जाता जाता एक नजर इथेही........

Wednesday, April 1, 2009

पालक भजी



जिन्नस

  • पालकाची तिस पाने(शक्यतो मोठी पाने)
  • तळण्यासाठी तेल.
  • एक मोठी वाटी डाळीचे पीठ
  • दोन चमचे तांदळाचे पीठ
  • एक चमचा मैदा(एच्छिक)
  • दोन चमचे तिखट, एक चमचा हिंग, दोन चमचे ओवा, एक चमचा हळद
  • चविपुरते मीठ.

मार्गदर्शन

पालकाची पाने धुऊन घ्यावीत. एका पसरट भांड्यात डाळीचे, तांदुळाचे पीठ व मैदा घेऊन त्यात हळद, हिंग, तिखट, मीठ व ओवा घालावे. थोडे थोडे पाणी घालून एकजीव करावे. सगळ्या गुठळ्या मोडाव्यात. भजीचे पीठ तयार करायचे असल्याने पाणी बेतानेच घालावे. थोडावेळ ठेवावे. ( हे पीठ दोन तास आधी तयार करून ठेवले तर छान मुरते, भजी घालायला घेताना चमच्याने चांगले फेसावे. हलके होते. ) कढईत तेल तापत ठेवावे. प्रथमच तेल चांगले तापू द्यावे. तेल तापले की गॅस मध्यम आचेवर ठेवावा. आता एक पान घेऊन पिठात बुडवून तळावे. एकावेळी तीन पानांपेक्षा जास्त पाने कढईत टाकू नयेत. ( ही पाने नाजूक असतात, भजी पटकन जळू शकते. ) गरम गरम खावीत.

टीपा

पालकाची भजी अतिशय कुरकुरीत लागतात. बऱ्याचदा लग्नाच्या जेवणामध्ये केली जातात.

No comments:

Post a Comment

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !