जाता जाता एक नजर इथेही........

Friday, October 2, 2009

निव्वळ योगायोग की काही कारणमिमांसाही असावी......?


आकाशात तारे दिसतात का पाहत होते. पण काहीच दिसेना. गेले आठ दिवस सारखा पाऊस लागलाय. बरे त्याने तरी एकदा धडाधडा कोसळून मुक्त व्हावे तर नाही तोही अगदी जीव नसल्यासारखा मरत मरत रिपरिपतोय. सूर्याने चुकूनही दर्शन दिले नाही. गेल्या आठवड्यात ७५ फॆरेनाईट वर असणारा पारा एकदम ४५ मध्ये घसरलाय. त्यात बोचरे वारे आणि हे पावसाचे नाटक. इतकं मळभ दाटलंय की मन खिन्न होऊन गेलंय. ऒक्टोबरच्या २ तारखेलाच घरातला हीटर सुरू झाला. आता मे पर्यंत ही थंडी काढायची. या वर्षीचा उन्हाळा अतिशय सौम्यच होता. ८०च्या वर पारा चढलाच नाही फारसा. आता रात्रीचे दोन वाजलेत आणि मी मागच्या अंगणात उभे राहून तारे शोधतेय. कोणी पाहिले तर नक्की वेड्यातच काढतील. तारे नाही दिसले पण सप्तर्षीवरून काही गोष्टी आठवल्या अन मग नादावल्यासारखी मी अजून शोधत राहिले. मला पटकन आठवले तेवढे मी लिहितेय तुम्हाला जे आठवेल त्याची भर घाला. ७ नंबरशी संबंधीत खरे तर आपली कुठलीच गणिते नाहीत तरीही ७ नंबरला आपल्या जीवनात खूपच महत्त्व आहे. इतक्या गोष्टी ७ नंबरशीच निगडीत का आहेत?

सात आश्चर्ये
सप्तरंग
सप्तसुर
सात समुद्र
सात जन्म
सात वचने
सप्तपदी
सप्तशृंगी
सात आसरा
सात दिवस ( एक आठवडा )
आणि साडेसाती, मात्र यात १/२ ची भर


अजून काय बरं .......?



5 comments:

  1. रथाचे सात घोडे. :)

    ReplyDelete
  2. सप्ताह, सप्तमी, सप्तकोण( षट्कोन सारखा). .असे मला वाटते बरेच शब्द आहेत. लगेच आठवत नाहीत ते.

    ReplyDelete
  3. रविंद्र स्वागत व आभार.

    ReplyDelete
  4. धन्यवाद. आजच आपण माझ्या मना वर कॉमेंट दिली आहे. त्याबद्दलही धन्यवाद

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !