जाता जाता एक नजर इथेही........

Sunday, April 26, 2009

बेसन लाडू



साहित्य

  • चार वाट्या बेसन
  • सव्वा वाटी तूप ( पातळ केलेले)
  • पावणे तीन वाट्या साखर
  • पाव वाटी दूध
  • अर्धा चमचा वेलदोडा पूड
  • प्रत्येकी दोन चमचे बेदाणे व बदामाचे पातळ तुकडे

मार्गदर्शन

शक्यतो पसरट कढई/नॉनस्टिक पॅन घ्यावे. त्यात बेसन व तूप घालावे. आंच मध्यम ठेवावी. हळूहळू सगळ्या बेसनाला तूप लागेल. हे मिश्रण सारखे हालवत राहायला हवे. प्रथम खूप घट्ट, ढवळायला कष्ट पडतील असे असेल. अर्ध्या तासानंतर मिश्रण हलके वाटू लागेल व ढवळण्यात सहजता येऊ लागेल. आता ह्या मिश्रणातून तूप सुटूलागेल. खमंग वास व सोनेरी रंग येईल. अजून पाच मिनिटे ढवळून आंच बंद करावी. लागलीच ह्या मिश्रणावर दुधाचे हबके मारावेत आणि चांगले ढवळावे. दुधामुळे मिश्रण चांगले फुलेल. दूध पूर्णपणे एकजीव करावे. साधारण पंधरा मिनिटाने मिश्रण कोमट होईल मग त्यात साखर घालून ढवळून ठेवावे.

साधारण तासाभराने( संपूर्ण गार झाल्यावर) मिश्रण खूप मळावे. साखर व भाजलेले बेसन खूप हलके लागेपर्यंत मळायला हवे. मळून मऊ झाल्यावर त्यात वेलदोडा पूड, बेदाणे व बदामाचे काप घालून मध्यम आकाराचे लाडू वळावेत.

टीपा

मध्यम आंचेवर बेसन छान भाजले गेले पाहिजे तसेच साखर घातल्यावर मिश्रण खूप मळल्यामुळे लाडू मऊ होतात व टाळूला अजिबात चिकटत नाहीत.

4 comments:

  1. बेसन लाडू जमणे ही एक कला आहे. तुम्हाला ती नक्कीच छान जमल्याची पावती फोटोतले लाडू देत आहेत. मस्त.

    ReplyDelete
  2. असे खाणारेही म्हणत आहेत. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

    ReplyDelete
  3. आता खाल्ल्याशिवाय कशी प्रतिक्रिया देणार?

    ReplyDelete
  4. आता पुढल्या भेटीत खिलवते. :):)

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !