जाता जाता एक नजर इथेही........

Thursday, October 15, 2009

दिवाळीचा सण मोठा.........


दिवाळीचा सण म्हणजे आनंदीआनंद. मायदेशात राहा नाहीतर जगभर कुठेही, दिवाळी प्रत्येकजण मनवतोच. आमच्याकडेच पाहा ना, बाहेर पारा उतरला ३५ फॅरनाईटवर. जाडे जाडे कोट चढवायला सुरवातही झाली. बरे शेजार-पाजार आपला देशी असावा तर तोही नाही. अगदी सख्खा शेजारी आफ्रिकन अमेरिकन. त्याच्या पलीकडे हिस्पॅनिक आणि अलीकडे चायनीज. एकही देशी जवळपास नाही. विचार केला या सख्ख्या शेजाऱ्यांना फराळ नेऊन द्यावा. पण फराळा मागोमाग प्रत्येकाला हे कशापासून बनविले आहे हे सांगून सांगून तोंड दुखेल वर त्यांना कितपत समजेल आणि आवडेल कोण जाणे. म्हणून मग विचार कॅन्सल. त्यापेक्षा त्यांना डिसेंमध्ये केक द्यावा ते उत्तम व सेफ.

मग काय घरातल्या घरातच आम्ही दिवाळी साजरी करायची ठरवलीये.
ओघाने फराळही आलाच. शोमू म्हणाला, " आई डबाभरून पाठव. सगळे मित्र वाट पाहत आहेत. लवकर पाठव. " मग दुप्पट उत्साह आला व डबा कुरियरकडे गेलाही. तुम्हालाही शुभेच्छा द्यायच्यात. चला तर मित्र-मैत्रिणींनो कंदील, फटाके, पणत्या, फराळाचे ताट व अनेक शुभेच्छा तुमच्यासाठी घेऊन आलेय. ही दिवाळी तुम्हा-आम्हाला सुखसमाधानाची व समृद्धीची जावो .

10 comments:

  1. दीपावलीच्या खादाडी शुभेच्छा!!!!

    ReplyDelete
  2. धन्यवाद मनमौजी...:)

    ReplyDelete
  3. कुठ कुठले पदार्थ बनवून पाठवलेत शोमूला ??? हा हा ... इकडे लाडू - करंज्या - चकल्या तयार... एक खादाडी पोस्ट टाकतो उदया ... हा हा ... :D दिपावलीच्या तेजोमय शुभेच्छा ... !

    ReplyDelete
  4. दिपावलीच्या शुभेच्छा...
    मी तुझ्या शेजारी का नाही रहात??????

    ReplyDelete
  5. रोहन तू मदत केलीस का नुसताच ताव मारतो आहेस?:D शोमूला ना, अरे हेच दिवाळीचा फराळ व पराठे,थेपले.:)

    ReplyDelete
  6. भाग्यश्रीताई तसे आपण शेजारीच नाही का फ़क्त मध्ये दोन राज्यं आहेत...येणार का फ़राळाला?? आत्ताच चिवडा बनवला..तेवढा एकच पदार्थ कुणाच्या मदतीशिवाय बनवु शकते....
    दिपावलीच्या शुभेच्छा...

    ReplyDelete
  7. अपर्णा तू मनापासून बोलावलेस त्या भावना मनापर्यंत पोचल्या. खूप आनंद झाला गं.:)चिवडा मस्त झालाच असणार नक्की. आता यावेच लागेल.

    ReplyDelete
  8. हं... कालचा दिवस ऑन लाइन नव्हतो.. म्हणुन वेळ होतोय... मला चिरोटे आवडतात, ते बनवलेस कां??आमच्या घरी नाही बनवले, कारण केले की मी खुप खातो म्हणुन.. :)
    :) दिवाळिच्या शुभेच्छा.. :)

    ReplyDelete
  9. हा...हा....महेंद्र मी चिरोटे बनवले होते पण फोटो काढण्याआधीच गट्ट्म झाले. नचिकेतलाही आवडतात.:)

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !