जाता जाता एक नजर इथेही........

Sunday, September 13, 2009

असाहाय....

दु:ख आम्ही खातो

वर अपमानाचे पाणी पितो

आपल्यांनीच केलेली अहवेलना

सोसायला परत परत तयार राहतो

सामर्थ्य आमचे तोकडे आहे

त्याला असाहाय्यतेचे कुंपण आहे

कुंपणात अडकलेले आम्ही

केवळ प्रेमाचे भुकेले आहोत

पूर्व आम्हाला पारखी झाली

सगळीकडे पश्चिम पसरली

अवकाशी उदासी भरून उरली

क्षितिजाच्या सीमेला भिडली

आता एकच गोष्ट निश्चित झाली

सोसणे आहे आपले नशिबी

सोसणे ही ही एक कला आहे

ती बाणवावी लागते अंगी

नाही रागवायचे नाही भांडायचे

आनंद आहे म्हणत हसायचे

हसत हसत निघून जायचे

कायमचे....

6 comments:

  1. मस्त आहे ... तुम्ही केली ??? लिहायला घेतल तेंव्हा नेमके कुठले विचार होते मनात ??? कुठला विषय मनात घोंघावत होता ?

    ReplyDelete
  2. रोहन,होय रे.माझीच रचना आहे ही.
    एका असाहाय आई-वडीलांच्या दृष्टीकोनातून केलेली. स्वत:ची मुले जेव्हां वारंवार तुम्ही आम्हाला नको आहात हे दर्शवितात,अहवेलना करतात,तेव्हांची मन:स्थिती काहीशी अशीच असावी.
    आभार.

    ReplyDelete
  3. संगमनाथ स्वागत व आभार.:)

    ReplyDelete
  4. मालतिनन्दनSeptember 14, 2009 at 3:36 AM

    दु:ख जे दूर आहे ते त्यासहि कवळीत घ्यावे
    वडवानलाचे वस्त्र ल्यावे,काळजाचे कातळ करावे
    वेदनांचे प्रपातही मग इवलाले तुषार व्हावे

    ReplyDelete
  5. अरुणदादा, क्या बात हैं! अप्रतिम.
    आभार.

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !