जिन्नस
- ४०० ग्रॅम सुरण.
- दोन मध्यम कांदे- एक बारीक चिरून व एक उभा पातळ चिरून.
- दोन टेस्पून ओले खोबरे, दोन टेस्पून कोरडे खोबरे.
- तीन हिरव्या मिरच्या, पेरभर आले, मूठभर कोथिंबीर, पाच/सहा लसूण पाकळ्या.
- तीन टेस्पून तेल, एक टेस्पून तूप, एक टिस्पून गरम मसाला. दोन चमचे तिखट.
- खडा मसाला- चारपाच मिरे, लवंगा, बोटभर दालचिनी, चार तमालपत्रे, एक मसाला वेलची, एक चमचा शहाजिरे, अर्धे चक्रीफूल
- चवीपुरते मीठ व पाऊण चमचा साखर
मार्गदर्शन
सुरणाची पाठ काढून मध्यम आकाराचे तुकडे करून घ्यावेत. कढईत तेल टाकावे. पुरेसे तापले की त्यावर खडा मसाला दोन मिनिटे परतावा. मसाला परतला गेला की त्याचा सुवास सुटतो. लागलीच त्यावर बारीक चिरलेला कांदा टाकून परतावे. आच मध्यम ठेवावी. दुसऱ्या गॅसवर पॅनमध्ये उभा चिरलेला कांदा दोन थेंब तेलावर चांगला लालसर( गडद लालसर ) परतून काढून घ्यावा, त्याच पॅनवर ओले खोबरे व कोरडे खोबरेही वेगवेगळे परतून घ्यावे. कढईत टाकलेला कांदा व खडा मसाला यावर सुरण टाकून परतावे. दोन भांडी पाणी टाकून झाकण ठेवावे.
आले, मिरची, कोथिंबीर, लसूण व हा भाजलेला कांदा व खोबरे हे सगळे एकत्र गंधासारखे वाटून घ्यावे. साधारण दहा मिनिटे झाली की झाकण काढून हे वाटण सुरणाला लावावे व तिखट हवे असल्यास वरून दोन चमचे लाल तिखट घालावे. तसेच एक भांडे पाणी घालावे. दहा मिनिटे झाकण ठेवून शिजू द्यावे. मग त्यात चवीनुसार मीठ, साखर, गरम मसाला व तूप घालून सगळे मिश्रण एकजीव करावे व आवश्यकता वाटल्यास पुन्हा अर्धे भांडे पाणी घालून झाकण ठेवून पुन्हा पाच मिनिटे शिजू द्यावे. सुरण मोडून पाहावे. शिजले आहे असे वाटले की गॅस बंद करावा. सुरणाचा गाळ होऊ देऊ नये. रस्सा दाट नको पण फुळ्ळूक पाणीही नको असा ठेवावा.
हा गरम गरम रस्सा भाकरी, पाव अथवा फुलके व भाताबरोबर सुंदर लागतो.

सुरण शिजणार नाही असे वाटल्यास कुकरमध्ये एक शिटी करून काढावे किंवा मायक्रोव्हेव मध्ये झाकण ठेवून चार मिनिटे ठेवावे. असे केल्यास हा रस्सा अजूनच झटपट होतो. जे मटण-चिकन खात नाहीत मात्र त्याचा रस्सा आवडतो अशांसाठी हा सुरणाचा रस्सा खासच ..... .
Chaan aahe recipe. Suaranchi bhaji jast keli jaat nahi. pan asa masala asel tar mastach
ReplyDeleteChakali
वैदेही, अगं तुझी पावती मिळाली....बरे वाटले.:)
ReplyDeleteरोहन....वैतागू नकोस रे.:D
karun baghen ya paddhatine!! :)
ReplyDelete-mugdha
mugdhajoshi.wordpress.com
मुग्धा,केलास आणि आवडला तर कळव गं. आभार.
ReplyDelete