नवीन वर्ष सुरू होऊन सात तारीख उजाडली तरीही माझ्या सगळ्या वाचकांना, मित्र-मैत्रिणींना, सगेसोयऱ्यांना शुभेच्छा देता आल्या नव्हत्या. फार चुटपूट लागून राहिली होती. गेले दहा-बारा दिवस भटकंती सुरू असल्याने जालावरचा वावर अगदीच नाममात्र होता. काल रात्री घरी परत आलो. नेहमीप्रमाणे गमतीजमती, फिरणे, फोटो अन मस्त खादडंती झालेली आहे. ट्रीपला जायचे या विचारानेच मी अतिशय खुशाळते त्यात या सहलीत लेकही बरोबर होता. दुधात साखर. फोटू-बिटू टाकतेच आता लगेहाथ. पण सगळ्यात प्रथम शुभेच्छा देते.
" प्रिय वाचकपरिवार, मित्र-मैत्रिणी व आप्तस्वकीय सगळ्यांना नववर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! हे नवीन वर्ष अनेक सुखदायी घटनांनी, मंगल प्रसंगांनी, प्रेम-जिव्हाळा-सलोख्याने, मैत्रीने युक्त असावे." खरे तर हे सगळे भाव आपल्या सगळ्यांच्या मनात नेहमीच असतात फक्त प्रत्येकवेळी ते बोलून दाखवले जात नाहीत. या निमित्ते ती संधी साधून घेत आहे. गेल्या वर्षात वैयक्तिक बोलायचे तर मला खूप मैत्रपरिवार मिळाला- प्रेम मिळाले. आवर्जून नेहमीच वाचणारे - संवाद साधणारे अनेक वाचक लाभले. वर्ष संपता संपता " नेटभेट मासिकात " काही लेख छापून आले. नेटभेट- सलिल व प्रणवचे खूप आभार व अभिनंदन. वर्ष सुरू होतानाच भुंगाने काढलेल्या " पोटोबा " या ई-बुकात पाककृती प्रसिद्ध झाल्या. भुंगाच्या या उपक्रमाबद्दल अभिनंदन व अनेक आभार. मी ट्रीपला गेलेली असल्याने माझ्याकडून वाचकांना ते कळवले गेले नसले तरीही अनेकांनी तत्परतेने ई-बुक आवडल्याचे कळवले. त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार. साईडबार मध्ये " ई-बुक - पोटोबाचा " दुवा टाकला आहे. आशा आहे पाककृती एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्याने सोय होईल. पाककृती लिहिताना बरेचदा मला वाटत असे की हे कोण वाचत असेल...... खाण्यावर प्रेम करणारे सगळेच असले तरीही. परंतु अनेक जणांनी पाककृती सहज-सोप्या असून उपयोगी असल्याचे लिहिले त्यामुळे बरे वाटले. उत्साह वाढला.
पोटोबा - १: चाळीस पाककृतीं साधं - सोपं पुस्तक!
डाऊनलोड करण्यासाठी समोरच्या पुस्तकावर क्लिक करा!
"पोटोबा"चं पहिलं "ई-बुक" भाग्यश्रीच्या मदतीशिवाय शक्य नव्हते.
चला तर मग - खादाडी सुरु करुया!
डाऊनलोड करण्यासाठी समोरच्या पुस्तकावर क्लिक करा!
"पोटोबा"चं पहिलं "ई-बुक" भाग्यश्रीच्या मदतीशिवाय शक्य नव्हते.
चला तर मग - खादाडी सुरु करुया!
( डाऊनलोड करण्यासाठी साईडबार मधील दुव्यावर कृपया टिचकी मारा. धन्यवाद. )
नवीन वर्षात मायदेशाची वारी लवकर घडावी म्हणजे बऱ्याच जणांना भेटता येईल, धमाल करता येईल. मैत्री आहे ती अजूनच वाढीस लागेल. नव वर्षाचे संकल्प अनेक जणांनी केले असतलीच, मनात काही आशा-आकांक्षा बाळगल्या असतील, काही ठाम निश्च्ययही केले असतील ते सारे संकल्प तडीस जातीलच याची खात्री आहे. लोभ आहेच तो वाढावा, स्नेह नेहमीच राहावा हीच इच्छा आहे.
आपली
भाग्यश्री
नविन वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा!
ReplyDeleteपोटोबा बद्दल खुप खुप धन्यवाद!
Chaan , aapan parat aala anand aahe :-), Mandal aple abhari ahe, tumhala hi navin varshachya shubhecha
ReplyDelete-Ajay
Anand :)
ReplyDeleteअजय मायदेशी आले की भेटूच रे. योग लवकर येईल असे वाटतेय.:)
ReplyDeleteHappy 2010!!!!!
ReplyDeletePotoba mast!
क्रान्ति Happy 2010!आता गेल्या दहा-बारा दिवसातल्या सगळ्या वाचायच्या राहून गेलेल्या पोस्ट वाचायला घेते.:)
ReplyDeleteनवीन वर्षाच्या खादाडी शुभेच्छा ... :D कुठे गेला होतात ???
ReplyDeleteआणि खादाडी बुक साठी खुप धन्यवाद ... (निषेध करून) हेहे ...
रोहन खादाडी येतेय अजून....हेहे. आणि का रे आम्हाला सारखा जळवत असतोस मायदेशात गेलास की त्याचे काय..... :)
ReplyDeleteअरे सॆन फ्रान्सिस्कोला गेलो होतो. धमाल आली.
तुलाही शुभेच्छा...ब्लॉगवर दिल्यात त्या वाचशीलच म्हणा..पण तरी :) आता तुझ्या पोस्टस वाचायला मिळतीलच म्हणा....आणि हो खादाडीचं पुस्तकतर छानच आहे..तुला विचारणार होते की माझ्या ब्लॉगवर नसणार्या मराठी संबंधीतांना पण मेलवर देईन म्हणते....:)
ReplyDeleteनविन वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा...
ReplyDeleteपहिल्या इपुस्तकासाठी शुभेच्छा ! रेसिपीवरुन पुन्हा अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी काही तरी सोय हवी होती. म्हणजे दुवा(Hyperlink).
ReplyDeleteछान आहेत. मी माझ्या सर्व मराठी मित्रांना इमेल केला आहे की इथून डाउनलोडकरा म्हणून.
भाग दोनही येउ देत !
अपर्णा हो ना आता सगळ्यांच्या ब्लॊगवर जाऊन गेल्या दहा-बारा दिवसातल्या पोस्ट वाचेनच.:)
ReplyDeleteतुझ्या मित्र-मैत्रिणींना "पोटोबा " कसे वाटले ते सांगशील. पुन्हा एकदा नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!
महेंद्र तुला व घरच्या सगळ्यांना नव वर्षाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!:)
ReplyDeleteसाधक अनेक आभार. मित्रांना पुस्तक आवडले का-उपयोगी पडते आहे का ते कळवशील?
ReplyDeleteमी दिपकला तुझी सुचना कळवते रे.नव वर्षाच्या अनेक शुभेच्छा!:)
मला तर पडणार आहे उपयोगी. पालक पकोडे व इतर गोष्टी पाहून आताच कसं तरी होतंय!
ReplyDeleteमित्रांना कसं वाटतंय हे मी त्यांना ब्लॉगवरच सांगायला सांगितलंय. वाह शेफ म्हणतो त्या प्रमाणे. It's all about cooking and inspiring others to cook !
नववर्षाच्या शुभेच्छा !
साधक अगदी तसेच होते बघ. दोन तीन नवीन गोष्टी ट्राय केल्यात. लवकरच टाकते ब्लॊगवर.:)आभार.
ReplyDeleteतुम्हालाही नवीन वर्षाच्या शुभेच्छा !!! खादाडी-बुक एकदम जबरी आहे.
ReplyDeleteहेरंब प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. ई-बुक आवडल्याचे पाहून आनंद वाटला.:)
ReplyDeleteनविन वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा!!!
ReplyDeleteखूप आतुरतेने वाट बघत होतो..
ReplyDeleteम्हणल अजून कस काही नाही लिहील आपल्या भाग्यश्री ताई ने...
असो.. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!
हे वर्ष आपल्याला सुख समृद्धीचे आणि भरभराटीचे जाओ..
गौरी तुम्हालाही नव वर्षाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!:)
ReplyDeleteमंदार अरे मलाही फार अस्वस्थ वाटत होते गेले काही दिवस जालावर नव्हते त्यामुळे. अनेक जणांच्या अनेक पोस्ट वाचायच्या आहेत. शिवाय शुभेच्छाही जरा उशीराच टाकल्या गेल्या... तुला व घरच्यांना नव वर्षाच्या अनेक शुभेच्छा!:)
ReplyDeleteचला.... परत आलात तर!
ReplyDeleteमायदेशीच्या वारीबद्दल बघा.... पोटोबाचे वाचल वाट पहाताहेत!
..नविन वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा...!!
भाग्यश्री ताई तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा !!! पुस्तक फार छान आहे !!! बायको ला देईन म्हणतो प्रिंट out काढून. तुम्ही कुठे फिरायला गेला आहात ? लवकर या भरपूर गोष्टी आणि प्रवास वर्णनघेऊन :)
ReplyDeleteनविन वर्षाच्या हार्दीक हार्दीक शुभेच्छा!
ReplyDeleteपोटोबा भरलाय आमचा गेल्या २-४ दिवसात जरा चविष्ट खाउन.....नवरोबा खुश आहेत भरल्या पोटाने तुला आणि भूंग्याला शुभेच्छा त्याच्याकडूनही......
भुंगा मी आतुरतेने मायदेशाच्या वारीची वाट पाहते आहे.:) आभार व शुभेच्छा!
ReplyDeleteहर्षल तुम्हा सगळ्यांना नव वर्षाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
ReplyDeleteतन्वी तुला व अमितला अनेक शुभेच्छा!:)
ReplyDeletehappy happy new year. khup khup subecha....tripbaddal tabdtob liha.......wat pahat aahe....
ReplyDeleteनविन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा, फोटो टाका लवकरात लवकर
ReplyDeleteप्राजक्त तुम्हा सगळ्य़ांना मन:पूर्वक शुभेच्छा!:)
ReplyDeleteअनिकेत तुम्हालाही शुभेच्छा! फोटो व थोडी गंमत-जंमत टाकते लवकरच.:)
ReplyDelete