जाता जाता एक नजर इथेही........

Wednesday, September 1, 2010

' पहिला खो '

विभीने, ' पहिला खो ' देऊन जवळपास महिना किंवा जास्तच दिवस लोटले. अनेक गाणी, कविता, गझला अगदी मनाच्या जवळ असूनही अनुवाद करायला गेल्यावर जीव घाबरा होऊ लागला. इतक्या सुंदर शब्दांची, त्यांच्यातल्या भावार्थाची तोडफोड तर होत नसेल....... बऱ्याच गाण्यांचे अर्धवट अनुवाद झाले पण मनात कायमचे घर करून गेलेली एक कविता सारखी समोर येऊ लागली. सरतेशेवटी हार मानून मी तिच आज टाकतेय. कवितेतला आशय तितकाच भिडावा म्हणून उगाचच शब्दबंबाळता टाळली आहे. या कवितेचे सत्य अत्यंत विदारक आहे. आजच्याच पेपरात पुन्हा एकवार या सत्यावर शिक्कामोर्तब झाले आहेच. कदाचित त्यामुळेच इतके दिवस मी न लिहिलेला हा, ' पहिला खो ' मला न जुमानता कागदावर उतरला आहे. माझ्या परीने-कुवतीने केलेला एक क्षीण प्रयत्न...... कदाचित मूळ कविता वाचून कोणी एखादा, " जबाबदार " होईल.

मूळ कविता सोबत देत आहे। कोणा अनामिक कवीने लिहिलेली असून एक जळजळीत सत्य व असहाय वेदना व्यापून टाकणारी. ही कविता खूप वर्षांपूर्वी मला विरोपातून आली होती. त्या दिवसापासून आजपर्यंत माझ्या मनात घर करून गेली आहे. तुम्हीही वाचली असेलच आणि तितकीच असहाय घुसमटही जाणवली असेल....


एका निरपराध जीवाचा मृत्यू.....

आई, एका पार्टीला गेलो होतो गं

तुझे बोल मला आठवले,

" मद्यपान करू नकोस बाळा "
म्हणून, मी फक्त सोडा प्यायलो



आई, मला खूप छान वाटलं
तुला जसं हवं होतं तसंच मी केलं,
आई, मी दारू पिऊन गाडी नाही चालवली

इतर सारे म्हणाले होते तरीही नाही


आई, मी योग्य तेच केले गं

तू मला नेहमीच हिताचेच सांगतेस,

आई, आता पार्टी संपत आली आहे

आणि सगळे निघालेत परतीला



आई, मी ही माझ्या गाडीत बसलोय

मी घरी सुखरूप येईन याची मला खात्री आहे,

आई, तू मला असेच वाढवले आहेस गं

एकदम चांगला आणि जबाबदार


आई, मी गाडी चालवत निघालो
जशी मी गाडी रस्त्यावर घेतली,
येणार्‍या दुसर्‍या गाडीने मला पाहिलेच नाही

आणि दाणकन
माझ्यावर येऊन आदळली


आई, मी फुटपाथवर पडलोय गं

पोलिसाचे शब्द मला ऐकू येत आहेत,

आई, तो दुसरा मुलगा दारू प्यायलाय
आणि आता त्याच्या कर्माची फळे मी भोगतोय


आई, मी इथे मरणाच्या दारी पडलोय

ये ना गं माझ्याजवळ लवकर.....

आई, माझ्याच बाबतीत असं का गं घडावं

माझं आयुष्यच अचानक असं संपावं....


आई, रक्ताने मी माखलोय गं
आणि ते सारं माझंच रक्त आहे
आई, डॉक्टर म्हणत होते,

आता मी लवकरच मरेन


आई, मला तुला सांगायचे आहे की,
तुझी शपथ मी दारू प्यायलो नाही

आई, इतर सगळे प्यायले गं....
त्यांनी मुळी विचारच केला नाही



आई, अगं तो बहुतेक माझ्याच पार्टीत होता

फरक इतकाच आहे,
की तो दारू प्यायला

आणि मी मरणार आहे...


आई, लोकं कशाला गं दारू पितात?
तुमचे संपूर्ण आयुष्य जी बरबाद करू शकते
आई माझ्या वेदना फार तीव्र झाल्यात
धारदार, टोकदार, जिव्हारी वेदना, दुखतंय गं...


आई, ज्याने मला ठोकले तो चालतोय
हे अतिशय चुकीचे आहे, अन्याय आहे हा....

मी इथे असहाय तडफडत मरतोय

आणि तो फक्त माझ्याकडे पाहतोय



आई, दादाला सांग रडू नकोस

बाबांना सांग धीराने घ्या

आई, मी जेव्हां देवाघरी जाईन ना

माझ्या थडग्यावर लिहा, "बाबाचा लेक "


आई, कोणीतरी त्याला सांगायला हवे होते ना

दारू पिऊन गाडी चालवू नकोस

आई, अगं त्याला तसं कोणी सांगितले असतं
तर मी आज जिवंत असतो गं...


आई, माझे श्वास संपत चाललेत

मला फार फार भिती वाटतेय गं
आई, तू रडू नकोस....
जेव्हां जेव्हां मला गरज होती
त्या प्रत्येक वेळी तू माझ्यासाठी होतीसच



आई, एक शेवटचा प्रश्न पडलाय गं

तुझा निरोप घेण्याआधी सांगशील का मला

मी दारू पिऊन गाडी चालवलीच नाही
मग तरीही मीच का गं मरतोय????


मूळ कविता :

death of an Innocent

I went to a party, Mom,
I remembered what you said.
You told me not to drink, Mom,
So I drank soda instead.

I really felt proud inside, Mom,
The way you said I would.
I didn't drink and drive, Mom,
Even though the others said I should.

I know I did the right thing, Mom,
I know you are always right.
Now the party is finally ending, Mom,
As everyone is driving out of sight.

As I got into my car, Mom,
I knew I'd get home in one piece.
Because of the way you raised me,
So responsible and sweet.

I started to drive away, Mom,
But as I pulled out into the road,
The other car didn't see me, Mom,
And hit me like a load.

As I lay there on the pavement, Mom,
I hear the policeman say,
"The other guy is drunk," Mom,
And now I'm the one who will pay.

I'm lying here dying, Mom...
I wish you'd get here soon.
How could this happen to me, Mom?
My life just burst like a balloon.

There is blood all around me, Mom,
And most of it is mine.
I hear the medic say, Mom,
I'll die in a short time.

I just wanted to tell you, Mom,
I swear I didn't drink.
It was the others, Mom.
The others didn't think.

He was probably at the same party as I.
The only difference is, he drank
And I will die.

Why do people drink, Mom?
It can ruin your whole life.
I'm feeling sharp pains now.
Pains just like a knife.

The guy who hit me is walking, Mom,
And I don't think it's fair.
I'm lying here dying
And all he can do is stare.

Tell my brother not to cry, Mom.
Tell Daddy to be brave.
And when I go to heaven, Mom,
Put "Daddy's Girl" on my grave.

Someone should have told him, Mom,
Not to drink and drive.
If only they had told him, Mom,
I would still be alive.

My breath is getting shorter, Mom.
I'm becoming very scared.
Please don't cry for me, Mom.
When I needed you,
you were always there.

I have one last question, Mom.
Before I say good bye.
I didn't drink and drive,
So why am I the one to die?

30 comments:

  1. भाग्यश्री, बातमी तर ताजीच आहे...दुखःद आहे. खिन्न आणि सुन्न करणारी आहे. त्या इंग्रजी कवितेत हे सगळे भाव उतरलेत...आणि तू देखील तसंच सुन्न करून सोडलंस...मातृभाषा जास्ती भिडते..सत्यकथेवर आधारित असल्याने भरभरून स्तुतीही करता येत नाहीये...सुन्न करून सोडलस...

    ReplyDelete
  2. तायडे काय लिहू????

    शब्द नाहियेत....

    अनुवाद ईतका भावपुर्ण झाला आहे की काय सांगू तुला.... पण कविता वाचून मात्र सुन्न झालेय!!

    ReplyDelete
  3. ताई,
    मी तुझ्या अनुवादाची वाट बघत होतो. तू आज पोस्टलास हे बघून खुश होऊन आलो आणि आत्ता तू निवडलेली कविता बघून सुन्न झालोय. हा विरोप मलाही आला होता. तेव्हा जी स्थिती झाली होती, त्याच्या दुप्पट आत्ता तुझा अनुवाद वाचून झाली!
    काही सुचत नाहीये!

    ReplyDelete
  4. अप्रतिम !!मनाला भिडुन गेली....

    ReplyDelete
  5. Nice Blog Bookmark kela , nantar bolu. Thanx

    ReplyDelete
  6. भानस, तुम्ही मुली रडवता फार बाबा!!! पण सुंदर कविता आहे...अनुवाद ही उत्तम!!!! माझ्याकडून दहा पैकी दहा

    ReplyDelete
  7. ताई, मलाही मेलमधून ही कविता आली होती. तेव्हा जेवढी भिडली होती त्याच्या कित्येक पट अधिक आत्ता तुझा अनुवाद वाचून भिडली.. !!

    ....... निःशब्द !!!!!!!

    ReplyDelete
  8. अनघा, ही कविता वारंवार समोर यावी अशा घटना सारख्याच घडत आहेत. मन दुखतं गं फार.

    ReplyDelete
  9. तन्वे, धन्यू गं.
    कवितेचा असर ( मूळ कवितेचा ) जबर आहे.

    ReplyDelete
  10. विभी, इतकी विषण्ण कविता खरे तर मला मुळीच निवडायची नव्हती. पण कधीकधी मन अगदी ऐकतच नाही. :( तुझ्या खो ला उत्तर द्यायला खूप वेळ लावला... सॉरी.

    ReplyDelete
  11. धन्यवाद क्रान्ति.

    ReplyDelete
  12. उमा... :) धन्यू गं.

    ReplyDelete
  13. amol007, ब्लॉगवर स्वागत व आभार. :)

    ReplyDelete
  14. श्रीराज, काहीसे तू म्हणतोस तसे होते खरे. :(
    धन्यवाद रे.

    ReplyDelete
  15. हेरंब, गेल्या दोन वर्षात अगदी जवळच्या ओळखीतले दोघ जण असे दगावलेत. इतक्या ठेचा लागूनही शहाणपणा येतच नाही... :(

    धन्यवाद.

    ReplyDelete
  16. दुख्खाला शब्द फुटले कि त्याचे भाले होतात आणि जिवंत असणाऱ्याला रक्तबंबाळ करतात ...!
    तू आणि अनघा , दोघींनी एकदमच ........ थिजवून नि:शब्द केलंत !!

    ( एका निरपराध जीवाचा मृत्यू.....
    आणि ` दुष्काळ ' )

    ReplyDelete
  17. i am not very good at reading and understanding poetry in marathi (that too a long one). i do try to read slowly but the moment u said 'kavita vidarak aahe'....my eyes went straight to the english one. when i started reading it...it was as if every verse was holding me by hand and pulling me towards the next one. Had to read in one go. 'daddy's girl' left me quiet.

    I missed my hearbeats twice today. Once while reading anaghas post and then now, reading urs.

    thanks for sharing.

    ReplyDelete
  18. a question though. you start with 'aai me majhya gaadit basloy'....doesn't that give the sex of the person as male? whereas in the end it turns out that she was a girl. this confused me a bit.

    (this is just for clarification..)

    ReplyDelete
  19. दु:खाला शब्द फुटले कि त्याचे भाले होतात आणि जिवंत असणाऱ्याला रक्तबंबाळ करतात ...!

    अगदी असेच घडते राजीव. आणि दुर्दैवाने या भाल्यांची टोके दिवसेंदिवस जास्तीच धारदार होत आहेत.

    ReplyDelete
  20. वंदू ( here i am taking liberty...:) hope u won't mind ) तुला प्रश्न पडणे साहजिकच आहे. मूळ कवितेत ’ मुलगी ’ हे सगळे आईशी बोलतेय. अनुवादात मी फक्त तेवढाच बदल केलाय.

    धन्यू गं. छान वाटले तुला पाहून.

    ReplyDelete
  21. अगं ताई,
    उशीर केलास ते एका अर्थाने बरं झालं...
    इतकी महत्वाची कविता तू मायबोलीत आणलीस त्या निमित्तानं!

    ReplyDelete
  22. Wonderful poem and great translation.

    It shuold be used in don't drink and drive campaign.

    Dont drink is very difficult to put forward but driving can be surely prevented.

    There are so many innocent people dying not only after party but also as a passanger with drunken bus driver,under a drunken driver's truck..

    We dying in an accident is not our mistake for half the times.

    anyway the lyrics are so emotional that no further logical words..

    ReplyDelete
  23. नचिकेत, असेच घडतेय. एका माणसाचे बळी अनेक. काही प्रत्यक्ष आणि बरेच अप्रत्यक्ष. :( इथे खरे तर एक Video जोडणार होते परंतु मलाच इतका प्रचंड त्रास होतो त्या मुलीला पाहून तर अजून सगळ्यांना तोच अनुभव द्यायचा म्हणजे... म्हणून केवळ जोडला नाही.

    अतिशय कडक कायदे हवेत आणि त्यांची चोख अंमलबजावणीही व्हायला हवी.

    अभिप्रायाबद्दल आभारी आहे.

    ReplyDelete
  24. निःशब्द.......magachi kahi warsha ashach eka aathwani madhe faar jawalun pahilit tyamule kai bolu?? shadasha sangachya tar tyacha khel hoto ani dusryancha jeev jato

    ReplyDelete
  25. तसेच होतेयं गं अपर्णा, " त्यांचा खेळ होतो अन दुसर्‍याचा जीव जातो " प्रत्यक्ष एका दोघांचा अप्रत्यक्ष न जाणो किती जणांचा... :(

    ReplyDelete
  26. सलग बरेचसे गंभीर लेख वाचले... आजच्या पुरतं थांबवतोय. कविता हॄदयद्रावक आहे.

    ReplyDelete
  27. धन्यवाद सौरभ. ही सुन्नता दिवसागणिक वाढतच चालली आहे.

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !