जाता जाता एक नजर इथेही........

Tuesday, July 14, 2009

समर ट्रीट
समर आता जाणवायला लागलाय. वर्षाचे सात महिने थंडीची सवय झाल्याने तापमान ७०च्या आसपास घोटाळू लागले की या रसदार मधुर फळांची आठवण येऊ लागते. आपल्या सारखे हापूस आंब्याचे सुख नसले तरी मेस्किकन आंबे खाऊन संपायच्या आतच ही सारी सुंदर बहुतांशी सायट्रीक फळे नजरेला खुणावतात व तहानेला शमवतात.

3 comments:

 1. काय हो .. आत्ता जस्ट खाउन आलो मी स्त्रोबेरी आणि कलिंगड ... ;) आणि येउन बघतो तर तुमचा हा ब्लॉगपोस्ट .. हा.. हा.. ते मेक्सिकन आंबे खाउन मी सुद्धा कंटाळलो होतो म्हणुन तर जून महिन्यात जमेल तितके आंबे हाणून आलो आहे ... :D

  ReplyDelete
 2. हेहे... , अरे कालच कैरी मिळाली. आणून लोणचे व पन्हे केले लागलीच.आमच्या इथल्या इंडियन स्टोअर्समध्ये क्वचितच दिसते.रोहन, आभार.

  ReplyDelete
 3. आंबे नाही म्हणजे कठिणंच.. माझं वजन दर वर्षी कमित कर्मी ५ किलो तरी वाढतं उन्हाळ्यात. आंबे म्हणजे अगदी जिव्हाळ्याचा विषय. अगदी कुटेही गेलो तरी तिथले आंबे हे आणतोच. मग रायपुरचे देशी आंबे, हे केसर - हापुसच्या तोडीस तॊड असतात.
  बाकी पोस्ट एकदम रसाळ झालंय... :)

  ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !