जाता जाता एक नजर इथेही........

Wednesday, April 15, 2009

तो, ती अन हार्मोनियम

तोः " हेलो, काय? "
तीः " अय्या तू? (घाईने) कुठे आहेस? "
तोः " तुला काय पहिल्यांदा फोन लावलाय का मी? काहितरी विचारत बसतेस. "
तीः " अरे. ऽ असं नाही रे. दुपारी फोन आपटलास ना, मला वाटले...... "
तोः " काय वाटले, मी पुन्हा फोन करणारच नाही. "
तीः " ह्म्म... वाटलं खरं, कधी कधी मला तुझी भीतीच वाटते. "
तोः " भीती? "
तीः " हो रे, कसली ते नीट सांगता येणार नाही. पण ... आता हेच बघ ना, तू फोन केलाच नाही तर... "
तोः " तर काय? प्रत्यक्ष येईन ना भेटायला, मग फोन कशाला हवा. "
तीः " बरं बरं, आता घरी निघालास ना? "
तोः " हो. चल. पोचलो की करतो. " फोन ठेवतो.
तीः " अरे मी काय.... ठेवला वाटतं. ह्याला जरा दम नाही. " वैतागून फोन ठेवते.

तो: अगदी वेडपट आहे, पण मला खूप आवडते. तिला सांगत नाही कधी हे मात्र तिच्याशिवाय जगणे कठीण आहे. माझ्या अवतिभोवती वावरते ना तेव्हा माझी खात्री पटते तिला स्वतःतून वजा करणे नाही जमायचे. कधीतरी सांगायला हवे. पाहू, काय घाई आहे.

तीः नेहमी असा छळवाद करतो. चूक माझीच आहे, फार लाडावून ठेवलेय ना म्हणून तू शेफारला आहेस. ए, बघ ना किती आर्ततेने गातेय रे, " अजीब दास्ता है ये.... " अन तो राजकुमार म्हणजे... ठोंब्या आहे नुसता.

ती: आज का हे सगळे आठवतेय. शब्द न शब्द तेथेच तसेच अजूनही आहेत. मात्र ती दोन माणसे हरवून गेलीत. काळाबरोबर प्रवाहात वेगवेगळ्या धारेला लागलीत. संवाद नाही, भेट नाही तरीही परस्परांच्या अंतरात जगत आहेत. येशील का प्रत्यक्षात एकदा? पुन्हा ती हार्मोनियम अन तुझा किंचित अनुनासिक आर्त स्वर...

का धरिला परदेश, सजणा
का धरिला परदेश ?

श्रावण वैरी बरसे झिरमिर
चैन पडेना जीवा क्षणभर
जाऊ कोठे, राहू कैसी,
घेऊ जोगिणवेष ?

रंग न उरला गाली ओठी
झरती आसू काजळकाठी
शृंगाराचा साज उतरला,
मुक्त विखुरले केश

6 comments:

  1. अच्छी ब्लॉग हे / मराठी और हिन्दी मे टाइप करने केलिए आप कौनसी टाइपिंग टूल का इस्तीमाल करते हे..?
    रीसेंट्ली, मैने यूज़र फ्रेंड्ली इंडियन लॅंग्वेज टाइपिंग टूल केलिए सर्च कर रहा ता तो मूज़े मिला " क्विलपॅड " /
    आप भी "क्विलपॅड" www.quillpad.in यूज़ करते हे क्या...?

    ReplyDelete
  2. धन्यवाद आपकी राय के लिये। मैं Barahapad use करती हूं।

    ReplyDelete
  3. Aahe majhyakade te recording... :) Nachiketne hausene pathavilele.

    Kay lihu. Tula sagale mahit aahech.

    ReplyDelete
  4. ह्म्म्म्म, धन्यवाद प्रभावित.

    ReplyDelete
  5. "रंग न उरला गाली ओठी"

    beautiful

    ReplyDelete
  6. अनेक धन्यवाद gomu.

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !