जाता जाता एक नजर इथेही........

Tuesday, September 22, 2009

तू ही मेरी शब हैं......


तू ही मेरी शब हैं......

माझा लेक - शौमित्रने गायलेले गाणे सादर करीत आहे. ऑगस्टमध्ये एका आठवड्याच्या सुटीवर आलेला असताना आम्ही दोघेही त्याने गावे यासाठी त्याच्या मागे लागत होतो. पण तो काही दाद देईना, शेवटी कॉलेजला परतायच्या आदल्या दिवशी बाबाने हे गाणे त्याला अचानकपणे रात्री एक वाजता म्हणायला सांगितले. अतिशय साध्या क्वालिटीचा माइक वापरून गाणे रेकॉर्ड केले आहे.



मूळ गीत:

सिनेमा: गॆंगस्टर. गीतरचना: सईद कादरी. संगीत: बंटी राजपूत. गीत गायक: कॄष्ण कुमार मेनन

36 comments:

  1. wowwwww...अफ़लातुन गायले आहे.माउ कडुन shomula heartiest congrats !!for a mnt mi mhatala koni aahe hya v4t hote..same to same..good..ek navin gayak bolywood la milala.

    ReplyDelete
  2. Hey Sahi mhatala aahe........ really it wil b a rocking moment for three of you....... n u both cath it perfectly......... Congrats to ur son Shomu.........
    He looks cool.........

    ReplyDelete
  3. मालतिनन्दनSeptember 22, 2009 at 10:33 PM

    खल्लास! क्या बात है!! हे गाणे ऐकले आणि मग मुळ गाणे शोधून (क्षमा! मी हल्लीची नवीन गणी फारशी ऐकलेली नाहीत)तेही ऐकले. शोंमूला हे गाणे सही सही जमले आहे.अभिनंदन! तू म्हणालीस त्या प्रमाणे साधा माईक वापरून केलेले ध्वनिमुद्रणही खूपच छान झालेले आहे. मला अधिकच मजा आला, कारण लगेचच कॉलेजचे दिवस आठवले. अशी हौशी गाणीबजावणी करणार्‍या एका ग्रूपचा मी मेंबर होतो. ते दिवस आठवले. पुन्हा एकदा अभिनंदन.

    ReplyDelete
  4. क्या बात है.. मस्त.. म्हंटलंय...!! आवाज पण खुपच छान आहे. गाणं शिकलाय का शोमु? की हौस म्हणुन म्हणतो? रेकॉर्डींग पण छान झालंय.

    ReplyDelete
  5. माऊ,आनंद झाला तुझी इतकी मनापासून दिलेली दाद पाहून. खूप आभार,:)

    दिप्ती, अग हो ना. खूप मस्त वाटले. आभार.

    अरुणदादा,तुझी दाद मिळाली.छान वाटले.अनेक आभार.

    महेंद्र, अरे मी वाटच पाहत होते.आम्ही मायदेशात असताना सहा वर्षे शोमू गाणं शिकला आहे. वय वर्षे ५ ते ११.इथे आलो मग शिकवणी बंद झाली. पण त्याला आवडते, लहर आली तर म्हणतो.:)
    तुला आवडलेले पाहून आनंद वाटला. आभार.

    ReplyDelete
  6. Hey That's Gr8 !!

    Shomit Rocks \m/

    Keep it up Bro..

    Video is also nicely created !

    Njoy !

    ReplyDelete
  7. याचा आवाज खूपच मुलायम आहे...आणि लहानपणी केलेले गाण्याचे संस्कार कायम राहतात हे जे मी ऐकलय ते याचं गाणं ऐकुन पटतय...मुख्य इथे राहुन त्याचे उच्चार चांगले आहेत हा एक मोठा + आहे...माझ्यातर्फ़े शौमित्रला खूप खूप शुभेच्छा...

    ReplyDelete
  8. अपर्णा,प्रतिक्रियेबद्दल आभार.सूर-तालाचे गणित पक्के आहे त्याचे ही जमेची बाजू शिवाय तू म्हणतेस तसे बालवयात शिकलेले-घोटलेले अजूनही आठवतेय.:)

    ReplyDelete
  9. खुप सुंदर गायलंय तुमच्या लेकाने !!!

    ईंग्रजीत ज्याला soothing voice म्हणतात तसा आहे त्याचा आवाज...

    ReplyDelete
  10. are.... Evadhee mahatwachee post vachayala ushir jhala. :( Jara vyasta gele don divas. Arthat gane aikaley adhich. Firat chaan aahe Shomuchya galyat he punha ekvar sangate. Ani photos ekdam eshtyle :)

    ReplyDelete
  11. सीमा मला वाटलेच तू गडबडीत असणार.पुन्हा एकदा धन्स गं.

    ReplyDelete
  12. मला तसे गाण्यामधले फार कळत नाही पण ऐकायला मस्त वाटले. एक सांगायची गोष्ट म्हणजे आवाजापेक्षा दिसायला सही आहे शौमित्र... कसले सही फोटो आहेत.. भारीच.. :D

    ReplyDelete
  13. रोहन, तुझी कमेंट शोमूला सांगितली.:)

    शौमित्रने तुम्हा सगळयांचे आभार मानलेत.:)

    ReplyDelete
  14. sundar gane gayale ahe.jus came across ur blog n heard this song.mala ganyatle far kahi kalat nahi.pan awazamadhye ase kahitari ahe je samorchyala khup impress karte.sundar awaz asnaryani gayala pahije kharach.shoumitra dada la majhyakadun shubheccha sanga.aishwarya

    ReplyDelete
  15. khup sundar gane gayale ahe shoumitra dada ne.me asech maaybolivarun surfing kerta kerta tumchya blogvar pohochle.mala ganyatle far kahi kalat nahi.pan evdhe matra nakki sangen shoumitra dada chya awazat ase kahitari ahe je samorchyala impress karte.changla awaz asnaryani nehmi gayala pahije.majhya abhalbhar shubhechha.

    ReplyDelete
  16. ऐश्वर्या, स्वागत व आभार.:) तुझी मनापासून व आवर्जून दिलेली प्रतिक्रिया शोमूला कळवते ग.

    ReplyDelete
  17. सोमवार, सप्टेंबर २८, २००९
    दसरा
    शोमूच्या गाण्यावरच्या प्रतिक्रिया वाचल्या. वाचताना खूप आनंद आणि अभिमान वाट्त होता. आपला नातू इतका छान गातो, त्याच्या गाण्यावर इतकी उत्तमोत्तम मते व्यक्त होताहेत हे बघून किती समाधान वाटले म्हणून सांगू? तुझा blog कृतकृत्य झाला.
    तुझ्या blogवरच्या विविध खाद्य पदार्थांची डिशमधली सुबक सजावट आणि त्यांच्या कृती (मार्गदर्शन) याला तोडच नाही. बघूनच वाचणाराच्या तोंडाला पाणी नाही सुटले नाही असे होणेच शक्य नाही. बटाटेवड्यांसारखा जुना पदार्थ. पण तरीही तुझ्या हातात तो नवा आणि ताजा बनला आहे.
    इतर लेखनही दिवसेदिवस जास्त सफाईदार होत चालले आहे. शिवाय त्या्तही तू विविध प्रकार हाताळतेस ते फार चांगले आहे. कथा, व्यक्तिचित्रण, प्रवासवर्णन इत्यादी. कविता तर तू फार पूर्वीपासून करतेसच. त्यात तुझा हातखंडा आहे. त्यांचे रूपही अधिकाधिक देखणे होते आहे.
    सर्वात महत्त्वाचे म्हणजे यातले सातत्य. अग बाई, ही गोष्ट अत्यंत कठीण आहे. आळस न करता लिहायचे म्हणजे येरागबाळाचे काम नाही. तेथे पाहिजे जातीचे।
    अजूनपर्यंत मी मोघम लिहित असे. आज उघड लिहिणार आहे. म्हणून रागावू मात्र नकोस. आपल्या सुनेचे कॊतुक सासूने नाही करायचे तर कुणी करायचे? नातवाने मला चांगला chance दिला. त्याच्या कॊतुकाच्या निमित्ताने मी ही संधी साधली.
    खरोखरीच मला तुझा आणि तुझ्या लाड्क्या लेकाचा (आणि माझ्या लाड्क्या नातवाचा) खूप खूप अभिमान वाटतो.
    अंजली सरदेसाई

    ReplyDelete
  18. आई, आज खरेच माझा ब्लॊग कृतकृत्य झाला.विजयादशमीच्या ह्या अमूल्य भेटीने मला अतिशय आनंद दिलाय.औपचारीकपणे आभार मानत नाही. परंतु तुमचे साहित्यातले स्थान खूप वरती आहेच शिवाय तुमची चिकाटी तर सर्वश्रूत आहेच.आज तेविस वर्षे तुमच्याबरोबर असल्याने तुमच्या अनेक गोष्टींचा पगडा आहेच माझ्यावर.:)

    शोमू जर शिकत राहिला असता किंवा असे म्हणूयात की त्याला गाणे शिकणे पुढे सुरू ठेवणे आम्हाला उपलब्ध करून देता आले असते तर तो निश्चितच अजून चांगले गाऊ शकला असता. असो. शिकण्याला वयाचे बंधन नसते ह्याचा धडा त्याला आजीकडून मिळालेला आहेच.:) शिकेलही पुढे कधी तो.

    विजयादशमीच्या शुभेच्छा!!!

    ReplyDelete
  19. मी कशी नाही पाहिली ही पोस्ट.....बरोबर आहे मी नव्हतेच ना तेव्हा घरी जेव्हा तु ही पोस्ट टाकलीस....मस्त गातोय ग हा!!!
    माझं कार्ट पण जातय गाण्याच्या क्लासला साउथ ईंडियन बाई आहे टिचर त्यामुळे सध्या ’गजानन’ चा उच्चार ’घजानन’ वगैरे चाललय,....बघु काय होतय ते...
    पण शोमुला अभिनंदन कळव...

    ReplyDelete
  20. तन्वी,आभार. शोमूला सांगते.:)
    तुझ्या लेकाला शुभेच्छा.

    ReplyDelete
  21. Hello Bhanasa tai,
    Mi Sayali. Roj tumchya blog war yete ya utsuktene ki aaj kay navin asel "sardesai"nchya blogwar? tumhi kadhich nirash karat nahit, he awarjun sagawese watate..Tumchi hi post baghitli ani 2 minutes gammat watli ki he je chote bal distey roj tumchya blogwar, te pratyakshat evedhe mothe aahe ani itke sundar gatey..Phar ch maja aali gane aiktana..Tyala continue karayla sanga ani majyakadun shubhechcha hi :)
    -Sayali

    ReplyDelete
  22. सायली स्वागत व आवर्जुन दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल आभार. अग असे कोणी उत्सुकतेने व आवडीने वाचतेय हे ऐकून खूप आनंद वाटतो. लिहायला प्रोत्साहन मिळते. शोमूला तुझ्या शुभेच्छा व कौतुक सांगते. पुन्हा एकदा आभार.असाच लोभ राहू दे.:)

    ReplyDelete
  23. शोमूला अजून गायला सांग....खूपच छान म्हणतोय तो!!! तूझा उल्लेख एकेरीच करतोय कारण ते नातं माझ्या बायकोने जोडलेय तेच माझंही, मला पण ताई नाही, म्हणून तुच माझी पण ताई. शोमूला सांग काकाचा निरोप आहे अजून गा!!! येव्हढा स्मार्ट गायक असेल तर ऐकायला आणि पहायलाही आवडेल....मुळात हे गाणं बायकोला उद्देशून म्हणत होतोच आज पुन्हा म्हणतो....Thanks Shomu.
    अमित

    ReplyDelete
  24. अमित तुझ्या मनापासून दिलेल्या प्रतिक्रिया मनापर्यंत पोहोचल्या.:) शोमूला तुझा निरोप देतेच व त्याच्या वतीने Thanks ही म्हणते. तन्वी व तू माझ्या घरातलेच आहात.

    ReplyDelete
  25. रोहनशी १०१% सहमत. आवाज तर खूप छान आणि सॉफ्ट आहेच शौमित्रचा पण दिसतो पण कसला छावा !! मस्तच !!

    ReplyDelete
  26. हेरंब,शोमूला सांगते.:) धन्यवाद.

    ReplyDelete
  27. खूप उशिरा देतेय ही कमेंट. पण खरच सांगते दादाचा आवाज खुपच छान आहे. एकदम best. आम्ही तरसतो अशा छान आवाजाला. त्याला म्हणव गात जा ना आणि तुम्ही ती गाणी येथे टाकत जा. ऐकायला आवडेल.

    ReplyDelete
  28. jivanika, खूप खूप धन्यवाद गं. शोमूला निरोप देते तुझा. :)

    ReplyDelete
  29. भाग्यश्रीजी, कदाचित आपणाला माहित नसेल, ही जीवनीका माझी मुलगी आहे.

    ReplyDelete
  30. रविंद्रजी,बरे झाले सांगितलेत. मला माहीतच नव्हते. :)

    ReplyDelete
  31. खूप छान आवाज आहे हो तुमच्या शोमुचा. अप्रतिम गायला आहे तो..

    ReplyDelete
  32. सुलभा, खूप खूप आभार. :)

    ReplyDelete
  33. Voice of SHOUMITRA is Absolutely Excellent enough to make him a playback singer.
    May GOD Always Bless him.

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !