जाता जाता एक नजर इथेही........

Saturday, January 30, 2010

१० वाजून १० मिनिटेच का.....


जगाच्या पाठीवर कुठेही तुम्ही घड्याळ विकत घ्यायला दुकानात गेलात तर तेथील प्रत्येक घड्याळ १० वाजून १० मिनिटे ( काही वेळा १०.०८ वा १०.१२ असेही दर्शविलेले दिसते ) ही वेळच दाखवते. क्वचित काही वेळा ८ वाजून २० मिनिटेही दिसून येते. बऱ्याच जणांना यामागची कारण मीमांसाही माहीत असेलच. नेमकी वेळ लावायच्या आधी नेहमीच १० वाजून १० मिनिटे हीच वेळ का असते, याबद्दल मलाही नेहमीच कुतूहल होते. गुगलबाबाला विचारताच काही उत्तरे-स्पष्टीकरणे-प्रवाद समोर आले.

या १० वाजून १० मिनिटांमागे काही आख्यायिका जोडलेल्या आहेत. बऱ्याच लोकांना वाटते की घड्याळ्याच्या दुकानातील विकावयास ठेवलेल्या घड्याळात दाखवलेली वेळ ही अब्राहम लिंकन/जॉन एफ्. केनेडी/ मार्टीन ल्युथर किंग ज्युनिअर यांच्या स्मरणार्थ आहे. म्हणजे एक तर त्यांना त्यावेळेला गोळी लागली किंवा ते मरण पावले. परंतु वस्तुस्थिती वेगळी आहे. अब्राहम लिंकन यांना रात्री १०.१५ मिनिटांनी गोळी मारली व दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजून २२ मिनिटांनी त्यांचे देहावसान झाले. जेएफके यांना दुपारी १२.३० मिनिटांनी गोळी लागली व दुपारी १ वाजता त्यांना मृत घोषित केले गेले. आणि मार्टिन ल्युथर किंग ज्यु. यांना संध्या ६.०१ मिनिटांनी गोळी मारली गेली व संध्या ७ वाजून ५ मिनिटांनी मृत घोषित केले.

आणखी एक प्रवाद असाही आहे की नागासाकी किंवा हिरोशिमा यापैकी एका शहरावर १० वाजून १० मिनिटांनी अणुबॉम्ब टाकला गेला. त्यावेळी मारले गेलेल्या लोकांच्या स्मरणार्थ ही वेळ दाखवली जाते. परंतु लिटल बॉय हा हिरोशिमावर ६ ऑगस्ट,१९४५ रोजी ८.१५ मिनिटांनी व फॅट मॅन हा नागासाकीवर ९ ऑगस्ट,१९४५ रोजी ११.०२ मिनिटांनी टाकला गेला होता. त्यामुळे या प्रवादातही तथ्य दिसत नाही.

जाहीरात करताना किंवा विक्रीसाठी मांडताना घड्याळात १० वाजून १० मिनिटे ही वेळ दर्शविण्यामागे घड्याळाचे सौंदर्य खुलवणे हाच हेतू प्रामुख्याने असला पाहिजे.

दोन्ही काटे एकावर एक नसल्याने व्यवस्थित व संपूर्ण दिसतात. काट्यांची अशी समअंग रचना ( सिमेट्रिकल -मध्यबिंदू पासून तंतोतंत सारखी परंतु उलट -मिरर इमेज ) बहुतांशी लोकांना अपील होते-आवडते.

घड्याळ कंपनीचा लोगो बहुतेक वेळा १२ आकड्याच्या खाली व घड्याळ्याच्या मध्यभागी असतो. काट्यांच्या या रचनेमुळे तो आकर्षक रित्या मांडला जाऊन लोकांच्या नजरेत भरतो.

टाईमेक्स कंपनीच्या म्हणण्यानुसार पूर्वी ८ वाजून २० मिनिटे ही वेळ दर्शविली जात असे. परंतु घड्याळ हे चेहऱ्याचे प्रतीक मानले तर ८ वाजून २० मिनिटे मधील काट्यांच्या रचनेमुळे चेहरा दुःखी भासतो. याउलट १० वाजून १० मिनिटे मध्ये हसरा चेहरा दिसून येतो. अजूनही ज्या घड्याळांमध्ये कंपनीचा लोगो ६ च्या वर असतो त्या घड्याळांत ८ वाजून २० मिनिटे वेळच दर्शवण्याचा प्रघात आहे.

(माहिती जालावरून संकलित )

25 comments:

  1. भानस: घड्याळात जेव्हा १०:१० वेळ (दाखवली) असते तेव्हा दोन काट्यांत वर १२० अंशाचा कोन असतो, आणि खाली २४०. हे १:२ प्रमाण दिसायला सगळ्यात नेटकं, असं म्हणतात.

    शिवाय घड्याळनिर्मात्याचं नाव १०:१० ला दोन काट्यांत ठळक दिसतं; हा मुद्‌दा तुझ्या पोस्टमधे आला आहेच.

    - डी एन

    ReplyDelete
  2. धनंजय,खरे आहे. आभार.:)

    ReplyDelete
  3. वा: ! आपल्या निरीक्षणाची दाद द्यावीशी वाटते. हे पोस्ट वाचे पर्यंत माझ्या डोक्यात पण आले नव्हते की दुकानातील घड्याळात नेहेमी १०:१० वाजलेले असतात.

    ReplyDelete
  4. छान माहिती. मला सुद्धा आधी वाटले होते काही विशेष कारण आहे या मागे.

    ReplyDelete
  5. It looks like a smiling face. No?

    ReplyDelete
  6. मी फार वर्षांपूर्वी एच. एम. टी. च्या फ्रेंचाईजी मधे काम करायचे, तेव्हा हा प्रशन विचारून ग्राहक हैराण करत असत. तेव्हा तर या गोष्टीमागच्या आख्यायिकाही माहित नव्हत्या. मला व्यक्तीश: असं वाटायचं की १०:१०:३५ मुळे घड्यातील काटे व लोगोची रचना सुयोग्य दिसते. ग्राहकाला योग्य घड्याळ घेण्यास मदत होते.

    ReplyDelete
  7. मी असं निरिक्षणच केलं नव्हतं, फक्त पॉवरफूल घड्याळात हीच वेळ असते हे मला माहित होतं

    ReplyDelete
  8. निरंजन, स्वागत व प्रतिक्रियेबद्दल आभार.:)

    ReplyDelete
  9. आनंद,या आख्यायिका-प्रवाद इथे येईतो मला माहित नव्हत्याच.तरीही नेहमीच वाटे काही खास कारण असावे. आभार.

    ReplyDelete
  10. अनामिक,मी म्हटलेच आहे ते.....:)

    ReplyDelete
  11. मस्त माहिती आहे.. मला हे १०:१० पाहिले की १०-१० की दौड़ आठवते ... !!! बाकी सध्या भारतात १०:१० आता 'राष्ट्रवादी' (वादावादी???) आहे ... :D

    ReplyDelete
  12. कांचन, यामुळे घड्याळ्याचे सौंदर्य जास्त खुलते हाच उद्देश खरा.:) आभार.

    ReplyDelete
  13. प्रसाद, प्रतिक्रियेबद्दल आभार.:)

    ReplyDelete
  14. रोहन,दस दस की दौड.... हाहा... राष्टवादी का वादावादी...सहीच.:D

    ReplyDelete
  15. रोहनचं खरं आहे. राष्ट्रवादीचा कावा आहे हा.. इलेक्शन च्या काळात जाहिरात करण्याचा...

    मला अब्राहम लिंकन यांचा मृत्यु झाला या वेळेस अशी माहिती होती.

    ReplyDelete
  16. १०:१० चा मला लहानपणी कळलेली कथा (दंत कथा)
    कि घड्याळाचा शोध ज्याने लावला त्याचा मृत्यू १०:१० ला झाला
    त्याच्या स्मरणार्थ सर्व घडल्यात १०:१० वाजलेले असतात...
    anyway छान निरीक्षण आणि लेखही उत्तम...

    ReplyDelete
  17. Akhil,प्रतिक्रियेबद्दल आभार.

    अजूनही दंतकथा असतीलही. घड्याळाचा शोध हा एकाच माणसाने लावलेला नाही.मनगटी घड्याळे, लंबक असलेली असे करता करता अनेक जण वेगवेगळ्या काळात घड्याळाचे स्वरूप बदलत गेले आहेत.बरीच मजेशीर माहिती वाचायला मिळते.

    ReplyDelete
  18. महेंद्र,अब्राहम लिंकन यांना १०.१५ ला गोळी मारली गेली परंतु निधन दुस~या दिवशी झालेय. प्रवाद व आख्यायिका आहेतच.:)

    ReplyDelete
  19. याने घड्याळाच सौंदर्य खुलते, हसरा चेहरा प्रतीत होतो आणि टिकमार्क ची खुण दिसून येते. म्हणजे हेच घड्याळ योग्य असे दाखविण्याचा प्रयत्न कंपनीने केला आहे असेहोते.
    असो पण आपण बरीच मेहनत केलेली दिसून येते त पोस्त साठी. छान !!!

    ReplyDelete
  20. ravindra, आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

    ReplyDelete
  21. अप्रतिम माहिती..कधी विचार नव्हता केला ह्या मागे एवढी कारण असु शकतात ते :)

    ReplyDelete
  22. Suhasonline,स्वागत व प्रतिक्रियेबद्दल अनेक आभार.:)

    ReplyDelete
  23. mala yaa prashnache uttar khup varshan pasun have hote , te aata milalyane khup aanand hotoy. Yaa baddal dhanya vaad.. maahitee pan uttam aahe.

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !