जिन्नस
- पनीरचे १८/२० चौकोनी तुकडे
- एक मध्यम सिमला मिरची उभी/चौकोनी चिरून
- एक मधम कांदा पातळ उभा/चौकोनी चिरून
- तीन मध्यम टोमॅटोंची उकडून केलेली प्युरी
- चार/पाच लसूण पाकळ्या+दोन/तीन मिरे+दालचिनी तुकडा+जिरे यांची पेस्ट
- दोन चमचे कसुरी मेथी, दोन हिरव्या मिरच्या, थोडी कोथिंबीर
- तीन चमचे तेल व एक मोठा चमचा तूप
- खडा मसाला ( दोन तेजपत्ता, तीन-चार मिरे, दालचिनी तुकडा,), दिड चमचा लाल तिखट व अर्धा चमचा गरम मसाला
- चवीनुसार मीठ व एक चमचा साखर
मार्गदर्शन
शक्यतो तळलेले पनीर घ्यावे. ( आजकाल बाजारात फ्रोजन तळलेले पनीर मिळते ) पनीर घरी केल्यास एक चमचा तेलात शॅलो फ्राय करून घ्यावे. कढईत तेल घालून चांगले तापले की खडा मसाला घालून मिनिटभर परतून लसूण पाकळ्या-मिरे- दालचिनी-जिऱ्याची पेस्ट व हिरव्या मिरचीचे पोट फाडून टाकून दोन मिनिटे परतावे. त्यावर कांदा व सिमला मिरची घालून मध्यम आंचेवर पाच मिनिटे शिजू द्यावे. सिमला मिरची व कांदा अर्धवट शिजले की त्यात टोमॅटोची प्युरी, लाल तिखट व चवीनुसार मीठ घालून झाकण ठेवून पाच मिनिटे शिजू द्यावे. नंतर गरम मसाला, कसुरी मेथी, साखर, पनीर व तूप आणि आवश्यक वाटल्यास अर्धी वाटी पाणी घालून सगळे मिश्रण हलक्या हाताने एकजीव करून सात-आठ मिनिटे झाकण ठेवून शिजवावे. वाढताना कोथिंबीर घालून गरमच वाढावे.
टीपा
पनीर घरात असल्यास ही भाजी झटपट होते. कसुरी मेथीने भाजीचा स्वाद खुलतो आणि तुपाने आवश्यक ओशटपणा येऊन खुमारी वाढते. गरम परोठ्याबरोबर कढाई पनीर व दह्यातले रायते मस्त लागते. मटार आवडत असतील तर अर्धी वाटी मटार घालावे. कांदा व सिमला मिरचीचा गाळ करू नये.
कढाई पनीर ?? :ओ काल ??? मला तर काहीतरी वेगळेच सांगितले.. हा.. हा .. ताई अजून ९ दिवस बाकी आहेत हो मला घरी जायला... ज़रा थांबा ना .. ;)
ReplyDeleteहेहे.....:D
ReplyDeleteतोंडाला सुटले पाणी,
ReplyDeleteआता काय करू जॉनी
मेरे हाथ इतने लंबे नही
कि उस प्लेट से कधी पनीर
खाके पिले पाणी.
हाहाहा, आभार रविंद्र.
ReplyDelete