जाता जाता एक नजर इथेही........

Wednesday, November 25, 2009

घाव.....


२६/११, झालेला घाव आजही तितकाच खोल व ताजा आहे. कधीही न भरून येईल अशी झालेली अपरिमित हानी. १६६ जणांनी गमावलेले प्राण व यातनांचे लाखो-करोडो अप्रत्यक्ष बळी. रोजचेच असुरक्षित जीवन, तरीही पुन्हा ठाम उभे मुंबईकर. ढिसाळ सुरक्षा, गाफील शासन, तुंबड्या भरू राजकारणी व सामना करणारे निधड्या छातीचे वीर. सगळ्यावर प्रचंड उहापोह गेले वर्षभर झाला आहे व पुढेही होत राहील. निष्पत्ती शून्य. हा घाव ताजा म्हणावा तर आधीचेच अजून........ प्रत्येक हल्ल्यानंतर केलेल्या त्याच त्याच चर्चा, खटले व प्रयत्नांची आश्वासने. ऐकून मने विटलीत आता. क्रुरता व शूरता यांची परिसीमा. निरपराधांचे बळी व त्यांचे प्राण वाचवताना स्वप्राणांचे बलिदान करणारे बहाद्दर. आपल्या परीने जोतो झगडला व आजही झगडतो आहे. पण कुठवर....आणि कधीपर्यंत......???

या काळ्याकुट्ट दिवशी शहीद झालेल्या सगळ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

धगधगत्या समराच्या ज्वाला या देशाकाशी
जळावयास्तव संसारातुन उठोनिया जाशी !

मूकपणाने तमी लोपती संध्येच्या रेषा
मरणामध्ये विलीन होसी, ना भय ना आशा !
( गीत: कुसुमाग्रज अनाम वीरा )

17 comments:

 1. शहीद झालेल्या सगळ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, त्याचबरोबर त्यांच्या परिवाराने सोसलेली झळ, त्याबद्दल काही न करू शकण्याबद्दल माफी..
  यावर अजून काहीच बोलू शकत नाही

  ReplyDelete
 2. मीडियावाले सरकारी पाहुणे आदरणीय अफज़ल गुरु आणि माननीय कसाब यांच्यावर सरकारचा आणि अप्रत्यक्ष रित्या जनतेचा पैसा कसा खर्च होतोय त्यावर काही कार्यक्रम का नाही करत? त्याना फाशी (निदान ५/६ वेळा तरी ) द्यायला कोणते सरकारी मुद्दे आड़ येतायत... ते जनतेसमोर मांडावेत ... पोलिसांना अत्याधुनिक शास्त्र अजुनही मिळालेली नाहीत. या मागे जो कोण व्यक्ति जबाबदार आहे त्याला सरळ जाब विचारावेत. पुलिस फोर्स वैगरे जी काय आता या लोकानी सुधारलीय ती जाहिर करायला २६ तरिखेची वाट पाहत बसले होते की काय सरकारी मंडळी? मुंबई स्पिरिट वैगरे मी फक्त टीवी वर ऐकतो ... प्रत्यक्षात ती गोष्ट अस्तित्वात नाही.

  ReplyDelete
 3. "ईश्वर आणि सैनिक या दोघांचे आपल्याला संकटाच्या वेळीचं स्मरण होते. त्या संकटात मदत मिळाल्यानंतर ईश्वराचा विसर पडतो आणि सैनिकाची उपेक्षा होते."

  आता अजून काय बोलू ...

  शहीदों की चितायों पे ... लगेंगे हर बरस मेले ... !
  वतन पर मिटने वालों का ... बाकी यही निशां होगा ... !

  ReplyDelete
 4. या घावाने झालेल्या जखमा कधीच बऱ्या होऊ नयेत.. आणि नेहेमी स्मरणात रहाव्या... श्रध्दांजली .. त्या सगळ्या अनाम वीरांना...

  ReplyDelete
 5. evdhya lokani pran gamav le; kahi sainik shahid zale; pan ajun hi Kasab mokala cha aahe asha padhtine jar shiksha honar asel tar gunhe nakkich vadhat rahatil .......... -Ashwini

  ReplyDelete
 6. आश्विनी अग गोम इथेच तर आहे ना.. गुन्हे करणा~यांना कशाचेही बंधन नाही आणि त्यांना शिक्षा देतांना मात्र अगदी माणुसकी,दया....गोष्टीं कशा काय समोर येतात.आणि हाच मूर्ख सहिष्णूपणा हाताशी धरून कसाबला तयार करणारे अजून जोमाने घाव घालतात.

  ReplyDelete
 7. रोहन खरेच आहे रे. सैनिकांची उपेक्षा आणि त्यांच्या घरच्यांची वाताहात... दोन दिवस झालेला उदो उदो - तोही मी कसा व किती मदत करतोय असे म्हणत लोकांना दाखवायला मिडीयासमोर केलेली नाटके एकदा का संपली की कोण शिंदे/ओंबाळे...

  ReplyDelete
 8. महेंद्र सहमत आहे.
  एक वर्ष उलटलं पण कसाब आजही मजेत आहे.त्याचं जिवंत असणं हीच चैन तीही माझ्या आप्तांचे बळी घेऊन.यापरिस विवशता ती कुठली.....

  ReplyDelete
 9. 26-11 hi khup mothi jakhama aahe, ti lavkar bari honari nahiye, pan aapala sarkar itka murdaad aahe ki bass...laj vatate ya saglyachai. ji lok pranapanane deshasathi ladhli tyananchya jacket amdhye sudhaa bharshtrachar ? kai bolu yachyvar. khudda kavita karkare ni sudhaa yachyvar aarop kelaay. kadhihikadhi samjat nahi ki ya deshacha kai honar asach sagla chalu rahila tar...

  - ajay ( hataash ...)

  ( mrathit lihu shaklo nahi tyabaddal shamasva )

  ReplyDelete
 10. आनंद कितीही आपला जीव तडफडला तरीही आपण काहीही करू शकत नाही हे अपराधीपण अजूनच छळते आहे. या सगळ्यां कुटुंबियांनी पहिल्या दिवसापासून आज ३६५ दिवस आश्वासने/गायलेले गोडवे व विस्मरण( अजून बरेच काही )- त्यांच्या मनात काय येत असेल? कसाब-त्याचे कर्तेसवरते यांचा संताप की ज्याकरीता बळी गेलो त्या लोकांनीच केलेली अवहेलना.याचेच केलेले राजकारण..... एकातरी घोषणेवर अमंल होताना दिसलाय का?

  ReplyDelete
 11. हर्षल हल्ला झाल्यावर घरात बसून राहणे शक्यच नसल्याने दुस~या दिवशी पहाटे लोकल तुडुंब भरून वाहू लागते. पुन्हा कधीही काहीही घडेल हे माहीत असूनही...कदाचित याचेच नाव मुंबई स्पिरिट असावे. बाकी जाब कोणी कोणाला विचारायचे रे? जवानांकडून तुमच्या अपेक्षा प्रचंड, परंतु त्याने लढावे त्याच्या नखांनी...पोलीस फोर्स सुधारलेय???? अव्याहत चालणारे फार्स आहेत हे...गेल्या वर्षीचे या आठ दिवसातले पेपर- म्हणजे नुसता आम्ही यंव करू-त्यंव सुधारू चा गाजावाजा...पुढे काय झाले? सगळाच तमाशा आहे....

  ReplyDelete
 12. मला तर चीड येते ती करकरेंचं जाकीट, मोबाईल गहाळ झाल्याची

  कचर्‍यात फेकले असण्याची शक्यता मी वृत्तपत्रात वाचली, तुम्हाला काय वाटतं साधा तुमचा रुमाल जरी पडला असेल तर तो तुम्हाला, किंवा तुमच्या नातेवाईकांना विचारल्याशिवाय वॉर्डबॉय किंवा नर्स कचर्‍यात टाकतील का? मग हे तर पोलिसांचं जाकीट

  साळसकरांच्या बलिदानानंतरची त्यांच्या आईंची प्रतिक्रिया मला आठवते

  शहिदांना श्रद्धांजली

  ReplyDelete
 13. अजय खरेच या भयंकर हल्ल्यानंतर होत असलेल्या रोजच्या नवनवीन घटनांनी यात अजूनच भर पडतेय.चीड, लाज, हतबलता....खरं तर आता कशाचाच काहीही फरक पडत नाही अशी वेळ लवकरच येऊ घातली आहे. भगतसिंगाचे बोल आठवतात....पण आजचे राजकारणी त्याच्याही पुढे गेलेत...:(

  ReplyDelete
 14. चुरापाव,मला तर हे असे मोबाईल, जॆकेट गहाळ होणे केवळ अशक्यप्राय वाटते. हा...गहाळ केले गेलेय असे म्हणण्याची हिंमत नाही...मनाची लाज कधीच नव्हतीच..पण निदान जनाची तरी.....भ्रष्टाचार कशात करावा व किती करावा.....अजूनही सगळे यांच्या खरेदीबद्दल गोलगोलच बोलत आहेत.रोज रात्री झोप कशी लागते यांना...... का हे असे मूर्ख प्रश्न आपल्याला पडतात ही आपलीच चूक...

  ReplyDelete
 15. 26/11च्या घटनेतशहीद झालेल्या सगळ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली,त्यांचे कुटुंबीय सोसत असलेल्या यातना असह्य आहेत. ईश्वर त्यांना बळ देवो.

  ReplyDelete
 16. त्या सर्व वीरांना अन् हुतात्म्याना श्रध्दांजली . हर्षल शी सहमत.

  ReplyDelete
 17. रविंद्र, आशाताई शहिदांना श्रध्दांजली.

  ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !