क्षण एक हृदय माझे चकित धडधडले
उरला वेळ संवाद साधण्याचा
क्षण एक तुझे नि माझे नयन गुंतले
उरला वेळ रुसवे काढण्याचा
क्षण एक आठवण तुझी दाटोनी आली
उरला वेळ दाह चांदण्याचा
क्षण एक आकाशाला जखमी केले विजेने
उरला वेळ धरेने झेलण्याचा
क्षण एक जळोनी केले जीवनास पुलकित
उरला वेळ निरूद्देश्य भटकण्याचा
क्षण एक पळविले सीतेला रावणाने
उरला वेळ रामायण सांगण्याचा
क्षण एक द्यूत खेळले धर्मराजाने
उरला वेळ कुरुक्षेत्री लढण्याचा
क्षण एक भारतास स्वातंत्र्य मिळाले
उरला वेळ अंतर्गत कलह सोडवण्याचा
क्षण एक असे त्याची जादू अगाध
उरला वेळ जीवन जगण्याचा
अप्रतिम!!
ReplyDeleteश्री, तुझी कविता आता वरची पातळी गाठायला लागली आहे. अशीच लिहित रहा. लवकरात लवकर तुझा कविता संग्रह येऊ दे.
जियो.
अरुणदादा
uttam !!
ReplyDeleteअरुणदादा, माऊ प्रतिसादाबद्दल अनेक आभार.:)
ReplyDeleteचांगली आहे. परस्पर संबंध बरोबर दाखवला आहे. आकाशाला जखमी केले विजेने उरला वेळ धरेने झेलण्याचा.....फारच छान.
ReplyDeleteभारतास स्वातंत्र्य..... किती दूर्देव आहे आपले.
heera,आभार.:)
ReplyDelete