी वय वर्षे तीन ते दहा या वयोगटातले. जवळपास पंधरा अठरा मुलांचा मस्त दंगा होता. काही मुलांनी त्यांच्या वयाच्या मानाने खूपच छान, सफाईदार काम केले. त्यांचे गोड गोड बोलणे, टीचर टीचर करत मध्ये मध्ये लुडबुडणे. मधूनच चालणा‍र्‍या मारामार्‍या.... थोडासा वेळ गेला की लगेच, " मॅम भूख लगी है। टिफीन खाऊं? " मग तो खाताना सांडलवंड, चिडवाचिडवी.... वेळ कसा गेला हेच कळत नसे. पेपर बॅग्ज, पाकिटे, हँडमेड पेपर, पणत्या रंगवणे, क्राफ्ट या साऱ्या गोष्टी मुलांनी आवडीने केल्या.

त्या भाऊगर्दीतही मी माझ्या परीने काही शिकण्याचा प्रयत्न केला. मधुबनीतील एक छोटेसे चित्र वर दिले आहे. अतिशय सुंदर कला आहे ही परंतु फार किचकट काम. दोन दिवसात हे एक छोटेसे चित्र मी पुरे केले. मनसुबे तर मोठे मोठे रचलेत पाहू चिकाटी कुठवर साथ देतेय... :) ही कला शिकता आल्याचे समाधान तरी नक्कीच मिळाले.
( पहिलाच प्रयत्न असल्याने अचूक व नेमकी सफाई नाही अजून हाताला... )

26 comments:

  1. >> अचूक व नेमकी सफाई नाही ????

    काहीही.. त्या मोरांच्या पंखांमधले रंग कसले विलक्षण फ्रेश आलेत पाहिलंस का? मस्तय.. जाम आवडलं..

    एक अत्यंत बालिश (वाटणारा) प्रश्न : मधुबनी म्हणजे नक्की काय? वारली, पेपर क्विलिंग, कॅलिग्राफी ऐकलं/पाहिलं आहे. मधुबनी पहिल्यांदाच ऐकलं.

    ReplyDelete
  2. वा... तू वेळ मस्त सार्थकी लावते आहेस तर... :)

    ReplyDelete
  3. सही मज्जा सुरु आहे.....:)
    Keep it up.

    ReplyDelete
  4. मस्तच जमलंय गं एकदम!!
    सुट्टीचा ह्याहून छान उपयोग काय असणार?

    ReplyDelete
  5. हेरंब, ’ मधुबनी किंवा मिथिला आर्ट ’ हे मिथिलेत घराघरात मातीने सारवलेल्या भिंतीवर काढले जाई. त्यात नैसर्गिक रंग भरत. जास्ती करून देवीदेवतांची,निसर्ग चित्रेच काढत. आता मात्र हॆंडमेड पेपर, कॆनव्हासवर काढले जाते व चित्रांचा प्रकारही बदलतो आहे.तसे असले तरी प्रामुख्याने देवीदेवताच असतात. पण खरेच खूप किचकट आहे. :D
    थांकू. :)

    ReplyDelete
  6. रोहन, विजदेवीच्या लंपडावाला कंटाळून आणि चिडचिडून ( कोणावर हा प्रश्नच आहे... :D) अचानक हे सापडले. मग काय लगेच मी दुपार सार्थकी लावली. :)

    ReplyDelete
  7. अपर्णा, धन्यू गं. दिवाळीच्या शुभेच्छा!!:)

    ReplyDelete
  8. धन्यवाद विभी. :)

    ReplyDelete
  9. छान आलंय गं चित्र! वेळेचा अपव्यय न करता अगदी सदुपयोग चाललाय की!! छान छान! आता जायचा आधी एक छानसं चित्र मला काढून दे पाहू! मग मी लावेन ना हापिसातल्या माझ्या 'मऊ फळ्या' वर! :)

    ReplyDelete
  10. Nice painting. Wish you do not try so much for 'perfection', sometimes it spoils the essence:-)

    ReplyDelete
  11. सुंदर!
    दोन दोन पोस्ट्स पाहून मला वाटले परत आलीस की काय. :) बाकी काय काय केलेस तेही ऐकायचे आहे. Missing you.

    ReplyDelete
  12. tayade he painting pratyaksh aani photo tahi jam sahi disatey :)

    tu dileli warli paintings mi japun thevali aahet... lavakarach tujhe madhubani, warliche mothe mothe paintings pahayache aahet, tevha lag kamala :)

    ReplyDelete
  13. अनघे, पुढच्यावेळी नक्की देईन गं. परवाची संध्याकाळ खूपच छान गेली.धन्यू. :)

    ReplyDelete
  14. धन्यवाद aativas. खरयं तुमचे म्हणणे. कधीकधी अचूकतेच्या नादात आत्माच हरवून जातो.

    ReplyDelete
  15. सीमा, येतेय गं पुढच्या विकांताला. बोलूच मग... :)

    ReplyDelete
  16. तन्वी, काय लिहू गं. आज मन अगदी दाटून आलेय. धन्यवाद म्हणेन तर तू डोळे मोठ्ठे करत धपाटा घालशील म्हणून... फार फार आनंद झालाय व हुरहुरही लागली आहे.

    ReplyDelete
  17. me aaj baghatey tujhi hi post..aillaa bhari kadhaley..nakkich thod kichakat kaam aahe pan tari mast aahe...

    ReplyDelete
  18. चांगले आले आहे गं श्रीताई,
    तेव्हड्यात हे पण शिकून घेतलेस.. क्विलिंग नेटवर पण छान शिकता येईल, तुला सहज जमेल. शुभेच्छा!

    ReplyDelete
  19. खुपंच सुंदर झालंय.. वेळ खुप मस्त सार्थकी लावला ताई तू....

    ReplyDelete
  20. Masta uthavdar rang bharleys ha...Avadla avadla!!!

    ReplyDelete
  21. सही भाग्यश्री मॅम :)

    मस्त आहे चित्र
    ये दिल मांगे मोर :)

    ReplyDelete
  22. मीनल, अगं क्विलिंगही शिकलेच. थोडे तिकडे थोडे नेटवर. सहीच आहे. :)
    धन्यू गं.

    ReplyDelete
  23. आनंद, आपली भेट नाही होऊ शकली... :( चुटपुट लागली बघ. पुढच्या वेळी जमवूच.

    ReplyDelete
  24. धन्यवाद श्रीराज. :)

    ReplyDelete
  25. प्रसाद, बरेच दिवसांनी दिसलास. छान वाटले. धन्यवाद.

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !