( फोटो जालावरुन )
अक्राळविक्राळ महानगरातील
सदाची वेठबिगार मी
धुरकट मलीन रेघांतून
मनाला जीवंत ठेवणारी मी
वाट्याला आलेले मुकाट सोसले
तरी हळवे स्वर जपले मी
जगात असेनही आस्तित्वहीन
मनात सूर्याचे तेज तेवले मी
दबून, मोडून जरी जगले
मनात प्राजक्त बहरला मी
असूनही वेठबिगार
अंतरंग माझे जपले मी
भाग्यश्री
ReplyDeleteकविता अप्रतिम... आवडली.. ही बघ खाली अजुन एक माझी आवडती कविता मंगेशाची..
---------------------------------
गच्च पिकलेला अंजीर
उघडल्यावर
लालसर, ओलसर लुसलुशीत
त्याचे पिकलेपण
घास घेतल्याखेरीज त्याचा
मोक्ष नसतो त्यालाही - आपल्यालाही
कधी कधी
शब्द तसेच आतुन
येतात पिकुन
अशा वेळी शब्दांचा अर्थ चाचपुन भागत नाही,
अंजीरागत पिकलेल्या शब्दांचा
घासच घ्यावा लागतो.
मंगेश पाडगांवकर
(कविता माणसांच्या माणसांसाठी)
महेंद्र, मंगेश पाडगांवकर...त्यांची सलाम ही माझी खूप आवडती कविता.
ReplyDeleteतू नमूद केलेल्या कवितेतही किती गर्भित अर्थ भरलेला आहे. अप्रतिम.हे असे शब्दांचे अतीव पिकलेपण आरती प्रभूंच्या समग्र साहित्यात ठायी ठायी जाणवते.
आभार.