फोटो जालावरून
वाळल्या भेगाळल्या खपल्या
फिरूनी एकदा लसलस ओल्या
सैरभैर पापण्यांच्या झऱ्यावर
थरथरतात नकारांच्या फुल्या
आता तरी समजून घे गं
सांजेचे ऊन तुझे नाही गं
जडलेल्या जीवाला समजावं
दगड होऊन पड म्हणावं
दगडांना रूजणं नाही माहीत
प्रेमाचे धुमारे त्यांना फुटत नाहीत
ऊरी फुटले तरी असतात मुकाट
कुणी ठोकरलेच तर दुसरी वाट
इतकी विषण्णता,
ReplyDeleteइतकी विकलता बरी नाही.
कोण म्हणतं,
दगडाला रुजणं माहीत नाही?
मनांत डोकाऊन पहा.
जो रुजलाय तो दगड नाही?
ह्म्म्म्म........
ReplyDeleteमस्त कविता..
ReplyDeleteदगडात कोमलता शोधण्यापेक्षा... दगडाच्या कणखरतेकडे लक्ष द्यावे!
जे दगडात नाही त्याची वाट बघण्यात काय हासील? अन मनाची कोमलता अशी का वाहवायची..
कदाचित कणखरता+कोमलता एकत्र आल्याची जादू वेगळी असेल, त्याचा शोध घ्यावा!
स्वीकृती समाधानाची पहीली पायरी असते... अन निरर्थक अपेक्षा ही निराशेची सुरुवात असते!
निलेश, स्वागत व आभार.खरे आहे पण कधी कधी.... असो. तुझे शेवटचे वाक्य एकदम पटेश.:)
ReplyDelete