जाता जाता एक नजर इथेही........

Thursday, October 29, 2009

” हे माझे काम नाही ’ पारितोषिक -- हुर्रेर्रेर्रेर्रे........


२००९ या वर्षासाठीचे ' हे माझे काम नाही- Not my job Award ' या विषयाचे पारितोषिक जाहीर झालेय.

तुम्हाला काय वाटते कोणी जिंकले असेल बरं.....???

इंडियन नॅशनल हायवे डिपार्टमेंट पेंटिंग डिव्हिजन यांनी

हा फोटो पाहा..... हसू आले ना? मीही खूप हसले. हसू ओसरल्यावर मन दुखले. जे सत्य आहे तेच टिपलेय खरे. कबूल करताना खूप वाईट वाटते परंतु आपण असेच आहोत. हे माझे काम नाही, ज्याचे आहे तो करत नाही असे म्हणत सहज शक्य असलेल्या गोष्टीही आपण करत नाही. सरळ डोळेझाक करतो आणि चालू पडतो. बाकी रेषा ओढणारा किती हुशार पाहा.... तेवढ्या भागात रेघ ओढलीच नाही असे केलेले नाही. अगदी बरोबर वळण घेतलेय....पण ते झाड जरासे आततरी ढकलावे....ऊंहू....ते माझे काम नाही.....

15 टिप्पणी(ण्या):

Mahendra said...

माझं काम फक्त रेषा ओढणं, झाडं बाजुला करणं माझं काम नाही. मजेशिर काय अफलातुन आहे..

भानस said...

आहे ना ग्रेट....

Innocent Warrior said...

sahich :)

भानस said...

:)

sayonara said...

haha, kharay. Btw, halli maayboli varlihit nahis ka g?

भानस said...

सायो मस्त वाटले गं तुला पाहून. हो ना बरेच दिवसात मायबोलीवर काही टाकलेच नाहीये.

Gouri said...

सहीच फोटो.

मागे एक जोक (?) वाचला होता, त्याची आठवण झाली. रस्त्याच्या कडेला एक माणूस एकेक खड्डा खणत असतो, आणि दुसरा त्याच्या मागून येऊन तो बुजवून तिथे थोडं पाणी घालत असतो. शेवटी कुणीतरी त्याम्ना विचारतं, की बाबांनो तुम्ही दोघं नेमकां काय करता आहात? ते दोघं उत्तर देतात, "आम्ही वृक्षारोपण करतोय. आमच्यातला खड्ड्यात रोप लावणारा आज सुट्टीवर आहे."

मला वाटतं आपल्याकडे फारच स्पर्धा आहे या बक्षिसासाठी.

tanvi said...

कठीण आहे गं बाई!!!! पण पोष्ट लय लय भारी!!!!

भानस said...

गौरी, खरेय तुमचे.किती इमानी लोक आहेत हे..एक खड्डा खणतोय अन दुसरा बुजवून पाणी घालतोय...पण रोप गायब....हाहाहा...सहीच. आभार.

तन्वी हैं की नही...मला तर वाटते हे रेषा ओढणारे दोघेजण असतील आणि त्यांच्यात चर्चाही झाली असेल यावर....मग दोघेही खोखो हसले असतील.:D आता कॊलर ताठ करून फिरतील हे अवॊर्ड मिळाल्याचे कळले तर...

anukshre said...

वाकडा रस्ता सरळ पणे मनात उतरवलास. सरळ मनाचा रस्ता सरळ वाकडे खटकते पण मन सरळ पणे विचार करते.
हा सरळ प्रवास वाटेतले अनोखे दाखवीत पुढे पुढे जात राहो. सदिश्च्या.

भानस said...

अनुक्षरे प्रतिक्रियेबद्दल आभार, लोभ आहेच तो वाढावा.:)

माऊ said...

ek japanes proverb athwali.

Japanese Proverb:
If i can do it
U too can do it.
If none can do it,
U must do it.

Indian Proverb:
If i can do it,
Let him do it.
If none can do it,
Then WHY try it???

ahe ki nahi satya...sahi ahe post

भानस said...

माऊ....पर्फेक्ट.

Ravindra Ravi said...

सद्ध्या अशीच मंडळी संखेने जास्त आहेत. म्हणून रस्ता तयार झाला कि मग दुसरी मंडळी येऊन खड्डा करतात. नंतर मात्र कोणीही त्या खड्ड्याला पूर्वी प्रमाणे करायला येत नाही.

भानस said...

त्यामुळेच तर सगळीच कामे अर्धवटच राहतात...:(
रविंद्र प्रतिक्रियेबद्दल आभार.