जाता जाता एक नजर इथेही........

Friday, October 30, 2009

अपुन भी हायटेक.........


स्पर्धेचे जग आहे राजे हो. यात टिकाव धरायचा तर सबकुछ हायटेक मंगताय. गुणवत्ता हवीच- उसके बिना बिलकुल नही चलेगी धंदेकी गाडी. आकर्षक मांडणी-चकचकाट-नेटकेपणा हवा तोही डोळ्यात भरण्यासारखा. गुणवत्तेबद्दल लोकांना भरवसाही वाटायला हवा आणि दामपण खिशाला परवडला पाहिजे. हे तंत्र अगदी या धंद्यातसुद्धा घुसलेय म्हणजे खरेच कमाल झाली. आता हाच पाहा नं किती धोरणी. पुण्यातील हिंजे्वाडी- आयटी एरिया. जसा एरिया हायटेक तसाच याचा गोळाही हायटेक बनवलाय याने. नाव तर एकदमच भारी..... ' गो ग्रीनच्या ' हातात हात मिळवून म्हणतोय पाहा ' गो गोला '.

आवर्जून लिहिलेय नैसर्गिक रंग, मिनरल वॉटरचा बर्फ व हायजेनिक हँडलिंग. म्हणजे ' नको बाई, कसले रंग असतील, कुठल्या पाण्याचा बर्फ आणि शी... नाकातोंडात बोटे घालून त्याच बोटाने........... " हे असे म्हणून नाक मुरडून न फिरकणाऱ्या लोकांनाही मोह पडावा. पहिलीच ओळ आहे, ” जगातला स्वच्छ गोळा ’. आहे की नाही पर्फेक्ट मार्केटिंग,. ते ' Go gola ' असे लिहिलेय की पटकन गुगलबाबाचीच आठवण यावी. तेच पेज घेतलेय. तुमच्या डोळ्यांना सवयीचे. खाली उजव्या कोपऱ्यात म्हणतोय ’ Yummy Search ’ गिऱ्हाईक खेचणार हा नक्की. इसको बोलते हैं धंदेका कसब. इंटरनेटचे जग आहे हे बरोबर ओळखलेय त्याने. कोणी न कोणी आपला स्टॊलसकट फोटो खेचणार आणि मग बस दुनियाभर घुमते रह जाओगे. नकळत मीही केलीच ना त्याची जाहिरात.... " क्या साब आपुनभी हायटेक है और पर्यावरण की मदद मनसे कर रहा हूं. सबसे अहम बात, आपका यांदो में बसा बचपन सेहत का खयाल रखते हुये आपको कुछ पल लौटा रहां हूं....... गो गोला. "

14 comments:

  1. प्राजक्त...आहे ना सही:)

    ReplyDelete
  2. माते कुठे शोधलेस तू हे!!!!सही आहे एकदम....्माझं पिल्लू तारे जमीं पर पाहून म्हणतच होत की गोळा खायचाय आता नेते त्याला GoGola मधे!!!!!!!!!!!!!!

    ReplyDelete
  3. तन्वी,आहे ना भारी.चला त्या निमित्ते तुझ्या पिल्लाबरोबर लगे हाथ तूही घे खाऊन:)

    ReplyDelete
  4. बर्फाचा गोळा जाहिरातीत पाहून, लेकाला पण हा आनंद द्यावा हा विचार करीत होतेच. बरे झाले पत्ता मिळाला. उत्तम निरीक्षणाचे दृष्टीकोन अनुभवण्यास दिलेस. असाच लोभ वाढावा.

    ReplyDelete
  5. अनुक्षरे स्वागत व आभार.लेक खूश होईल:)

    ReplyDelete
  6. सही है भीडु...मान गये...लाजवाब पोस्ट...

    ReplyDelete
  7. हाय टेक पुण्यातील हाय टेक गोला. ह्या माणसाला मानायला हवे. हा खरोखर जगाच्या सोबत चालला आहे.

    ReplyDelete
  8. नक्कीच,आभार रविंद्र.

    ReplyDelete
  9. are mala kase nahi disale he go-gola roh Hinjwadi madhe yevun :) -Ashwini

    ReplyDelete
  10. आश्विनी गडबडीत तुझे लक्ष गेले नसेल कदाचित...शोधून काढ आणि मला सांग ग...:)

    ReplyDelete
  11. :D :D sahi aahe kaay doke chaalvly

    ReplyDelete
  12. नक्कीच...आभार Deep.

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !