जिन्नस
- चणा डाळ पाऊण वाटी
- मूग डाल अर्धी वाटी, मसूर, तूर व उडीद डाळ प्रत्यकी पाव वाटी
- एक मोठा कांदा, चार-पाच लसूण पाकळ्या, चार-पाच हिरव्या मिरच्या, एक पेर आले, मूठभर कोथिंबीर, पाच-सहा कडीपत्ता पाने
- दहा-बारा मिरीचे तुकडे, दोन चमचे धणेजिरे पूड, एक चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, चवीपुरते मीठ
- तळण्यासाठी तेल
मार्गदर्शन
सगळ्या डाळी धुऊन सहा ते सात तास भिजत घालाव्यात. चांगल्या भिजल्या की कमीतकमी पाणी घालून किंचित जाडसर वाटावे. वाटतानाच त्यात लसूण, मिरची, आलेही वाटावे म्हणजे सगळे चांगले एकजीव होईल. चमच्याने हे वाटलेले मिश्रण साधारण दहा मिनिटे एकाच दिशेने फेटावे. मग त्यात कडीपत्त्याचे तुकडे, चिरलेली कोथिंबीर, मीठ, धणेजिरे पूड, मिरीचे तुकडे, गरम मसाला पूड व लाल तिखट घालून हलक्या हाताने एकत्र करावे. वडे करायला घेताना उभा पातळ चिरलेला कांदा घालून लागलीच प्लॅस्टिक पेपरवर थापून वडे तळावेत. मध्यम आचेवर लालसर रंग येताच काढावेत. सॉस, पुदीना चटणी बरोबर गरम गरम डाळवडे सर्व्ह करावेत.
टीपा
Chan recipe aahe bhanas. Ani kanda ghalaychi tip pan agadi barobar.
ReplyDeleteChakali
वैदेही,धन्यवाद.
ReplyDelete