" अगं, एकटीने खाऊ नकोस. वाटून खावे नेहमी. किती वेळा सांगायची तीच गोष्ट? राणू, असा अप्पलपोटेपणा कधी करायचा नसतो बरं. आपल्याला कितीही थोडंसं जरी मिळालं नं तरीही त्यातला काही भाग दुसर्याला द्यावा. त्यामुळे काय होतं माहीत आहे तुला? असं बघ, एक लाडू मी तुला दिला तर तुला त्या क्षणापासून तो पोटात गडप होईतो किती छान वाटतं. पण एकदा का तो खाऊन संपला की पुढच्या पाच मिनिटात त्याचं मनातलं अस्तित्वही पुसलं जातं. बरोबर? पण हेच जर त्या लाडूतला अर्धा भाग तू मनीला किंवा दादाला दिलास तर त्यांच्या चेहर्यावरचे आनंदी भाव बरेच दिवस तुझ्या मनात राहतील. त्या एवढुश्या लाडवातून एक तात्कालिक आनंद व एक दूरगामी आनंद मिळेल. खरं नं? मग, आता ह्या लाडवाचे दोन तुकडे होणार की..... अगं, काय कारटी आहे पाहा. खाऊनही टाकलास. छान. म्हणजे घागर पालथीच होती का नेहमीप्रमाणे. मुलखाची अप्पलपोटी आहेस बघ तू. आता दात काढत कशाला उभी आहेस? पळ इथून. "
" बाई बाई, कसं होणार या पोरीचं पुढे.... पोरीच्या जातीला इतका अप्पलपोटेपणा बरा नाही. सूनबाई, तुझी फूस आहे तिला म्हणून ही अशी सारखी मन मानेल तसे वागत असते. मी पदोपदी तिला टोकते मग मी वाईट. पण तूच सांग, अशाने निभेल का गं या जगात? वेळ प्रसंगी कशाकशाची वाटणी आणि तीही कोणाबरोबर करावी लागेल हे सांगता येईल का? मग तेव्हां मन खट्टू करून नाईलाजाने करण्यापेक्षा लहानपणीच मनाला मुरड घालावी. म्हणजे मग उन्मळून पडायची वेळ येत नाही हो. "
राणू...... रागिणी, फक्त पाच वर्षांची तर आहे माझी पोर. नाही म्हणजे एक तीळ वाटून खावा वगैरे सगळं ठीकच आहे पण ते कधी? एकच तीळ असेल तेव्हां नं... आत्ता प्रत्येकाला चांगले चार चार मिळतील इतके लाडू डब्यात आहेत तरीही राणूला सांगायचे की अर्धा दादाला दे..... तिच्या बालबुद्धीलाही लाडवांची रास दिसतेय ना.... मग तिने हे गणित कसे जुळवावे. आणि किती जड शब्द वापरायचे. तिला अर्थ तरी कळतो का त्याचा.... इतकुश्या जीवाकडून नको तिथे नको त्या अपेक्षा करायच्याच कशासाठी? ते जाऊदे, पण त्यापुढची ती चार वाक्ये..... सासूबाईंनी इतक्या क्षुल्लक गोष्टीवरून बोलावीत? घाव इतका जिव्हारी लागला असून वाटणीच्या दीक्षा आजही द्याव्यात. का? पुन्हा पुन्हा हे घाव सोसण्याकरता मनाला तयार करायचे, तेही स्वत:च?
बाकी, वाटणी बरेचदा आपल्या हातात नसतेच. कुशीत घेणारा नवरा जेव्हां मनातून कोणा दुसरीचाच विचार करत असतो.... तेव्हाही वाटणी होतेच. कधी उमजून तर कधी दृष्टीआड.... कोणी आपल्याच हाताने बायकोला स्वार्थासाठी बॉसच्या हाती सोपवतो तेव्हाही वाटणी होतेच. तीही बळजोरीने. अंगाला चिकटलेल्या अनेक नजरा ओरबाडतात तेव्हाही अप्रत्यक्ष वाटणी होतेच. जीवाभावाची सखी डोळ्यादेखत आपला प्रियकर पळवते, आणि तो ही तिला साथ देतो....... तेव्हाही वाटणीच होते. शरीराची वाटणी तात्कालिक, मनाची चिरकाल. एकदा भोगलं की शरीराचा भोग संपला आणि मनाचा सुरू झाला. आपलेच मन आपल्यावर पुन्हा पुन्हा बलात्कार करत राहते. दु:ख नेमके कशाचे करायचे? वाटणीचे..... भोगाचे की माझ्याच वाट्याला का याचे? लाडवासारखे मनाचेही तुकडे तोडून वाटून टाकता आले असते तर.....
बापरे छोट्या गोष्टीपासून सुरु झालेली विचार शृंखला फारच दूर गेली. हम्म्म.
ReplyDeleteकसा आहेस रे? बरेच दिवसांनी दिसलास... :)
ReplyDeletesundar lihile ahe..
ReplyDeleteFaarach chhan.
Sharing saglyannich shikaayla paahije ani khoop lahaan mulaanni tya vayapaasoon mothya lokanchya tadjoditale kaheech shikayla nako. Mothe hota hota shikteelach..
Tya vayaat khaudet dababhar ladu..agadi trupt hoiparyant..
Btw. Mee datstan e avaragi,airport ani BPO lihoonahee tumhi majhya blogvarchee upasthiti band keli mhanoon vaeet vatale. Vaat pahat hoto.
नचिकेत, ब्लॉगवर तुझे स्वागत आहे.:) आधी मला वाटले की माझ्या बेटरहाफनेच कमेंटले आहे. नंतर लक्षात आले की तू आहेस. आनंद वाटला. धन्यवाद.
ReplyDeleteआपण ज्यांना आपले समजतो त्यांनी दखल घेतली की खूप बरे वाटतेच. ( खरे तर हे मी मुद्दामहून सांगायची गरज नाहीच, तू सहमत असशीलच. )
काही असे गिनेचुने लोक आहेत ज्यांच्या पोस्टवर मी लिहीतेच लिहीते. अगदी सुरवातीपासूनच. त्यात तू आहेसच. तुझी विचारशैली भावते मला. सगळ्या पोस्ट वाचल्या आहेतच आणि कमेंटलेही आहे. अपवाद या काही. लिहीतेच. :)
छान आहे. मला दोनदोन धाकट्या बहिणी असल्याकारणाने हे वाटून घेणे अगदी रक्तात मुरले आहे. :)
ReplyDeleteइथे गेल्या काही दिवसांपासून माझी ऑफिसमधील एक मैत्रीण माझ्या लालबुंद छत्रीकडे नजर लावून होती. तिच्या म्हणण्याप्रमाणे मी तशीच दुसरी छत्री आणून द्यायला हवी होती. ते काही जमत नव्हते. मग तीच छत्री तिच्या खुर्चीला लावून टाकली तेंव्हा तिला बसलेला आश्चर्याचा इतका मोठा धक्का बघून आधी मला धक्का बसला... कळेना कि एका छत्रीचीच तर गोष्ट होती! त्यात काय मोठं झालं. तिने नंतर पाठवलेला एसमएस मात्र मनात घर करून गेला. :)
काय बोलणार, डिस्टर्बिंग सत्य आहे :(
ReplyDeleteतायडे अगं हल्ली काय चालवले आहेस... अगं शब्दच सुचत नाहीत कमेंटायला....
ReplyDeleteसुंदर....
@नचिकेत... अगदी बरोबर.... मोठे होणारच असतात ना मुलं... खरचं नकोय लहानपणीच त्यांच्यावर प्रौढत्त्व लादायला....
एका सुतावरून आख्खा गुंता तयार करण्यात तू माहीर आहेस !
ReplyDeleteबापरे ...! पण हे सर्व अतर्क्य नाही आहे . मनाचे तुकडे पाडणे म्हणजे प्रत्येक तुकडा सच्चा आहे हे गृहीतक झाले ...... !
पण जोपर्यंत आपल्या ओंजळीतील तुकडा, हाच अखंड अथवा `शुद्ध' आहे , हा विश्वास पटत नाही, तो पर्यंत प्रत्येक तुकड्याकडे अविश्वासानेच बघितले जाते ग !
जरी खात्री असली तरी ....... :(
एक कटु सत्य.. :(
ReplyDeletewhen my mother got married and moved in with my father into the army quarters, she had her room for the first time. They got apples in ration. Father picked up one and dug his teeth into it. He tossed one at her. She was shocked. She had never had one whole apple by herself. She was 27. Always shared things with her 5 siblings.
ReplyDeleteSomewhere when we share, we satiate cravings that otherwise can take form of ominous hunger. Hunger of the mind and body with dire consequences such as you mention.
Heart stopping.
अवघड!
ReplyDeleteकटू सत्य! :(
अनघे, अगं तिला तू तुझी छ्त्री देऊन टाकशील हे अपेक्षितच नसेल. किंवा तिच्या सततच्या भुणभूणीने वैतागून तर दिली नसशील... कधी कधी न चांगुलपणाचीही भीतीच वाटते गं.:)
ReplyDeleteआभार आनंद.
ReplyDeleteतन्वे, आजकाल अगदी लहान मुलांनाही मोठ्या माणसासारखे समजावण्याचे पाठ दिलेले पाहतेय. बिचारी पोरं, त्यांना कशाचेही आकलन होत नसते. केवळ भीतीपोटी उभी असतात समोर. :( पुढे आयुष्यभर हेच तर करायचे आहे....जरा जगू तरी द्या निर्भेळ. पण नाही...
ReplyDeleteराजीव, आपल्या सभोवताली घडणार्या घटना खोलवर नोंदल्या जात असतात. मग अचानक कधीतरी उसळी मारून वर येतात. तुम्ही म्हणता तसेच... प्रत्येक तुकडा( माणूस व नाते ) सच्चा [ निदान आपल्या बाजूने तरी... समोरच्याची १००% ग्वाही कशी द्यावी?? ( मनातून कितीही द्यावीशी वाटली- तितका विश्वास वाटला तरीही... )] मग सुरू होतो छाप-काट्याचा खेळ. अव्याहत...
ReplyDeleteआभार.
धन्यवाद मनमौजी. :)
ReplyDeleteवंदू, अपरिहार्यतेने गोष्टी वाटून घ्याव्या लागल्या तर मनाला तितकेसे दु:ख होत नाही. किमान ते स्वत:ची समजूत घालून घेते. परंतु, जेव्हां केवळ हव्यासापोटी, मालकी असल्यागत कोणी आपला वापर करू पाहते तेव्हां मात्र....
ReplyDeleteधन्यू गं.
धन्यवाद विभी.
ReplyDeleteखरंच खूपच अप्रतिम पोस्ट.. शेवटचा परिच्छेद तर प्रचंड आवडला.. !! शब्दच नाहीत..
ReplyDeleteधन्यवाद हेरंब.
ReplyDeleteभानस, अंतर्मुख करणारा लेख. तुझी लिखाण शैली उत्तम आहे. मस्तच!
ReplyDeleteअभिलाष, ब्लॉगवर स्वागत आहे. धन्यवाद. :)
ReplyDelete:-S अंतर्मुख करणारं.... :-S
ReplyDeleteसौरभ धन्यू रे. आवर्जून वाचतो आहेस खूप छान वाटतेय.
ReplyDelete