जाता जाता एक नजर इथेही........

Friday, May 1, 2009

चकली



जिन्नस

  • एक वाटी मुगाची डाळ
  • तीन वाट्या मैदा
  • प्रत्यकी तीन चमचे तीळ ओवा
  • प्रत्येकी चार चमचे धणेजिरे पूड, तिखट
  • दोन चमचे हिंग, एक चमचा हळद चवीपुरते मीठ
  • तळण्याकरीता तेल

मार्गदर्शन

कुकरच्या भांड्यात मुगाची डाळ धुऊन घेऊन दोन वाट्या पाणी घालावे. मैदा कापडात घेऊन त्याची सैलसर पुरचुंडी बांधावी. कुकरमध्ये डाळ मैदा ठेवून तीन शिट्ट्या कराव्या. वाफ कमी झाली की मैदा ताटात काढून घ्यावा. वाफवल्यामुळे मैद्याचे ढेकूळ तयार झालेले असेल ते फोडून पुन्हा पीठ करावे. मैदा गरम असतानाच केले की पटकन होते. संपूर्ण गुठळ्या मोडल्यावर उकडलेली मुगाची डाळ घालावी. (दोन वाट्या पाणी घातल्यामुळे जास्तीचे पाणी उरत नाही. जर पाणी जास्त असेल तर ते वेगळे काढून ठेवावे लागेल तसे घालावे. ) मीठ, हिंग, हळद, धणेजिरे पूड, तिखट, ओवा तीळ घालून मळावे. साधारण अर्धा तास ठेवावे. तळण्यासाठी पुरेसे तेल घेऊन प्रथम व्यवस्थित गरम करून घ्यावे नंतर मध्यम आच ठेवून नेहमीप्रमाणे चकल्या तळाव्यात. ह्या चकल्या अतिशय कुरकुरीत होतात जराही तेल राहत नाही. पीठ भिजवताना त्यात मोहन किंवा साधे तेल अजिबात घालावे लागत नाही.

टीपा

जिथे चकलीची भाजणी सहजगत्या मिळत नाही किंवा आयत्या वेळी करायची लहर आल्यास पटकन करता येतात. आठ दिवस जरी राहिल्या तरीही तेल अजिबात गळत नाही. तीळ, ओवा, धणेजिरे पूड तिखट हे थोडे जास्तच टाकावे म्हणजे भाजणीचा खमंगपणा येतो. हमखास कुरकुरीत होतात.

4 comments:

  1. thnks this is very good idea

    ReplyDelete
  2. looks like a very different way of making chakli,thanks.But if i use wheat flour (kanik) instead of maida ,will it be the same crunchy chkali?just a thought ,diwali is around the corner and lookinfg chakali rep,and stumbled upon ur post.Once again thnks for sharing low cal ,healty rep.




    9

    ReplyDelete
  3. स्वाती, सुस्वागतम व धन्यवाद! मैद्याएवजी कणिक वापरली तर चकल्या तितक्या खुसखुशीत-कुरकुरीत होणार नाहीत. पाव भाग कणिक वापरून पाहता येईल. पण दिवाळीसाठी करशील तेव्हां कणकेचा प्रयोग नको करुस गं, एरवी कधीतरी ट्राय कर. होईल नक्की चांगली तरिही... ! दिवाळीत किंचित ( च ) हाताला व जिभेला सैल सोडायला हवेच नं? :)

    पुन्हा एकदा आभार व दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!!

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !