जाता जाता एक नजर इथेही........

Sunday, September 27, 2009

सिध्दलाडू


जिन्नस

  • तांदुळाची तयार उकड दोन वाट्या
  • एक चमचा जिरेपूड, अर्धा चमचा आख्खे जिरे, चवीनुसार मीठ
  • तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून
  • थोडी कोथिंबीर बारीक चिरून
  • एक चमचा तेल व दोन चमचे तूप

मार्गदर्शन

गणेश चतुर्थीला मोदकांबरोबरच सिद्धलाडूचाही नैवेद्य दाखवतात. नैवेद्याच्या सिद्धलाडूत मिठाशिवाय काहीही घालत नाहीत. मात्र नंतर आपल्याला खाण्यासाठी सिद्धलाडू अशाप्रकारे बनविले जातात. हे लाडवांसारखे दिसत नसूनही याला सिद्धलाडू हे नांव का पडले आहे हे बरेचदा आजीला विचारले परंतु तिलाही त्याचे उत्तर माहीत नव्हते. त्यामुळे ती नेहमी म्हणे, " हात मेल्यांनो, खायचे सोडून नको ते प्रश्न कशाला विचारता रे. "


मोदक करून झाले की उरलेल्या उकडीमध्ये चवीनुसार मीठ, जिरेपूड व थोडे आख्खे जिरे, हिरवी मिरची व कोथिंबीर घालून उकड मळून घ्यावी. नंतर हाताला थोडे तेल लावून उकडीचे छोटे छोटे गोळे करून त्यांना आपण जश्या गाठी मारतो तसा आकार देऊन कुकरमध्ये वाफवून घ्यावे. गरम असतानाच थोडेसे तूप सोडून खायला द्यावे. जिरे-मिरचीमुळे सुंदर चव लागते.

तांदुळाच्या उकडीच्या निवगीऱ्या करतात. त्या थापून करतात. सिद्धलाडू हे तसेच फक्त आकार वेगळा.

7 comments:

  1. ह्या सिद्धप्रिटझेल वाटताहेत आकारावरुन :)

    ReplyDelete
  2. अपर्णा, अग अगदी माझ्या मनात पण हेच आले होते पाकृ टाकताना,:)
    आभार व विजयादशमीच्या अनंत शुभेच्छा!!

    ReplyDelete
  3. Tai,
    Tandalachi ukad banavnyasathi margadarshan have aahe,krupaya tehi post karave.
    pushpa

    ReplyDelete
  4. पुष्पा, थोडा विलंब झालाय उत्तर द्यायला. माफी!

    हो. जरूर. उद्या इथेच पोस्ट करते हं का. :)

    ReplyDelete
  5. पुष्पा,

    मोदकासाठी उकड काढण्यसाठी....

    साहित्य : १ वाटी तांदुळाची पिठी, पाऊंण वाटी पाणी,१ छोटा चमचा तेल,चिमुटभर मीठ,चिमुटभर साखर.

    कृती : पाण्याला उकळी आली कि मीठ व तेल घालणे. ढवळून लगेच तांदुळाची पिठी घालणे.
    व एकदा ढवळून वर घट्ट झाकण ठेवणे. ५ मिनिटांनी उकड गरम असतानाच मळून घेणे,
    घट्ट वाटल्यास हाताला पाणी लावून मळणे.

    ReplyDelete
  6. मोदकाची उकड चिकट होऊन एकसंध व्हावी म्हणून त्यात तांदूळ पिठी बरोबरच एक चमचा मैदा घालावा...

    तसेच तेलाऐवजी लोणीही (घरगुती) वापरले तर छान होते....

    ReplyDelete
  7. आरूषला मोदकाची पारीच आवडते. यंदा त्याच्या साठी हे करून पाहीन :)

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !