
थंडीची चाहूल लागली की शेंगोळ्यांची हमखास आठवण येऊ लागते. नुसत्या आठवणीनेही तोंडाला पाणी सुटते. करायलाही अतिशय सोपे व पटकन होणारे. थोडे तिखटच करायचे व वरून साजूक तूप घालून गरम गरम मटकवायचे. अहाहा!!!
वाढणी : तीन माणसांना एका वेळेस पुरावेत.
साहित्य :
तीन वाट्या कुळथाचे पीठ
पाव वाटी गव्हाचे पीठ
पाव वाटी दाण्याचे कूट
पंधरा ते वीस पाकळ्या लसूण वाटून
तिखट दोन चमचे ( सोसत असेल तर थोडे अजून घालावे )
हळद व हिंग अर्धा चमचा
चार वाट्या पाणी
नेहमीची फोडणी
चार चमचे तेल
स्वादानुसार मीठ
दोन चमचे तूप ( ऐच्छिक )
दोन चमचे कोथिंबीर
कृती :
परातीत कुळीथ व गव्हाचे पीठ, वाटलेला लसूण, एक चमचा तेल, हळद, हिंग, तिखट व स्वादानुसार मीठ व अगदी थोडेसेच पाणी घालून घट्ट मळून घ्यावे. नंतर हाताला तेल लावून मळलेल्या गोळ्यातून छोटासा गोळा घेऊन साधारण बोटाएवढ्या लांबीचे शेंगोळे वळावेत.
एक खोलगट पातेले किंवा कढई मध्यम आचेवर ठेवून तापली की तेल घालावे. तेल व्यवस्थित तापल्यावर नेहमीची मोहरी, हिंग, हळद व चमचाभर तिखट घालून फोडणी करावी. तित दोन चमचे कुळथाचे पीठ घालून तीन चार मिनिटे भाजावे. थोडा खमंग वास सुटला की दाण्याचे कूट घालून परतावे. दोन-तीन मिनिटाने त्यावर पाणी ओतावे व पाण्याच्या अंदाजाने मीठ घालून एक उकळी आणावी. उकळी फुटू लागली की वळून ठेवलेले शेंगोळे हलक्या हाताने पाण्यात सोडावेत. साधारण दहा ते बारा मिनिटात जठराग्नी खवळवणारा वास घरभर दरवळू लागेल. शेंगोळ्याचा छोटासा तुकडा खाऊन पाहावा. सहजी तुकडा तुटायला हवा. थोडेसे कच्चट वाटल्यास अजून पाच मिनिटे शिजू द्यावे. त्याचवेळी दोन चमचे तूप घालून ढवळून झाकण ठेवावे. आचेवरून काढून कोथिंबीर घालून गरम गरम वाढावे.
टीपा :
कुळथाचे पीठ विकत आणल्यास बरेचदा कचकच येतेच. अशा पिठाचे बनवलेले शेंगोळे खाववत नाहीत. रसभंग होतो. म्हणून शक्यतो पीठ दळून आणावे.
तिखटाचे प्रमाण जरासे जास्तच छान लागते. शेंगोळ्यात मीठ घातलेले आहे हे विसरू नये व त्या अंदाजाने पाण्यात मीठ घालावे.
तूप जरूर घालावे. स्वाद व वास अप्रतिम.
शेंगोळे ओलसरच असावेत. थोडासा रस्सा असतो ना तसे. मात्र शेंगोळ्यात आमटीसारखे पाणी नसावे.
’मोगरा फुलला ’ दिवाळी अंकात आहेच. खाऊगल्लीतही असावे म्हणून....
व्वा व्वा! अगदी मटण कबाबच वाटतायत! :p
ReplyDeleteहा हा... आलीस का तू सामिषावर... :D
ReplyDeleteधन्सं. :)
फोटो बघून अगदी तोंडाला पाणी सुटलं.
ReplyDeleteमाझ्या सासरी म्हणजे सोलापूरला शिंगोळ्या करतात. पण मुख्य ज्वारीच्या पिठाच्या. बरीचशी रेसिपी तुम्ही दिली तशीच पण दाण्याचा कूट नाही आणि आकार कडबोळ्यासारखा. फार चविष्ट लागतो.
मनस्विता तुझे स्वागत आहे व अभिप्रायाबदल धन्यू.
ReplyDeleteअगं, मी ज्वारीच्या पिठाचे शेंगोळे माझ्या काकूच्या माहेरी खाल्लेत. तेही मस्तच लागतात. आणि जशी भाषा बदलते तशी थोडी थोडी करण्याची पध्दतही. सारेच चविष्ट. आपली त्यामुळे चैन. :)
च्यामारी तू तर लगेच फर्माईशी पुऱ्यापण करायला घेतलीस?? तुला माहिते न ही रेसिपी माझ्या सासरी हिट आहे पण मला इसके बारे मै कुछ पताच नही ते....मग कधी येतेस प्रात्यक्षिक करायला??
ReplyDeleteकरना पडता हैं... :) प्रत्यक्ष नाही तरी तुझ्या या दिवसांमध्ये जालावरुन तरी...
ReplyDeleteबाकी प्रत्यक्ष कधी भेटीचा योग आहे कोण जाणे... कदाचित लवकरच येईलही. धन्यू गं. सांभाळून मिटक्या मार हो... :P
शेंगोळे?? हे ऐकलं नव्हतं कधी.. पण कसलं भारी दिसतंय ग !!
ReplyDeleteयापुढे तू खादाडी पोस्ट टाकलीस ना की सरळ एक पार्सलची व्यवस्थाही करत जा ;) (डोळा मारणारा स्मायली टाकला असला तरी आप्पून सिरीयस है)
रायगड जिल्हयात सहसा हा पदार्थ कुणालाच माहित नाही.पण पुणॆ जिल्ह्यातल्या ब-याच भागात हा पदार्थ करतात.आमच्याकडे दोन्ही हातात पिठाचा गोळा घेउन हात एकावर एक घासतात त्यामुळे खाली ४ते५ एमएम व्यासाची शेन्गोळि येतात.न तोडता त्याची एकावर एक अशा ७ते८ वेटोळी घालतात साधारण लम्बगोल आकारात.बाकी साहित्य सारखेच.
ReplyDeleteजो हुकुम आका... :D( btw, आका सध्या गायबच आहे का रे?? )
ReplyDeleteच्यँव च्यँव च्यँव च्यँव कट कट कट कट... नुसतीच खाण्याची ऍक्शन... ह्हुह...
ReplyDeleteपाककृतीच्या पोस्टच्या कमेंटमधे जर मी घरचा पत्ता नमूद केला तर पार्सल घरपोच पाठवलं जाईल का??
jalandar, माझ्या घरी आपले स्वागत आहे. :)
ReplyDeleteमहाराष्ट्रात जास्ती करून देशावर केला जाणारा पदार्थ. थंडीत खासच लागतो.
आभार आहेतच व पुन्हा भेटीचा योगही लवकर येवो.
सौरभ, अरे पार्सल कशाला... माझ्या घरापासून दोन तासाच्या परिघात् असशील तर जेवणाचे आमंत्रण कायमचेच. कधीही टपकू शकतोस.:)
ReplyDeleteधन्यवाद रे.
:) thank you for the warm invitation...
ReplyDeleteआमच्यकडे थोड्या वेगळ्या पद्धतींचे होतात, जिन्नसही बहुदा वेगळा असेल पण चवीबद्दलची गॅरंटी सेम टू सेम... फार आठवण झाली...
ReplyDeleteयापुढे तू खादाडी पोस्ट टाकलीस ना की सरळ एक पार्सलची व्यवस्थाही करत जा ;) (डोळा मारणारा स्मायली टाकला असला तरी आप्पून सिरीयस है) + इन्फिनीटी ;)
yammmmmm भरल्या पोटी भुक कडाडली...आधीच दोन दिवस झाले इकडे जाम थंडी पडायला लागलीआहे. त्यामुळे संध्याकाळाच्यावेळेस काहीतरी गरम आणि खमंग खावेसे वाटतेय...आता उद्याची संध्याकाळ कधी एकदा येतेय असं ालंय.
ReplyDeleteमी बहुतेक कधीच खाल्लेले नाहीत...आता सुट्टीत आईला करायला सांगेन! :D
ReplyDeleteधन्स गं ताई!!
आप धन्यवाद. काश ये संभव होता... :)
ReplyDeleteशिनू, माझी आठवण काढून खा गं. :) धन्यू.
ReplyDeleteविद्याधर, आईला नक्कीच माहीत असतील. आवडले का ते कळव बरं का.
ReplyDeleteधन्यवाद.
हं..... डोळ्याला त्रास आणि पोटाला उपवास.... णीषेढ
ReplyDeleteतुझ्या ब्लॉग ला लाखाच्या वर व्हिजिटर्स झालेत.. अभिनंदन..
ReplyDeleteणिशेधाचा स्विकार आहे. :) पुढच्या वेळी आपण जमून धमाल करू रे.
ReplyDeleteधन्यवाद.
कुळथाचे पिठले माहीत होते शेंगोळे प्रथमच वाचले. जरुर करुन पाहीन.पाककृती बदद्ल धन्यवाद. आपले इतर लिखाणही फार छान आहे.
ReplyDeleteनंदा.
नंदा ब्लॊगवर आपले स्वागत व आभार.
ReplyDeleteजरूर करून पाहा. नक्कीच आवडतील. पुन्हा भेटूच. :)
तिथे कुठून मिळाल्या??? तू पण धन्य आहेस... आणि काल ते फोटो दाखवलेस त्यावरची पोस्ट कुठाय??? तुझेपण लिखाण कमी होत चाललंय... :(
ReplyDeleteउन्धीयोचे दिवस आले न .....
ReplyDeleteरोहन, हे मी नाशिकला असताना केलेले. :) आणि कुळथाचे पीठ तर मी घेऊन येतेच ना.
ReplyDeleteहा हा... कालच्या फोटूची पोस्ट ना... टाकते टाकते.
उंधियोचे दिवस आलेत आणि चक्क यावेळी मुंबईतही गारवा जाणवतोयं. चैन आहे बुवा तुमची... :) आता तुम्हीच करा आणि मला डबा भरून धा्डा.
ReplyDeleteधन्यवाद Rajiv. आठवणीने लिहीलेत खूप आनंद वाटला.
माझी बायो अगं ही पोस्ट कशी गं सुटली माझ्या नजरेतून.... अगं सगळ्यात आवडता पदार्थ कोणता याचेही उत्तर मी शेंगोळे असे देइन गं :) .... या पोस्टवर मी जन्मात निषेधायचे नाही गं बयो!!
ReplyDeleteशेंगोळ्याचे पीठ कसे तयार करतात
ReplyDelete