जाता जाता एक नजर इथेही........

Friday, July 17, 2009

फ्लॉवर-बटाट्याचा हिरवा रस्सा.



जिन्नस

  • पाव किलो फ्लॉवरचे छोटे तुरे, आठ-दहा छोटे बटाटे व एक वाटी ओला मटार.
  • एक कांदा बारीक चिरून.
  • चार चमचे ओले खोबरे, एक चमचा जिरे व पाव चमचा गरम मसाला.
  • सहा/सात हिरव्या मिरच्या, एक पेर आले, मूठभर कोथिंबीर व चार लसूण पाकळ्या.
  • चार चमचे तेल. अर्धा/पाऊण चमचा साखर व चवीनुसार मिठ.

मार्गदर्शन

पातेल्यात तेल घालून नेहमीसारखी मोहरी, हिंग, हळद व धणेजिरे पूड घालून फोडणी करावी. त्यावर कांदा घालून मध्यम आचेवर चार मिनिटे परतावे. त्यावर फ्लॉवर, बटाटे व मटार घालून चांगले परतून दोन वाट्या पाणी घालून झाकण ठेवून दहा मिनिटे शिजू द्यावे. ते शिजत असताना ओले खोबरे, मिरच्या, आले, लसूण, जिरे, गरम मसाला व कोथिंबीर याचा मसाला वाटून घ्यावा. शक्य तितका गंधासारखे वाटून घ्यावे. भाजी शिजत आली असे वाटताच हा वाटलेला मसाला, मीठ व अर्धा/पाऊण चमचा साखर घालून ढवळावे. अजून एक वाटी पाणी घालून झाकण ठेवावे. साधारण दहा मिनिटाने भाजी तयार होईल. गरम फुलके किंवा पावाबरोबर हा हिरवा रस्सा अप्रतिम लागतो.

टीपा

किंचित आंबटपणा हवा असल्यास वाढताना थोडेसे लिंबू पिळावे.

5 comments:

  1. Ek number..masta..tondala solid pani sutlai..

    Puri barobar pan changla lagel..

    ReplyDelete
  2. मला घरी जायला अजून ३ विक्स आहेत हो ... नका असे पोस्ट करू आणि वर फोटो लावू ... :D
    आज बनवली होती का घरी ??? मला भूक लागली आता .. झोपायला जायच्या आधी खाउन झोपतो :D

    ReplyDelete
  3. इंग्रजीचे मराठीवर मराठी लोकांनीच अतिक्रमण होऊ देण्याआधी 'फ्लॉवर' ला मराठीत काय शब्द होता? इंदूरकडे 'फूलगोबी' शब्द आहे. तो नागपूरच्या लोकांना कळतो. पण पुण्याच्या लोकांचा 'फूलकोबी' शब्दापुढे गोंधळ उडतो. तुम्ही मुंबईच्या. तर तुमचा अनुभव काय?

    ReplyDelete
  4. Dr.Zen, Welcome and Thanks...:)Nakkich puri ani aapla bekaritala taja garam Paav tyachyabarobari sunder lagato.
    Rohan, ha ha ha.... javal astaas ter laglich ye mhantale asate. :)

    Anonymous, mala ase vatate ki mulatach Flower kinva Kobi hya donhi marathi shabda nahit. Fulgobi ha hindi shabda aahe tyamule ..... Mumbai hi sagalyanchich aslyane fulkobi ha shabda vaparat nahich.:)
    Pratikriyebaddal Aabhar.

    ReplyDelete
  5. You could argue that words like 'photo' and 'flower-bhaaji' have been absorbed in Marathi by now. But both words have a very un-Marathi feel to them. And in the case of 'flower', the alternative of 'phool-kobi' is a very acceptable alternative. I don't know why you say that 'kobi' is not Marathi. Across the entire state of Maharashtra, everybody understands that paan-kobi is a Marathi word which means cabbage.

    - A

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !