शीर्षक वाचून बुचकळ्यांत पडला असाल ना? चोर आणि हाक मारतो? काय दिवस आलेत पाहा. आजकाल चोरांनी त्यांच्या कामाची पद्धत बदलली आहे. हो तर अहो त्यांच्यासाठी हे कामच ना, मग ते वाईट आहे हे आपण म्हणतो. तर काय सांगत होते, हां चक्क हाका मारून चोऱ्या करतात की.
अगदी हल्लीच घडलेली ही घटना आहे. नेहमीप्रमाणे घरातली सकाळची कामे आवरून माझी आई भाजी आणण्यासाठी घरापासून दोन गल्ल्या सोडून असलेल्या दुकानात गेली होती. तिथून भाजी घेतली नंतर थोडे किराणा सामान घेऊन ती घरी यायला निघाली. घराकडे येण्याच्या रस्त्यावर दोन-तीन मिनिटांचा वळणाचा थोडासुनसान टप्पा आहे. बहुतांशी तिथे रिक्षा उभ्या असतात. नेमके त्या दिवशी कोणीही नव्हते.
आईच्या हातात दोन बऱ्यापैकी जड पिशव्या होत्या. दुपारचे १२ वाजत आले होते त्यामुळे ऊन चांगलेच तापलेले. आई भरभर घर गाठण्याच्या नादात इकडे तिकडे न पाहता चालत होती. तेवढ्यात एका बारा-तेरा वर्षाच्या मुलाने तिला हाक मारली. " अहो, अहो बाई. ते पाहा तुम्हाला हाक मारीत आहेत." आई थांबली. त्याच्याकडे पाहिले व तो ज्या माणसाकडे बोट दाखवीत होता त्याच्याकडे पाहिले. तो मनुष्य आईच्या ओळखीचा नसल्याने दुर्लक्ष करून पुढेनिघाली.
तिला निघालेली पाहून त्या माणसाने आईला थोडी जोरात हाक मारली. " अहो बाई, मी हाक मारतो आहे ना? मग तरीही तुम्ही पुढे चाललात?" आईने पुन्हा वळून पाहिले. तो माणूस मोटरसायकलवर बसला होता. पटकन पाहून साध्या कपड्यातील पोलीस ऑफिसर वाटावा. हातात जड पिशव्या त्यात कडक ऊन याने आधीच त्रासलेली आई त्याला म्हणाली," अरे कमालच आहे. एकतर मी तुम्हाला ओळखत नाही आणि तुम्हाला माझ्याशी बोलायचे तर तुम्ही या इथे. माझ्या हातातील जड पिशव्या दिसत नाहीत का तुम्हाला? "
हे ऐकून अजूनच थोड्या जरबेने तो म्हणाला, " दिवस कसे वाईट आहेत माहीत आहे ना तुम्हाला? हातात पाटल्या-बांगड्या घालून फिरू नका. ठेवा काढून पर्समध्ये." हे ऐकले मात्र, आई थोडीशी चमकली. काहीतरी गडबड आहे हा इशारा मनाने दिला होताच. आई म्हणाली, " मी कशाला काढू हे सगळे? खोटे आहे ते. चोरही नेणार नाही." त्यावर लागलीच तो म्हणाला," आणि ते मंगळसूत्र? खरे आहे ना? ठेवा ते पर्समध्ये. आम्ही पोलीस काय तुम्हाला मूर्ख वाटतो का? मग चोराने नेले की येणार आमच्याकडेच शंख करीत."
आता मात्र आईच्या लक्षात आले की हाच माणूस गडबड आहे. ती त्याला म्हणाली, " खरे आहे बाबा तुझे. पण हल्लीच्या दिवसात कोणीतरी खरे मंगळसूत्र घालते का? सगळे खोटे आहे. आणि तुम्ही पोलीस आता एवढी काळजी घेत आहात मग आम्हा नागरिकांना थोडा तरी दिलासा आहेच ना." असे म्हणून आई तिथून पटकन निघाली अन घरी आली. बाबांना सारे सांगितले. आमच्या बाबांचे आवडते वाक्य लागलीच आले, " तरी मी नेहमी सांगतो. कशाला हवाय तो पिवळा धातू. पण नाही तुम्हा बायकांना सोस नुसता. आता तू खोटे दागिने का घातले म्हणून एखादा चोर रागावून त्रास द्यायचा."
दोनच दिवसांनी स्थानिक पेपरमध्ये मोठी बातमी आली, " संपूर्ण शहरभर मोटरसायकल वरून पोलीस ऑफीसर असल्याचे भासवून बायकांना जरबेने सुरक्षिततेचे कारण पुढे करून दागिने पर्स मध्ये ठेवावयास भाग पाडून तीच पर्स ओढून पसार होणाऱ्या चोरास व त्याच्या साथीदारास रंगेहाथ पकडण्यात पोलिसांना यश मिळाले आहे." आईने खोटेच दागिने घातले होते व ती प्रसंगावधानी असल्याने बचावली होती. बऱ्याचदा पेपरात अशा बातम्या आपण वाचतो पण आपल्याबरोबर असे होणार नाही हे गृहित धरून वावरतो. परंतु वेळप्रसंग कधीही व कसाही समोर उभा राहू शकतो हे लक्षात ठेवायला हवे. सावध राहा.

एकदा आमच्या ओळखीच्या बाईंच्या गळ्यातले मंगळसूत्र असेच चक्क हाक मारून ओढले होते. तो पळत असताना ती ओरडली, खोटे आहे ते. तर टाकून पळाला म्हणून मिळाले. जपूनच राहायला हवे.
ReplyDeleteसरीता शिंदे.
धन्यवाद सरीता.
ReplyDeleteअगदी सेम प्रकार आमच्या अपार्ट्मेंट्मधल्या बाईंसोबत घडला होता आणि दुर्दैवाने त्यांचा त्या तोतया माणसावर विश्वास बसला. त्यांना सांगितले की पुढे खून झाला आहे, खूप गर्दी आहे, सुरक्षितता म्हणून दागिने पर्समध्ये ठेवा. त्या बाईंनी त्यांचे दागिने पर्समध्ये ठेवता क्षणीच पर्स मारून तो चोर पसार झाला. :(
ReplyDeleteनाशिकमधे हे प्रकार अतिरेकी वाढलेत गेले काही वर्षे.. मधे चोरांना पकडलेही होते.. पण त्यांचे भाउबंद नव्याने तयार होतच राहतात.. :(:( सांभाळून राहावे आपण आणिक काय...
ReplyDeleteधन्यवाद प्रज्ञा !!
ya peksha kahar mhanje majhya vachnyat aaleli hi ghatana, ekda eka chorane magalsutra palavale aani te khote aahe he kalalyavar dusarya diwashi parat yeun chakka tya baai chya tondavar marun pasar jhaala...bagha ,chori tar chori var shirjori!
ReplyDeletepushpa