जाता जाता एक नजर इथेही........

Tuesday, April 21, 2009

Go for ' अनूप देसाई'.



'अनूप देसाई' हे नांव परिचित वाटतेय ना? बरोबर तोच, अमेरिकन आयडॉल मधील एक स्पर्धक. अगदी प्रथम फेरीच्या निवडीसाठी हा आला त्यावेळी ह्याच्याकडे पाहिल्यानंतर, आता हा कसे गाईल हा प्रश्न पडला होता. तो त्याने दोन मिनिटांत निकालात काढून जजेंस सह सगळ्यांना चकित करून टाकले. पक्का भारतीय दिसणारा-असणारा अनूप अमेरिकन वेस्टर्न गाणे मस्त गाऊन तर गेलाच शिवाय आपल्या सुरांची कमालही दाखवली.

नंतर झालेल्या प्रत्येक फेरीत ह्याची गुणवत्ता कमालीची वाढली आहे. 'कंट्री साँग' अप्रतिम गायले. 'स्वतःचा साँग चॉइस' वीकही गाजवला. सुरांचे सुंदर भान, स्वच्छ शब्दोच्चार, शब्दातून नीटस व आर्ततेने व्यक्त होणारे भाव. साधासरळ अर्विभाव असणारा एक सच्चा गायक. कुठेही भपकेबाजी, आगाऊपण नाही. टिपीकल भारतीय मुलगा. आता तो शेवटच्या सातामध्ये पोचला आहे. ज्यांनी आतापर्यंत हा कार्यक्रम पाहिला आहे त्यांना कळलेले आहेच, अनूपला जजेंसचे प्रेम जवळजवळ मिळत नाहीच. कॉमन परफॉर्मन्स मध्ये नेहमीच त्याला साइडला टाकतात. गेल्या मंगळवारी इतके सुंदर गाऊनही लागोपाठ तिसऱ्यांदा त्याला बॉटम थ्री मध्ये उभे राहावे लागले. फार वाईट वाटले, तो नक्कीच शेवटच्या चार पर्यंत राहण्याची गुणवत्ता बाळगतो. त्यानंतर 'Adam Lambert' सोडून सगळ्यांचे चान्सेस सारखेच असतील. लिल, मॅट व ख्रीस पेक्षा अनूप केव्हाही वरचढ आहेच.

केवळ मतांच्या कमतरतेमुळे हा चांगला प्रतिभावान मुलगा ह्या स्पर्धेबाहेर जाऊ नये. आज संध्याकाळी हा कार्यक्रम फॉक्सवर आठ वाजता आहे व त्यानंतर दोन तास म्हणजे रात्री नऊ ते अकरा पर्यंत वोटींग लाइन्स ओपन राहतील. आपल्याला जर अनूप चे गाणे आवडले तर कृपया तसदी घेऊन जरूर वोटींग करा. ( हा व्यक्तिशः: माझा कोणीही लागत नाही. परंतु हा ह्या स्पर्धेत राहणे शंभर टक्के deserve करतो म्हणून हे आवाहन आहे. ) त्याच्यावर अन्याय होऊ नये यासाठी ही कळकळीची विनंती आहे.

Go for ' अनूप देसाई'.

धन्यवाद.

4 comments:

  1. Vote him just because his parents are Indian? Hell no.

    Go Adam Lambert!!!!

    ReplyDelete
  2. मी आधीच स्पष्ट केले आहे की Adam Lambert हाच अमेरिकन आयडॊल वाटतो. आणि ह्याचे आईवडील भारतीय आहेत म्हणून वोट्स मूळीच देउ नये. इतर स्पर्धकांच्यात हा नक्कीच चांगला आहे.

    धन्यवाद.

    ReplyDelete
  3. Etech tar marathi manus mage padato. Networking and grouping madhe.

    ReplyDelete
  4. Hyat grouping kuthe bare aale? Adam Lambert is destined to be 'STAR'. Malahi to atishay aawadato. Pan to sodun ajunhi contestent aahet na? Anyways thanks a lot for your comments.

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !