जाता जाता एक नजर इथेही........

Sunday, July 26, 2009

बारात रखनी हैं की लौटानी हैं

" बारात रखनी हैं की लौटानी हैं " ह्या वाक्याचा अर्थ बहुतेक सगळ्यांनाच माहीत आहेच. बिहार-उत्तरप्रदेश व आणिकही काही प्रदेशातले हे हृदय शतशः विदीर्ण करणारे सत्य. मुलगी होणे ..... हा गुन्हा आहेच त्यावर तिला प्रचंड हुंडा द्यावा लागणार.... तेव्हा तिला मारूनच टाका. हे असे इतके क्रूर कोणी वागू शकते का? स्वतःच्या नवजात पोरीच्या गळ्याला नख लावणे ही नीचपणाची परिसीमा आहे, हे खरे असूच शकत नाही. असा विचार आपण केला तरीही ते असत्यात बदलणार नाही.

जेव्हा बारात लौटानी आहे असे उत्तर मिळते तेव्हा नवजात बाळीला दुधाच्या घंघाळात बुडवून मारले जाते. ही इतकी क्रूर, नीच, तामसी कृती राजस गुणात गणले जाणाऱ्या दुधाचा आधार घेऊन पार पाडली जाते. का? दुध हे पारदर्शक नसते म्हणून.....?? तिच्या जीवनाचा अंत करणाऱ्यांना तिची धडपड पाहायची नसते म्हणून......??

आज पुन्हा एकदा या कायमच्या भळभळत्या जखमेवरची खपली निघालीय. थांबते इथेच.

5 comments:

 1. भळभळत्या जखमेवर खपली धरत नसते.

  अर्थात लहान मुलीची ती स्त्रीलिंगी असल्याच्या कारणावरून हत्या करणे ही कल्पनेपलिकडची गोष्ट आहे, हे अगदी खरं आहे. त्याबाबत तुम्ही आज का लिहिले? एखादी भयानक बातमी वाचण्यात आलेली दिसतेय.

  ReplyDelete
 2. डोळ्यात पाणी आले वाचुन, क्रुरपणाची सीमा झाली.

  ReplyDelete
 3. bhagyashree...agdi khare lihile aaahes tu..mi sudhha aikale ahe hya sandharbaat...

  ReplyDelete
 4. सोनाली, माऊ...आशा करूयात कधीतरी ही परिस्थिती बदलेल. आभार.

  ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !