जाता जाता एक नजर इथेही........

Friday, September 11, 2009

रंजीश ही सही.......


आज सकाळपासून मनात हीच गझल घुमते आहे. काही काही गाणी, गझला, बोल, शब्द, प्रसंग, स्थळ अनेकदा तर लकबी, देहबोली, पाऊस, पिवळट मातकट चमत्कारिक संधिप्रकाश, दुरावलेले तरीही आपल्या मनात खोलवर रुतून बसलेले जीवलग............ यातले काहीतरी मनात पावलांचा आवाजही न येऊ देता सारखे समोर येऊन उभे ठाकते आहे. काहीसे दूर मात्र हृदयाशी कवटाळलेले आठवणींची आवर्तनांवर आवर्तने उठवते आहे. अन मग रंजीश ही सहीचे सूर अपरिहार्यच आहेत. सगळा दिवस या बोलात व सुरातच डुबणार.

रंजीश ही सही दिल हि दुखाने के लिए आ
आ फिर से मुझे छोड के जाने के लिये आ

पहले से मरासिम न सही फिर भी कभी तो
रस्म-ओ-रहे दुनिया हि निभाने के लिये आ

किस किस को बतायेंगे जुदाई का सबब हम
तू मुझ से खफा है तो जमाने के लिये आ

कुछ तो मेरी पिंदार-ए-मोहब्बत का भरम रख
तू भी तो कभी मुझ को मनाने के लिये आ

एक उम्र से लज्जत-ए-गिरया से भी महरुम
ऐ राहत-ए-जान मुझ को रुलाने के लिये आ

अब तक दिल-ए-खुश-फहम को तुझ से है उम्मीद
ये आखरी शमाँ भी बुझाने के लिये आ

माना की मुहोब्बत का छुपाना हैं मुहोब्बत
चुपके से किसी रोज जताने के लिए आ

जैसे तुझे आते हैं न आनेके बहाने
ऐसे ही किसी रोज न जाने के लिए आ

अहमद फराज यांनी लिहीलेली व मेहदी हसन यांनी गायलेली
गजलेचा सूर अतिशय दु:ख, विरहाने तडपणारे हृदय वेदनेने विनवते आहे असाच आहे

हिरव्या रंगातले शेर मात्र अशआर तालिब बागपती यांचे आहेत.


काही शब्दांचे अर्थ
मरासिम = नाती, पिंदार-ए-मोहब्बत= प्रेमाची खोली/अभिमान,
लज़्ज़त-ए-गिरिया=दु:खाची/अश्रुंची चव, महरूम=वंचित

7 comments:

 1. भानस ताई
  मला वाटते की पहीली ओळ
  रंजीश ही सही दिल हि दुखाने के लिए आ
  अशी नसुन
  रंजीश ही सही दिल हि दुखाने के लिए "गा"
  अशी आहे....
  अगदी कान देउन ऎकले की लक्शात येते...

  मनाली

  ReplyDelete
 2. मनाली स्वागत व आभार.
  अगं हे गाणे तर अगणित वेळा ऐकले आहे शिवाय लिहीलेलेही आहे पण तरीही आता तू म्हणतेस तर उद्या पुन्हा अगदी बारकाईने ऐकेन.:)गुगलवर जाऊन अनेक ठिकाणी बोल तपासलेत पण कुठेही "गा" असे अजून तरी मिळाले नाही गं.
  आणि ते "गा" असेल तरीही किती योग्यच(संयुक्तिक) आहे ना?

  ReplyDelete
 3. kharach hi gazal agdi ved lavnari ahe. Runa Lailachya avajatli pan mast ahe.

  ReplyDelete
 4. मालतिनन्दनSeptember 13, 2009 at 7:28 AM

  रंजीश,

  माझीही अतिशय आवडती गज़ल. शेवटी दिलेले दोन शेर मात्र मला नवीन आहेत. माझ्याकडे एक जुनी कॅसेट आहे त्यात ते नाहीत. मात्र त्यातही ’दिल हि दुखाने के लिए आ’असेंच आहे. तरीही ही गज़ल पेश केल्याबद्दल जियो!!

  ReplyDelete
 5. क्रान्ति स्वागत व आभार. तशी आपली ओळख माबोची आहेच,:). हो ना रुना लैलाच्या आवाजातलीही छान आहे.

  अरुणदादा,तुझी रंजीश ही सहीची आठवण करून देणारी कविता अप्रतिम आहे. आभार.

  ReplyDelete
 6. मला माहित नव्हत की ही गझल आहे. मी ही पहिल्यांदा एक दूरदर्शन वरील सिरीयल (Love story) मध्ये ऐकली आणि खूप आवडली. thanks link येथे post केल्याबद्दल.

  ReplyDelete
  Replies
  1. jivanika, अगं स्वागत आणि आभार! :)

   Delete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !