जिन्नस
- पाव किलो डांगर( लाल भोपळा )
- एक वाटी घट्ट दही.
- एक चमचा साखर, चवीनुसार मीठ.
- फोडणीकरताः दोन चमचे तूप, एक चमचा जिरे, हिंग, दहा-बारा मेथीचे दाणे.
- दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून, चार कडिपत्ता पाने
मार्गदर्शन
भोपळ्याची पाठ काढून त्याचे चार तुकडे करून कुकरला लावावे. एक शिटी झाली की गॅस बंद करून प्रेशर गेले की काढावे. डावाने भोपळा स्मॅश करून त्यात साखर, मीठ व दही घालून सगळे एकत्र करावे. पळी गॅसवर ठेवून तापली की तूप घालावे. नंतर नेहमीसारखी जिरे, हिंग, मिरच्या, मेथीचे दाणे व कडीपत्ता घालून फोडणी करून भोपळ्याच्या मिश्रणावर घालून मिश्रण एकजीव करावे. कोमट वा गार जसे आवडत असेल तसे वाढावे.
No comments:
Post a Comment
आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.
आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !