जाता जाता एक नजर इथेही........

Friday, January 8, 2010

हिमवर्षाव........


सॅन फ्रॅन्सिस्कोवरून धमाल करून घरी-मिशिगन मध्ये परत आलो. डेट्रॉईट विमानतळावर उतरण्या आधीच विमानाच्या खिडकीतूनच एकंदर परिस्थितीची चुणूक दिसू लागलेली होतीच. बॅग्ज घेऊन विमानतळावरून बाहेर पाऊल टाकले आणि असे काही भाजलो की धुमतकाट पळत पुन्हा आत शिरलो. ' भाजलो '.... अरे ही असे काय लिहिते आहे असे वाटले असेल ना तुम्हाला? पण खरोखर तसेच आहे हे. बाहेर पडताक्षणी वाऱ्याचे भयानक थंड सपकारे चेहऱ्यावर इतके जोरात बसले की डोळे-कान-गाल अक्षरशः जळले. विंडचील- मायनस ३९ फॅरनाईट होता व तापमान २२ फॅरनाईट. सूर्याने किती दिवसात दर्शन दिले नव्हते कोण जाणे. घरी पोचेतो तापमान अजूनच खाली घसरले. हुडहुडी भरली.

आधीच झालेली बर्फवृष्टी कमी की काय म्हणून काल संपूर्ण दिवसभर बर्फ पडत होता तो रात्रीही थांबला नाही. सरतेशेवटी आज सकाळी साडेअकरा पासून जरासा मंदावला. आणि ही फक्त सुरवात आहे बरं का. जोरदार वादळी बर्फवृष्टी बहुदा अजून बाकीच आहे. या वर्षी उन्हाळाही अतिशय सौम्य होता त्यामुळे अजूनच भीती वाटतेय. गेल्या वर्षी तीन दिवसात लागोपाठ सात हिमवादळे आली होती.
सूर्य अर्थातच आजही दिसलेला नाहीच. बरेचदा भरपूर बर्फ पडला की तितका थंडावा शरीराला जाणवत नाही हा आमचा गेल्या अनेक वर्षांचा अनुभव आहे. जिकडे तिकडे शुभ्र, स्वच्छ व भुसभुशीत बर्फ डोळे सुखावतो. कानटोपी, हातमोजे, बूटस व जाड कोट चढवून मी व लेक बर्फात थोडेसे खेळलो व फोटो काढले. तेच फोटो सोबत जोडत आहे.
आम्ही प्रत्यक्ष कुडकुडतोय तुम्ही फोटोतून थंडावा अनुभवा.खिडकीवर गोठलेल्या पागोळ्याशौमित्र

आईस्क्रीम करायचेय.... मग घ्याकी हा बर्फ......


22 comments:

 1. छान वाटले पांढरा पांढरा स्नो पाहून. आपण पूर्वी तोंडाला स्नो लावायचो ते आठवयं का? तस्साच दिसत आहे अगदी. सध्या आमच्या इथेही २० आणि रात्री काही वेळेला सिंगल डिजिट मध्ये तापमान आहे पण स्नो नाहीये. मला छान वाटत आहे कारण मला थंडी खूप आवडते. हाहाहा.

  ReplyDelete
 2. रोहिणी अग वाचतेय मी, सध्या तुम्हीही मस्त गारठला आहात ते....:) कधी नव्हे ते...हा हा...

  ReplyDelete
 3. हिवार्षाव झकास आहे .थोडे दिवस गायब होतीस तेव्हा म्हटले मंडळी कुठेतरी दौर्यावर
  दिसतायत !शोमुचे फोटोखाली नाव टाकलेस ते बर झाले ...नाहीतर शोमु का त्याचा बाबा
  असे एकदम वाटले असते.

  ReplyDelete
 4. काकड बाई....:) आता काही दिवस बाहेरच पडू नकोस आणि तुझा ब्लॉग गरम गरम खाण्याने भरून टाक. मी सुटलेय या वर्षी आणि तसा जेवणात मीठ तसा थोडासा बर्फ़ इथे पडून गेला.तेवढाच बस आहे....

  ReplyDelete
 5. वा मस्त ... एक शेकरू (ती खार) आणि दुसरे तुमचे लेकरु ... हाहा ... फोटो मस्त. तो खुर्चीचा फोटो मस्त आला आहे. शेवटचा फोटो परफेक्ट ... हेहे ..

  ReplyDelete
 6. अरे बापरे.. पण दिसायला मोठं मस्तं आहे.. थोडे दिवस नक्कीच एंजॉय केलं जाउ शकतं..

  ReplyDelete
 7. अरे देवा...!! गॉड ब्लेस यु!

  ReplyDelete
 8. बापरे केव्हढी थंडी असेल ना तिथे.आम्ही इंदोरात6c झाले तरी काकडतोय.

  ReplyDelete
 9. Are vaa!! dole dipale shubhratene. :) Masta.

  ReplyDelete
 10. आमच्याकडेही अशीच परिस्थिती आहे. नॅशविलला सहसा स्नो पडत नाही यावेळी आठवडाभर टिकेल एवढा पडलाय. मी पण दोन वर्षांनी पाहतोय आज स्नो. विकेन्डचा मस्त ३ वेळा चा झाला अत्तापर्यंत.

  ReplyDelete
 11. मधुमती अग हो जरा थोडी भटकंती.:)

  ReplyDelete
 12. अपर्णा खरेच गं. तू निदान बर्फातूनतरी सुटलीस यावर्षी.:)

  ReplyDelete
 13. रोहन अरे घराच्या बाहेर इतके घसरडे झालेय की पडता पडता वाचले.शोमू त्याचाच फोटो खरे तर काढत होता. पण मी पटकन सावरल्याने त्याचा डाव कोलमडला. हा हा...

  ReplyDelete
 14. अनिकेत अरे सवय होते हळूहळू सगळ्यांना याची. बाहेर जाणे बंद करता येत नाही. रोजची कामे सुटत नाहीत. तेव्हां थोडे सांभाळून मस्त धमाल करायची.आभार.

  ReplyDelete
 15. भाग्यश्री नाशिकलाही असेच २ सेंटी पर्यंत टेंपरेचर ड्रॊप झालेले एकदा मी असताना. हिटरही नाही... बाबाबा... गोधड्यांमध्ये गुरफटून बसलो होतो किती वेळ. आहेस कुठे तू?

  ReplyDelete
 16. सीमा अग जय खूश झाला का फोटो पाहून?:)

  ReplyDelete
 17. साधक यावर्षी सगळेच प्रकरण उलटसुलट झालेय. फ्लोरिडाला २० फॆरनाईट टेंपरेचर कोणी कधी ऐकले होते का? बिचारे त्यांच्याकडे तर थंडीचे कपडेही नसतील.:( मग काय भजी वगैरे केलीत का?:)

  ReplyDelete
 18. महेंद्र हो ना, सुरवातीला एकदोनदा सगळेच धमाल करतात. स्नोमॆन बनवतात. खेळतात. पण जस जसा रोजच पडू लागतो अन ढिगारे वाढतच राहतात तसे फार त्रास होतो. त्यातून सतत घसरून पडायची भीती. शिवय आईसमिश्रित पाऊस पडला की अपघातच अपघात होतात. गाड्या घसरू लागतात. संपूर्ण ३६० डिगरीचा टर्न मारूनही घसरायचे थांबत नाहीत.:( त्रास अनेक प्रकारे असले तरीही मजा येतेच.

  ReplyDelete
 19. mastach snow padalaay ki ... khidakeevarachya pagolyaanchaa photo phaarach chaan!

  ReplyDelete
 20. भजी उद्या ! आज चहा वनटरंगची गाणी !

  ReplyDelete
 21. वा काय गमंत आली असेल ना त्या बर्फ़ात खेळायला...(गेल्या वर्षी फ़ेब मध्ये गॅंगटोक गेलो होतो तेव्हा खेळलो होतो बर्फ़ात पण इतका बर्फ़ न्वहता तिथे)
  फ़ोटोपण छान आहेत, तिकडची थंडी इथे पोहोचवलीत त्या फ़ोटोतुन....

  ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !