जाता जाता एक नजर इथेही........

Wednesday, July 29, 2009

कुल्फी - मिक्स नटस/ बदाम/पिस्ता


जिन्नस
 • होल मिल्क एक लिटर/ हाफ अँड हाफ मिल्क ( फॅट फ्री-४७३ मीली )
 • स्वीटंड कंडेन्स मील्क ( फॅट फ्री ८ ओंस-२२५ ग्रॅम )
 • दोन टेबल स्पून लोफॅट/फॅट फ्री रिकोटा चीज ( खवा )
 • दोन चमचे साखर.
 • मिक्स किंवा एक कुठलेही-बदाम/काजू/पिस्ते..... पाऊण वाटी.
 • दोन टेस्पून थंड दूध व एक टेस्पून कॉर्न स्टार्च.
 • एक चमचा वेलची पूड व चिमूटभर केशर.

मार्गदर्शन

होल मिल्क घेतल्यास साधारण अर्धे होईतो आटवावे. हाफ अँड हाफ घेतल्यास चांगले गरम झाले की त्यात साखर व कंडेन्स मिल्क घालावे. सारखे ढवळत राहावे. ( दूध पटकन लागते तेव्हा जपावे. ) साधारण दहा मिनिटांनी रिकोटा चीज घालून सगळे चांगले एकजीव करावे. दहा मिनिटाने कॉर्न स्टार्च घातलेले दूध घालून पुन्हा नीट एकजीव करावे. दोन-तीन मिनिटातच दूध थोडेसे घट्ट होऊ लागल्यासारखे वाटेल. लागलीच त्यात बदाम ( नटस पूड ) वेलची पावडर व केशर घालून ढवळावे. पाच मिनिटांनी ऍल्यूमिनियमाच्या कुल्फी पॉटस मध्ये किंवा भांड्यात काढून कोमट झाले की आठ तास फ्रीजर मध्ये सेट करावे.

टीपा

संपूर्ण फॅट फ्री करता येते शिवाय मनसोक्त खाता येते. जर सांगितले नाही तर फॅट फ्री आहे हे कळतही नाही.

माहितीचा स्रोत

चकली.ब्लॉगस्पॉट.कॊम वरील बदाम कुल्फीचा आधार घेऊन संपूर्ण फॅट फ्री करण्याचा प्रयत्न केला आहे.

8 comments:

 1. ताई ... दया करा ज़रा ... :D काय ब्लॉगपोस्ट टाकताय परवा पासून ..

  पामरावर दया करा की ज़रा... असे मस्त मस्त पदार्थ पाहून आमचे काय होते ते कळत असेलचं तुम्हाला ..

  ReplyDelete
 2. रोहन.....हेहे. बरं बरं, आता नाही टाकत.:D
  तेरा-चौदा दिवसांच्या कॆलिफोर्निया सहलीवरून आजच आलेय परत. खूप मजा आली.:)
  तुझे काय चाललेय?

  ReplyDelete
 3. Hi Bhanas,

  Fat free version avadali. Chan ahe

  Chakali

  ReplyDelete
 4. वैदेही, अग ह्याचे संपूर्ण श्रेय तुझेच आहे. तुझ्या पध्दतीने कुल्फी अप्रतिम झाली पण आई-बाबा/वयस्कर माणसे यांना खावेसे वाटले तरी हात राखून खावे लागते ना गं, म्हणून हा खटाटोप केला.
  पुन्हा एकदा तुझे आभार.

  ReplyDelete
 5. कुल्फी म्हंटल्यावर माझं लक्ष आधी स्वतःच्या वाढलेल्या पोटाकडे गेलं, आणी मग विचार केला, की नुसतं वाचल्यानी वजन वाढणार नाही.. :) म्हणुन हिम्मत केली..

  नुसती वाचुनंच खाल्ल्याचं समाधान झालं.. :)

  ReplyDelete
 6. महेंद्र, थोडे दुर्लक्ष कर पोटाच्या घेराकडे कधीमधी.:D
  आभार.

  ReplyDelete
 7. तेच म्हटले.. सध्या जास्त ब्लॉग पोस्ट येत नाही आहेत ... आता त्या ट्रिप वर लिहा मस्तपैकी ... वाट बघतोय मी.

  ReplyDelete
 8. kulphi khupach chhan disat aahe!!

  ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !