जाता जाता एक नजर इथेही........

Thursday, July 16, 2009

आमचा ब्रह्मराक्षस....

आमच्या ब्रम्हराक्षसाचे सुंदरसे ब्रम्हकमळ

नाजूक जाई


हासरा मोगरा

फुले-कळ्यांनी डवरलेला मोगरा

अनंत-विशेष आवडता

डबल तगर

कडीपत्ता


फुलझाडांचे विशेषतः सुवासिक फुलांचे मला आत्यंतिक वेड आहे. बिया रुजवून डोकावणारे कोंब लुभावतात मला. तयार, मोठ्या झालेल्या रोपांपेक्षा आपण लावलेल्या अगदी नाजूक रोपांना दररोज किंचित किंचित वाढताना पाहून जास्त आनंद मिळतो. इथे सात महिने कडक थंडी त्यातले -पाच महिने स्नो त्यामुळे जमिनीत आपली सुवासिक फुले लावून ती जगणे शक्यच नसल्याने मी सारी कुंडीत लावलीत. गेली सात-आठ वर्षे नाजूक नाजूक फुले ती नित्यनेमाने देत आहेत. गेल्या वर्षी सुंदर ब्रह्मकमळही आले अन बहार आली. ब्रह्मकमळाचे वेडेवाकडे वाढणारे झाड पाहून माझा लेक त्याला ब्रह्मराक्षस म्हणतो.. समर सुरू झालेला आहेच, माझी फुलेही बहराला आलीत. वाटले तुम्हालाही दाखवावीत.

7 comments:

  1. छान फोटो आहेत.

    ज्ञानेश्वरांची आठवण आली.

    इवलेसे प्लॅण्ट लावियले घरी
    तयाला फुले आली समर-मधी

    ब्रह्मराक्षस.. हा हा हा... मस्त विनोद आहे.

    ReplyDelete
  2. भानस,
    कित्ती छान आहेत फोटो तुझ्या फुलांचे की मुलांचेच म्हणू ? कारण या झाडांबद्द्लची तुझी माया आईसारखीच आहे हे जाणवतंय मला....इतक्या लांब तिथे राहातेयस खरी, पण तुझं मन इथेच आहे हेही कळतंय मला..बहरू दे तुझी बाग अशीच निरंतर याच शुभेच्छा !

    ReplyDelete
  3. मालतिनन्दनJuly 16, 2009 at 11:05 PM

    सलाम!
    भाग्यश्री,
    इतक्या दूरवर असूनही फुलांचा सहवास लाभलेल्या तुझ्या कविमनाला मनोमन सलाम.

    जियो

    ReplyDelete
  4. ब्रम्ह राक्षसाचं झाड आज पहिल्यांदा पाहिलं. माझ्या मामांना पण खुप आवड होती. त्यांच्या परसदारी, चिकु, आंबा, संत्रं, लिंबु, ह्या व्यतिरिक्त सगळ्या भाज्यांची झाडं पण होती. दिवसातला खुप वेळ जायचा त्यांचा गार्डनिंग मधे. त्याची आठवण झाली. ते गेल्या नंतर मात्र त्या बागेकडे पुरेसे लक्ष न दिल्या गेल्या मुळे नुसतं जंगल तयार झालंय..!

    ReplyDelete
  5. अरुणदादा अरे बरेच दिवसांनी दिसलास. काय चालले आहे? खूप आभार.

    महेंद्र, हम्म. बागेचे वेड असलेली माणसे कुठेही गेली तरी बाग फुलवायचा प्रयत्न करतातच. प्रतिक्रीयेबद्दल आभार.

    ReplyDelete
  6. ब्रह्मकमळ खूपच छान आहे गं. मला पांढ-या रंगाची फुलं खूप आवडतात. त्यातही सोनटक्का एकदम आवडीचा.तुझ्या बागेत अशीच फुले बहरू देत आणि सुगंधाने तुझं घर भरू दे.

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !