शब्दांच्या वेशीवर मौन थांबले
नियतीचा चकवा प्राणांत गलबले
बेचैन जीव प्रवास घाबरा
कोण दिशेस वर्तमानास आसरा
मोहभूलीचा सर्वत्र संचार मुक्त
जाणीवांनो व्हा यातून रिक्त
पायांना भोवरा चालतो दशदिशा
शोधत डोळ्यातील हळव्या भाषा
काळजात तेवती व्रण व्याकुळते
कातरवेळी बेघर प्राण घरांचे
भाग्यश्री,
ReplyDeleteअप्रतिम कविता. ’कातरवेळी बेघर प्राण घरांचे’ या शेवटच्या ओळीने कांही क्षण माझाही प्राण कातर झाला. पण तो अर्थ जसा काळजात घुसला त्याक्षणी दादा निघून गेली, ’वाह! क्या बात है!’
जियो!
Arundada, anek aabhar. Tula kavita aawadali.....bar vatal. :)
ReplyDelete