जाता जाता एक नजर इथेही........

Thursday, November 4, 2010

हे सुरांनो, चंद्र व्हा...

शुभ दीपावली!!!

हे सुरांनो, चंद्र व्हा
चांदण्याचे कोष माझ्या
प्रियकराला पोचवा ॥

वाट एकाकी तमाची
हरवलेल्या मानसाची
बरसुनी आकाश सारे
अमृताने नाहवा ॥

या शब्दांमधली आर्तता काळजाचा ठाव घेणारीच. डोळे तुडुंब भरलेले, श्वास कोंडलेला, गळा दाटलेला तरीही मन बोलण्यासाठी स्वरांची वाट शोधणारे.... काहीसे जीवघेणे, तर कुठे तरल, भावविवश. शब्द कुसुमाग्रजांचे. या शब्दातली किमया जितकी मनाचा कब्जा घेते तितकेच अभिषेकीबुवांचे स्वर वेड लावतात. या दोहोंच्या मिलाफाची मोहिनी जबरदस्तच. स्वत:ला सुपूर्त करणेच काय ते हाती उरते.

आज दिवाळीच्या रात्री मी एकटीच झोपाळ्यावर बसलेय. दोन वाजत आलेत. दिवसभराच्या गडबड-गोंधळाने दमून व पहाटे लवकर उठायचे आहे म्हणून सारे कसे शांत झोपी गेलेत. रोज भेसूर ओरडणारी कुत्रीही कुठेशी गायब झालीत. थोड्यावेळांपूर्वी अचानक आलेल्या पावसाच्या जोरदार सरीमुळे हवेत किंचितसा कंप आहे. सकाळपासूनच हुरहूर लागली आहे. दिवसभर घरात वर्दळ सुरू असल्याने पराकाष्ठेने थोपवून धरलेले मन आणि अश्रू बांध तोडून मुक्त ओघळत आहेत. त्यांना अडवण्याचा वेडा प्रयत्न मी कधीचाच सोडून दिला आहे. दाटलेला भावनांचा कल्लोळ सावरता सावरता, " हे सुरांनो, चंद्र व्हा " कानात, मनात निरंतर वाजत आहे. मनात वाजणार्‍या या स्वररूपी चांदण्यांच्या कोषात, व्याकुळतेत स्वत:ला झोकून दिलंय.... झोपाळ्याच्या एरवी काहीश्या कर्कश वाजणार्‍या कड्याही या आर्त, हळव्या स्वरांना न दुखावता त्यांच्यात विलीन होऊ पाहत आहेत.

आज मन निवेतो मी, झोपाळा व अभिषेकींचे सूर.... जणू सांगत आहेत, " मोकळी होऊन जा ग बयो, मोकळी होऊन जा.... "

16 comments:

  1. :( :( :(


    निघायची वेळ जवळ यायला लागली की असंच काहीतरी व्हायला लागतं.. नंतरचा विचार करण्यापेक्षा आत्ताच क्षण उपभोगून घे..


    तुला आणि घरी सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!!

    ReplyDelete
  2. हेरंब, अप्रत्यक्षपणे व अभावितपणे मनाच्या ’या’ अवस्थेत सोबत केलीस... धन्यू रे.

    ReplyDelete
  3. हे सुरांनो, चंद्र व्हा
    चांदण्याचे कोष माझ्या
    प्रियकराला पोचवा ॥

    हे तर मला बोलायला हवे... :D

    बरं.. पुढचा विचार करू नकोस.. आत्ता मज्जा करून घे.. :) मी आलो की भेटूच... आणि मी वेळेवर येईन ह्यासाठी तुला काय करायचे आहे ते सांगायला नकोच.. :D

    ReplyDelete
  4. बरोबर...आज आत्ता जो क्षण आहे तो डोळ्यान नीट साठऊन घे...उद्या कोणी बघितला आहे :-)

    ReplyDelete
  5. सुंदर... कधी तरी एकटेपणा थोडा जास्तच जाणवतो.

    ReplyDelete
  6. भाग्यश्री, तुम्ही बायका फारच हळव्या असता बुवा... दिवाळी आहे... मस्त मज्जा कर...जास्त विचार-बिचार करू नकोस :)

    दिवाळीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. Enjoy!!!

    ReplyDelete
  7. >>नंतरचा विचार करण्यापेक्षा आत्ताच क्षण उपभोगून घे..
    +१००
    तुला आणि तुझ्या सगळ्या कुटुंबियांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

    ReplyDelete
  8. :)तुम्हां सर्वांना ही दिवाळी सुखाची, समृद्धीची आणि भरभराटीची जावो.

    ReplyDelete
  9. रोहना, यस्स्स...जोरदार प्रयत्न सुरू आहेच. आणि त्याची पोचही मिळणारच. :) मग, चांदण्यांचे कोष पोहचले ना?? :D

    ReplyDelete
  10. प्रसाद, हो ना. आज मध्ये जगायला आणि मुख्य म्हणजे आनंद घ्यायला शिकायला हवं. हे उमगलं तरी बरेचदा मला ते जमतच नाही. :(
    धन्यू रे...

    ReplyDelete
  11. महेंद्र, काल इतकी अगम्य चमत्कारिक अवस्था झालेली. शेवटी मनाशी झगडणं मी बंद करून स्वत:ला त्याच्या स्वाधीन करून टाकलं. :)

    ReplyDelete
  12. श्रीराज,तुझ्या आदेशाचे पालन करण्याचा निश्चय केलायं रे. आज दिवसभर मस्त मजा केली. :)

    ReplyDelete
  13. विद्या, तेच करतेय आता. ऒक्सिजन भरून घेतेयं. :D

    ReplyDelete
  14. धन्यवाद अनघा. :)

    ReplyDelete
  15. **दाटलेला भावनांचा कल्लोळ सावरता सावरता, " हे सुरांनो, चंद्र व्हा " कानात, मनात निरंतर वाजत आहे. मनात वाजणार्‍या या स्वररूपी चांदण्यांच्या कोषात, व्याकुळतेत स्वत:ला झोकून दिलंय....**



    मनात असलेली ही स्वरमयी चांदण्याची ..दिवाळी
    दोन निरांजनातले अश्रू त्यावर.. रोषणाई
    दूर रात्री एकांतात मुक्त भावबंधन ...दिवाळीतल्या तमांना लक्ष्मिने उजळून दिलेले दिपक्षण जणू..

    या अश्या अमूर्त दिवाळीची ओळख केल्याबद्दल धन्यवाद..
    दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा

    ReplyDelete
  16. वा!क्या बात हैं!
    Yog,तुम्ही त्या माझ्या तरल क्षणांना अजूनच सुंदर केलेत.
    खूप खूप धन्यवाद. :)

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !