डाळ : आपल्याकडे बहुतांशी घरात रोज सकाळ-संध्याकाळच्या जेवणात बनवली जाणारी असून मुख्य पदार्थात गणली जाते. डाळीचे विविध प्रकार असून आकर्षक रंग व खास चवी आहेत. भरपूर प्रोटीन असलेली डाळ प्रत्येक जेवणात गरम भात/पोळी बरोबर खाल्ली जाते. कुठल्याही हॉटेलमध्ये गेलो असता बहुतांशी मागवलीच जाते. लहान मुले-मोठी सगळ्यांची पसंदीदा व हमखास आवडणारी. इतर पदार्थ कसे लागतील, आपल्याला आवडतील का? त्यांच्या चवीबद्दल मनात संभ्रम असतो परंतु तडका डाळ कुठेही गेले तरी चांगलीच असते असा सर्वसाधारण अनुभव येतो. ’सेफ ’ प्रकारात मोडणारी, दगा न देणारी. ( अपवाद असतीलच )
तडका डाळ/ डाल फ्राय, ही उत्तर भारताची विशेषतः पंजाबची खासियत आहे. तूर, मूग मसूर, उडीद व चणा अशा प्रामुख्याने डाळी आपण वापरतो. या प्रत्येक डाळीला स्वत:चा एक खास स्वाद असून अनेकविध पद्धतीने त्या बनविता येतात. बरेचदा दोन-तीन डाळी एकत्र करून किंवा या पाचही डाळी एकत्र करून चविष्ट डाळ सहजी बनवता येते.
आज आपण वेगवेगळ्या डाळींची चविष्ट-दळदार किंचित मसाल्याचा स्वाद व सुगंध देणारी अशी तडका डाळ करुयात.
साधारण तीन माणसांकरिता पुरावी.
साहित्य :
अर्धी वाटी तूर डाळ
पाव वाटी मसूर डाळ
पाव वाटी मूग डाळ ( साल काढलेली )
उडीद व चणा डाळ : दोन्ही मिळून पाव वाटी
एक मोठा टोमॅटो चिरून
एक मध्यम कांदा बारीक चिरून
२/३ कप पाणी ( जशी लागल्यास अजून घ्यावे )
१ मोठा चमचा तेल ( सूर्यफूल, सफोला, शेंगदाणा, जे आवडेल ते घ्यावे )
१ मोठा चमचा साजुक तूप
२ हिरव्या मिरच्या पोट फोडून
५/६ कढिलिंबाची पाने
२/३ लाल सुकवलेल्या मिरच्या
३/४ लसूण पाकळ्या ठेचून
चवीनुसार मीठ
फोडणीसाठी : मोहरी, जिरे, हिंग व हळद.
सजावटीसाठी : दोन चमचे चिरलेली कोथिंबीर
कृती :
डाळी स्वच्छ धुऊन घ्याव्यात. प्रेशर कुकरच्या भांड्यात डाळी व दोन कप पाणी घालून मध्यम आचेवर ठेवून २ शिट्ट्या करून घ्याव्यात. कुकर निवला की डाळीचे भांडे काढून घेऊन शिजलेली डाळ चांगली घोटून घ्यावी. चांगली शिजलेली असल्याने पटकन घोटली जाते व मिळून येते.
मध्यम आकाराची कढई/पातेल्यात एक चमचा तेल घालून मध्यम आचेवर ठेवावे. तेल चांगले तापले की मोहरी घालावी. ती तडतडली की हिंग, हळद, घालून फोडणी करावी. मिनिटभराने यात चिरलेला कांदा घालून पाच मिनिटे परतावे. कांदा पारदर्शक दिसू लागला की टोमॅटो व मीठ घालून परतावे. तीनचार मिनिटांनी घोटलेली डाळ व कपभर पाणी घालून मिश्रण एकजीव करावे. दहा मिनिटे मध्यम आचेवरच ठेवून एक सणसणीत उकळी आणून आचेवरून उतरवावे.
फोडणीच्या पळीत तूप घालून मध्यम आचेवर ठेवावे. तूप तापल्यावर जिरे घालावे. ते तडतडले की थोडा हिंग घालून लसूण टाकावा. लसूण लालसर - कुरकुरीत झाला की कढिलिंब व सुक्या लाल मि्रच्या टाकून मिनिटभर परतून आच बंद करावी. लगेचच ही फोडणी डाळीवर घालून झाकण ठेवावे म्हणजे फोडणीचा स्वाद डाळीत मुरेल. वाढताना चिरलेली कोथिंबीर घालून गरमच वाढावी.
तडका डाळ वरण/सूपसदृश्य प्यायची असल्यास थोडी पातळ करावी. पोळी बरोबर लावून खायची असल्यास जराशी घट्टच असू द्यावी. दळदार राजेशाही तडका डाळ जिरा राईस बरोबर मस्तच लागते. वाटीत घेऊन नुसतीही खाता येते. चिप्स, वेफर्सना लावूनही खाता येते.
टीपा:
आवडत असल्यास सालासहीत असलेली मुगाची डाळही घालता येईल. उडदाची व चण्याची डाळ घालताना दोन्ही मिळून पाव वाटी भरेल असे प्रमाण घ्यावे. उडीद व चणाडाळ दळदार असते व या दोन्हीमुळे तडका डाळीची खुमारी अधिकच वाढते.
फोटो पाहूनच तोंडाला पाणी सुटलं...
ReplyDeleteरात्रीचे बारा वाजलेत... कुठून ’सरदेसाई’ ब्लॉगावर आले असे झालेल मला.... छे छे छे!!! निषेध या बाईचा.... पुढच्या खादाडी पोस्टा भारत आणि गल्फच्या वेळा बघून टाका अन्यथा आम्ही तडतडू!!!!
ReplyDeleteमस्त दिसतेय ती वाटी.... वरचा तडकाही सही!!! पण मी नाही करणार काही आईला दाखवेन पुढच्या शुक्रवारी, तिला सांगते करायला... ्क्या बोलती हो ताईबाई कैसा है विचार???
manatun, ब्लॉगवर स्वागत आहे. :)
ReplyDeleteतन्वे, खयाल बहोत बढिया हैं जी! :) आता काय बुवा एका माणसाची नुसती चंगळ आहे. मनाने तर कधीचीच पोचली आहेसच. आमची आठवण ठेवा नाहीतर खादाडीचा सपाटा लावून तुला उचक्यावर उचक्या आणवेन बघ... :D
ReplyDeleteमुद्दाम जेवण झाल्यानंतर पोस्ट बघितली तरी पुन्हा भूक लागलीये.. निषेध !!! :(
ReplyDeleteबेश्टेश्ट, करुन पाहायला सोप्पी आहे.
ReplyDeleteफोटो बघायला जाम अवघड आहे. ;-)
नुसती Post वाचलीच नाही तर दाल तडका तरी पण करून पहिला लगेच..
ReplyDeleteअप्रतिम जमला होता... एकटीनिच चाटून पुसून खाल्ला, कारण share करायला कोणीच नाही इथे...:)
आज टेन्शन नाही....उद्या मी घरी असणार...आईकडून बनवून घेईन....
ReplyDeleteनो निषेध! ....:D
मी परत आलोय... तेंव्हा आता ज़रा खादाडी पोस्ट वर मर्यादा घाला... :D आधीच्या पोस्ट वाचून काढतो.... :D
ReplyDeletekasala mast aalay photo....!!!
ReplyDeletebhariich....
हेरंब.... :)
ReplyDeleteअगदी अगदी. आनंद, नक्कीच जमेल.
ReplyDeleteओह्ह्ह... सहीच गं. जवळ असते तर शेअर करायला आलेच असते. :)
ReplyDeleteविद्याधर, पोचलास का घरी? आता मजा आहे. Enjoy! :)
ReplyDeleteरोहन, आलास का.... हा हा... मर्यादा घालू... की हल्ला बोल करू..... :P
ReplyDeleteमैथिले... :)
ReplyDeleteकाय सही आणि सोप्पी रेसिपी आहे. शनिवारचा मेन्यु फिक्स डाल तडका आणि जीरा राईस.
ReplyDeleteयमी दिसतंय...चिप्स, वेफर्सना लावूनही डाळ खाता येते ही यकदम नामी टीप आहे...
ReplyDeleteसोनाली, मी पण येते गं खायला. :)
ReplyDeleteअपर्णा, तर काय.... उगाच जास्त फॅटी डिपपेक्षा हे प्रोटीन्स बरं आणि चविष्ट. :)
ReplyDelete