जाता जाता एक नजर इथेही........

Monday, January 18, 2010

बिरडे - डाळिंब्यांची उसळ - प्रकार -२
जिन्नस

 • चार वाट्या भिजवून मोड आणून सोललेल्या डाळिंब्या-कडवे वाल
 • चार चमचे तेल भाजीसाठी व वरून घालावयाच्या फोडणीसाठी दोन चमचे तेल
 • चवीपुरते मीठ, गुळाचे चार-पाच मध्यम खडे ( किसलेला गुळ पाच चमचे )
 • दोन चमचे ओले खोबरे व मूठभर कोथिंबीर
 • तीन चार सुक्या लाल मिरच्या व फोडणीचे साहित्य

मार्गदर्शन

कडवे वाल बारा-चौदा तास भिजवून नंतर मोड येण्यासाठी पंधरा-सोळा तास बांधून ठेवून नंतर सोलून घ्यावेत. थंड प्रदेशात मोड येण्यास थोडा जास्त वेळ लागू शकतो. कढई/पातेले मध्यम आचेवर ठेवून चांगले तापले की चार चमचे तेल घालावे. नेहमीप्रमाणेच मोहरी- हिंग व हळदीची फोडणी करून त्यावर सोललेल्या डाळिंब्या घालून हलक्या हाताने परतावे. त्यावर दोन भांडी पाणी घालून झाकण ठेवावे. दहा-बारा मिनिटांनी दोन चमचे हिंग व थोडीशी कोथिंबीर घालून ढवळून पुन्हा दहा मिनिटे झाकण ठेवून शिजवावे. पाणी कमी वाटल्यास एक भांडे पाणी घालावे. झाकण काढून एखादी डाळिंबी काढून शिजली आहे का ते पाहावे. नसल्यास पुन्हा पाच मिनिटे ठेवावे. नंतर त्यात चवीपुरते मीठ, ओले खोबरे व गूळ घालून सगळे मिश्रण हलक्या हाताने एकत्र करून पुन्हा पाच मिनिटे झाकण ठेवूनच शिजवावे. आचेवरून उतरवून कोथिंबीर घालावी. एका छोट्या कढईत किंवा फोडणीच्या पाळीत दोन चमचे तेल घालून तापले की मोहरी व हिंगाची फोडणी करून आच बंद करावी. लागलीच त्यात सुक्या मिरच्या घालून मिनिटभर हालवून वाटीत काढावी. डाळिंब्या वाढताना वरून ही वेगळी केलेली फोडणी घालून वाढावे.

टीपा

डाळिंब्या शिजायला हव्यात पण मोडू देऊ नयेत. अतिरेक शिजवू नयेत. मात्र शिजल्याची खात्री झाल्याशिवाय गूळ घालू नये. आवडत असल्यास चार आमसुले घालावीत. किंवा बरोबर आमसुलाचे सार जरूर करावे.

8 comments:

 1. अरे काय चाललय काय ??? इकडे मी खादाडी पोस्ट टाकली की लगेच प्रतीहल्ला ??? हाहाहा ... ;) आलात ना की जे सर्व खायला करून घालायला लागणार आहे तुम्हाला... :D

  ReplyDelete
 2. रोहन आता तर काय आपण एक गल्लीवाले. बस एक फोन की देर हैं.....:)

  ReplyDelete
 3. sahi......yammy, bhuk chalavali photo baghun.....

  ReplyDelete
 4. Bhagyashri tai,
  Frozen surti lilva daane je miltal te vaprun hi usal karta yeil ka?

  pushpa

  ReplyDelete
 5. पुष्पा, थोडा विलंब झालाय उत्तर द्यायला. माफी!

  हो. सुरती लिलवा वापरुनही ही उसळ करता येईल. अर्थात लिलवाची चव असेल. :)

  ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !