कधी टीवीवर, कधी वर्तमानपत्रात, वॉलमार्ट, मायर, इथल्या अनेक ग्रोसरी स्टोअर्समध्ये, गॅस स्टेशनवर........ ज्युसच्या बॉक्सेसवर. जळीस्थळी, लहान-मोठे-म्हातारे चेहरे " मला पाहिलेत का? " चे आयष्याचे न सुटणारे मोठे प्रश्नचिन्ह घेऊन उभे दिसतात. वीस वर्षांपूर्वी हरवलेले बाळ आज कसे दिसत असेल....... बाळाचा फोटो बाजूलाच हा आजचा (कदाचित असा) फोटो. अल्झमायर झालेल्या आजोबांचा हरवलेला चेहरा......नक्की काय हरवलेय हेच शोधत असलेला आणि सापडत नसल्याने काहीतरी घोळ झालाय गं हे सांगणारा...... का आता मी कधीच सापडणार नाहीये गं. चांगले भव्य कपाळ, स्मार्ट, चटपटीत चेहरा असलेली ही तीशीची तरुणी अचानक कामावरून परत आलीच नाही. कुठे गेली? शेजारी जातानाही सांगून जाणारी आज न सांगता कायमची नाहीशी झाली....... दोन मुलांचा बाबा कामानिमित्त फ्लाईट पकडायला गेला.... आणि कधीच परत आला नाही. त्याची बायको व मुले दररोज उभारी धरतात अन दररोज रात्री आपला बाबा नक्की येणार असे एकमेकाला सांगत राहतात. नंतर आपापल्या अंथरुणात मूक रुदन करतात.
लहान बाळं स्वतः पळून जाऊ शकत नाहीत म्हणजेच ती पळवली जातात..... क्वचित काही चांगल्या घरातून वाढवली जातात. काही अत्याचाराला, विकृतीला बळी पडत दररोज मरत जगत राहतात. काही खंडणीसाठी तर काही अंधश्रद्धेतून, काही सेक्स विकृत.......कार्यभाग साधला की क्रूरपणे संपवले जातात. पळवले, हरवले किंवा निघून गेलेल्यांचे काय होते हा मोठा प्रश्न आहेच. परंतु यांच्या कुटुंबीयांचे उर्वरित जीवन अत्यंत दु:खी होते. माझे माणूस कुठे असेल कसे असेल हा प्रश्न एक क्षणही मनातून जात नाही. उत्तर कधीच मिळाले नाही तर संपलेच सारे. माणूस मेलाय हे कळले तर निदान पोटभर रडता तरी येईल. त्याच्या आठवणींना बरोबर घेऊन का होईना पुढे तर जाता येईल. पण हे सतत असंदिग्ध...... जिवंत असेल ना? असेल ना हो.... कोणीतरी सांगा ना? का कोणी जीवे मारले असेल? हाल केले असतील.............हे काळीज कुरतडणारे प्रश्न आणि त्याची फार क्वचितच-बहुतांशी कधीही न मिळणारी उत्तरे.
काल वॉलमार्टात असाच एका तरुण मुलाचा चेहरा पाहिला. ग्रॅज्युएशनचा फोटो होता. चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता...... कोणीतरी समोरून--मॉमने....भावाने, " हे चीज...... " म्हटले असेल........त्यामुळे मोठे स्माईल दिलेला........ काळजात कळ उठली. तारीख अगदी ताजी.......जूनच्या दुसऱ्या आठवड्याचीच होती.... जेमतेम पंधरा दिवस झाले होते त्याला हरवून. त्याला पाहता पाहता एकदम डोळ्यासमोर त्याचा चेहरा आला. ९१ - ९२ ची घटना असावी. ओळखीचे म्युझिक-व्हिडिओ स्टोअर्स वाले, स्नेह नुसता दुकानदार -गिऱ्हाईक एवढाच न राहता थोडासा घरगुतीही होता-आहे. छान कुटुंब होते. पती-पत्नी व एकुलता एक मुलगा.

इंजिनिअर झालेला अतिशय हुशार सरळ मार्गी मुलगा. नुकताच मोठ्या कंपनीत नोकरीला लागलेला. शनी-रवी दोन दिवसांची सुटी होती म्हणून पुण्याला मित्राकडे जाऊन येतो म्हणून घरातून निघाला. निघताना एक मित्र होता बरोबर. दोघेही दादरला एशियाड स्टँडवर गेले. तिकीट काढून हा बसमध्ये बसल्यावर बाय करून मित्र निघाला. काकूंनी सांगितले होते म्हणून मित्राने फोन करून कळवले.... हा निघाल्याचे. चार तासात पुण्याला पोचायला हवा असलेला मुलगा आज अठरा-वीस वर्षे झाली तरी पोचलाच नाहीये. ना घरी परत आलाय. दादर-पुणे या प्रवासात काय झाले असे की हा मुलगा गायब झाला.
पोलीस, नातेवाईक, मित्र, ओळखीचे.....स्नेही...... अनोळखी अश्या अनेक लोकांनी अनेक परीनं अनेक दिवस त्याचा शोध घेतला.... पण...... एकदा कोणीतरी म्हणाले लोणावळ्याला पाहिला त्याला..... भेलकांडल्या सारखा चालत होता. बरोबर कोणीतरी होते. खरे खोटे कोण जाणे तरीही पोलिसांनी, सगळ्या मित्रांनी अख्खा लोणावळा-खंडाळा पिंजून काढले पण काही उपयोग झाला नाही. त्याच्या आईकडे बघवत नाही. त्यांनी जगणेच सोडलेय. जरा खुट्ट वाजले की, आजही कोणी नुसता उल्लेख जरी केला तरी ती माउली डोळ्य़ात प्राण एकवटून चाहूल घेत राहते...... बोलत नाही...... नुसते डोळ्यांनी विचारत राहते.......सापडेल का हो माझा पोर? वडील..... शांत-स्तब्ध झालेत. देहधर्म सुटत नाहीत म्हणून सगळे काही सवयीने करतात खरे...... बापाला धाय मोकलून रडताही येत नाही हो...... जीवही चिवट, जाता जात नाही.
गेल्या वर्षी दुकानात गेले होते.......त्यांना भेटले....... तिथून बाहेर पडले आणि वाटले........मुलगा घरी तरी येऊ दे नाहीतर जिवंत नाहीये असे तरी त्यांना कळू दे. इतकी वर्षे दररोज तिळतीळ मरणारे हे दोन जीव एकदा पोटभर रडून घेतील रे. आता त्यांचे बरेच वय झालेय. एकमेकाच्या आधाराची खरी गरज आता सुरू होतेय. उद्याची आशा नको आता. देवा दया कर. हे अंधातरी, आशा-निराशेच्या हिंदोळ्यावर झुलणे संपवून टाक.
konavarhi asa prasang yevoo naye.... me pan nehmi pahato walmart madhye car, ghar, etc chya adv chya bajulaa missing person che photo....sad.
ReplyDeleteTumhi chaan lihita.
बरेचदा लोकांना अम्नेशिया पण असतो, माझ्या मित्राचे वडिल वय वर्ष ८७ असेच घरुन निघुन गेले ते नंतर दोन महिन्याने अगदी दीन अवस्थेत दुसऱ्या गावाला सापडले! तिथे कसे पोहोचले ते कधिच कळलं नाही.. पण असा प्रसंग कुणावरही येउ नये..
ReplyDeletekhup chhan lihiles g bhagyashree..kalajat agdi kal ali..kharch konavar hi asa prasang yeoo naye.
ReplyDeleteअचानक असं आपल्यातलं कुणी बेपत्ता झाल्यावर बाकी कुटुंबियांची फारच वाईट अवस्था होते. मी असे उदाहरण अगदी जवळुन बघितले आहे. खरोखर क़ुणावरही असा प्रसंग येऊ नये.
ReplyDeleteheera, स्वागत व आभार.
ReplyDeleteमहेंद्र,माऊ, रोहिणी.....:)
खरय
ReplyDeleteपहा ना ही माणसं एकटी हरवत नाहीत
सगळच हरवतं
त्यांच्या कुटुंबाचं जगणं, हसणं, असणं ... सगळच हरवतं
आयुष्य एक रहस्यकथेचं पुस्तक बनतं
ज्याची शेवटची पानं नियतीने क्रूरपणे फाडलेली असतात
'आपण यांना पाहिलत का?' बघताना मीही असाच काहीसा विचार करायचो
लेख आवडला
चुरापाव स्वागत व आभार.
ReplyDelete