जिन्नस
- पाच सहा मध्यम कारली
- एक मध्यम कांदा बारीक चिरून
- चार टेस्पून कोरडे खोबरे भाजून पूड करून , दोन टेस्पून तीळ भाजून कुटून
- अर्धी वाटी बेसन भाजून (किंचितसे तेल टाकून भाजल्यास जास्त खमंग भाजले जाईल)
- दोन चमचे धणेजिरे पूड, दोन चमचे लाल तिखट, चवीपुरते मीठ, दीड चमचा साखर,
- मूठभर कोथिंबीर चिरून, अर्ध्या लिंबाचा रस
- शॅलो फ्राय करण्याकरीता तेल.
मार्गदर्शन
कारल्याची डेखं काढून मधोमध चीर देउन आतील बिया काढून टाकाव्यात तसेच वरचे आवरण कोवळे नसल्यास थोडेसे तेही तासावे. नंतर मीठ लावून त्यावर वजन ठेवून वीस मिनिटे ठेवावे. म्हणजे कडू पाणी निघून जाईल. एकीकडे कांदा, खोबरे, तिळकूट, भाजलेले बेसन, धणेजिरे पूड, लाल तिखट, मीठ, साखर, कोथिंबीर व लिंबू हे सगळे चांगले कालवून मसाला तयार करावा. तो कारल्यांमध्ये भरून पुडीचा किंवा बारीक दोरा त्याभोवती गुंडाळावा म्हणजे मसाला बाहेर येणार नाही. मध्यम आचेवर तेलावर खरपूस शॅलोफ्राय करावीत. वाढताना गुंडाळलेला दोरा सोडवून वाढावीत.
टीपा
कडूपणा बराच कमी करायचा असेल तर मिठाच्या पाण्यात थोडीशी वाफवून घ्यावीत. साखरेएवजी गूळ घातला तरीही चालते.
माझ्या स्मरणानुसार कमलाबाई ओगले 'मार्गदर्शन' ऐवजी कृती हा शब्द वापरतात. आणि तो शब्द सोपा आहे, प्रचलित आहे, आणि जास्त अर्थवाही पण आहे.
ReplyDeleteMargdarshan ha 'Manogat' cha shabda aahe. Kruti -Margadarshan......... kase karave samajlyashi karan.
ReplyDeleteAabhar.